किसान क्रेडिट कार्ड योजना 2020 माहिती – पात्रता,अटी,कागदपत्रे

किसान क्रेडिट कार्ड योजना / किसान क्रेडिट कार्ड ची माहिती (kisan card) >> मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड बद्दल आपण ऐकले असेलच पण पूर्ण माहिती गरजेची आहे. केंद्र सरकार ने सुरू केलेली ही लहान तसेच मध्यम शेतकर्‍यांसाठी ही अत्यंत उपयुक्त योजना आहे.

पीएम किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत शेतकर्‍यांना काहीही हमी किंवा काहीही गहाण न ठेवता जवळ जवळ १ लाख ६० हजार रुपयां पर्यंत कर्ज मिळू शकते. आणि ते देखील वर्षा काठी फक्त ४ % व्याजदराने.

तुम्हाला देखील किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजने ची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. आणि तीच माहिती आम्ही या लेखात देणार आहोत.

किसान क्रेडिट कार्ड योजना – पात्रता

१) सर्व प्रकारचे शेतकरी – वैयक्तिक किंवा गट शेती करणारे.

२) या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने मध्ये तुमचे खाते असणे बंधनकारक आहे. किसान सन्मान निधी म्हणजे दर ४ महिन्यांनी सरकार २००० रुपये शेतकर्‍याच्या खात्यावर टाकत असते. ज्या शेतकर्‍यांच्या खात्यावर अशा प्रकारचे २००० रुपये येत असतील केवळ तेच शेतकरी किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्र ठरतील.

किसान क्रेडिट कार्ड माहिती – आवश्यक कागदपत्रे

१) तुम्ही भरलेला अर्ज – जो योग्य रीतीने भरलेला असावा.

२) कोणताही एक तुमच्या पत्त्याचा पुरावा जसे मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसेंस / पासपोर्ट इ.

३) कोणताही एक तुमचा ओळख पुरावा जसे मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसेंस / पासपोर्ट इ.

किसान क्रेडिट कार्ड माहिती व वैशिष्ट्ये

१) प्रथम वर्षासाठी देण्यात येणारे कर्ज हे साधारण पणे कापणी खर्च व जमीन देखभाल खर्चाच्या आधारावर ठरवले जाते.

२) एक हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असणार्‍या शेतकर्‍यांना विना हमी १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

किसान क्रेडिट कार्ड ची माहिती
किसान क्रेडिट कार्ड ची माहिती

३) कर्जा चा परतफेडी चा कालावधी हा ज्या पिकावर कर्ज घेतले आहे त्या पिका च्या अंदाजे काढणी व विक्री कलावधी वर आधारित असेल.

४) घेतलेल्या कर्जा वर परतफेडी च्या मुदती पर्यंत ७ % दराने व्याज आकारले जाईल.

५) दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न केल्यास, अधिक चे व्याज द्यावे लागेल.

६) किसान क्रेडिट कार्ड खात्या वर रक्कम शिल्लक असल्यास त्यावर बचत बँके च्या व्याज दरा नुसार व्याज दिले जाईल.

७) किसान क्रेडिट कार्ड कर्ज दारां साठी विना शुल्क एटीएम कार्ड दिले जाईल.

८) घेतलेल्या कर्जाची जलद परतफेड व्हावी या हेतूने वार्षिक ३ % व्याज दरात सूट देण्यात येते.

किसान क्रेडिट कार्ड योजना (kisan credit card yojana) साठी अर्ज कसा कराल

१. अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम pmkisan च्या वेबसाइट वर जावे लागेल.

२. वेबसाइट च्या प्रथम दर्शनी पेज वरच Download KCC Form या बटन वर क्लिक करून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाऊनलोड करा.

३. हा डाऊनलोड केलेला फॉर्म तुमच्या पिकाच्या तपशीला सह व जमीनी च्या कागदपत्रांसह भरा.

४. संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरा आणि कोणत्याही सहकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकेत जिथे तुमचे खाते आहे अशा बँकेत सबमिट करा. त्यानंतर आपल्याला संबंधित बँके कडून किसान क्रेडिट कार्ड(KCC) मिळेल.

किसान क्रेडिट कार्ड कुठे मिळेल ?

केसीसी (किसान क्रेडिट कार्ड / kisan credit card yojana) कोणत्या ही सहकारी बँकेत व एस.बी.आय सारख्या सरकारी बँकेत देखील मिळेल. या साठी तुम्हाला तुमचे अकाऊंट ज्या बँकेत आहे व पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे ( २००० रुपये ) ज्या बँक अकाऊंट मध्ये जमा होत आहेत त्या बँकेत भरलेला अर्ज जमा करायचा आहे.

आपल्या ला किसान क्रेडिट कार्ड विषयी जर या पेक्षा अधिक काही माहिती हवी असेल तर आपण जवळच्या आपले सरकार किंवा महा-ई-सेवा केंद्राशी संपर्क साधावा.

आपल्या ला ही किसान क्रेडिट कार्ड योजना (kisan credit card yojana) विषयी माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यां सारख्या इतर माहिती च्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android apps Baby Products best Free Health Health Related Products Measurement Mechanical Engg Metrology & Quality Control Products Rainy Season udyojak अभ्यास संबंधित अमिताभ बच्चन उद्योग उपाय कोल्हापूर ग्रामीण ट्रक देश पैसे प्रेरणा फडणवीस फायदा बिजनेस मशीन महाराष्ट्र महाराष्ट्राचे राजकारण मोदी मोबाइल योजना रजिस्टर रेकॉर्ड लहान बाळ वायरल विदेश विद्यापीठ व्यवसाय शरद पवार शेती सण स्पीकर स्वयंपाक हिंदू

Scroll to Top