कबड्डी खेळाचे मैदान / कबड्डी खेळाच्या मैदानाची माहिती

AutoEase™ 2-in-1 Car Seat Hook & Phone Holder (Pack of 2)

कबड्डी खेळाचे मैदान / कबड्डी खेळाच्या मैदानाची माहिती / kabaddi maidan >> कबड्डी हा भारताचा तसेच दक्षिण आशीया व आसपासच्या देशांमध्ये  खुप लोकप्रिय खेळ मानला आहे, परंतु काळाच्या ओघात हा खेळ लोप पावताना आपल्याला पाहावयास  मिळत आहे. आता हल्लीच्या काळात म्हणजे गेल्या ५ ते ७ वर्षा मध्ये प्रो कबड्डी लीग च्या माध्यमातून व देशातील काही प्रतिष्ठीत मान्यवर उदा. सिने जगातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या सहकार्याने या खेळाला नव संजीवनी मिळाल्याचे पाहावयास मिळत आहे. हल्लीच सुरू झालेला हा प्रो कबड्डी खेळ माध्यमांच्या आधारे संपूर्ण देशात पाहावयास मिळाला.

कबड्डी खेळाच्या मैदानाची माहिती / कबड्डीचे मैदान लांबी व रुंदी / मैदाना वरील विविध भाग – संपूर्ण माहिती

 कबड्डी चे मैदान सर्व साधारण पणे खेळाडूं प्रमाणे बदलते, जसे लहान मुलांसाठी वेगळ्या आकाराचे मैदान तर महिला व पुरुष गटासाठी वेगळ्या आकाराचे मैदान असते. चला तर मग जाणून घेऊयात कबड्डी खेळाच्या मैदानाची माहिती विस्तृत स्वरुपात.

कबड्डी खेळाचे मैदान – खेळाडूंच्या गटानुसार मैदानाची वर्गवारी

    कबड्डी खेळासाठी लागणारे क्रिडागणांची ३ गटात वर्गवारी केली जाते.

  • पुरूष व कुमार गटाच्या मुलांसाठी. १३.०० मी.बाय १०.०० मी.
  • महिला व कुमारी गटाच्या मुलींसाठी १२.०० मी.बाय ८.०० मी.
  • किशोर व किशोर मुलामुलींसाठी ११.०० मी.बाय ८.०० मी. असे आयताकृत क्रीडागण बनवतात.
  • ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकासारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे.

कबड्डी खेळाच्या मैदानाची माहिती – मैदानाचे आकारमान व मैदानाचे विविध भाग

कबड्डी खेळाच्या मैदानाची माहिती / कबड्डी खेळाचे मैदान लांबी व रुंदी / मैदाना वरील विविध भाग
कबड्डी चे मैदान
  • पुरूष व कुमार गट मुले यांच्यासाठी क्रीडागणाची रूंदी १०मी. व लांबी १३ मी. असते.
  • मध्यरेषा ही अंतिम रेषेपासून ६.५० मीटरवर असते.
  • निदान रेषा ही क्रिडागंणाच्या मध्यरेषेपासून ३.५० मीटर अंतरावर असते.
  • राखीव क्षेत्र क्रिडगंणाच्या दोन्ही बाजूस २ मी.अंतरावर असते
  • निदान रेषेपासून १ मी. अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा असते त्याला बोनस रेषा म्हणून ओळखले जाते.
  • सिंटीग बॉक्स ८ मी. x १ मी. असून तो अंतिम रेषेपासून २ मीटरवर असतो.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top