कबड्डी चे नियम कोणते आहेत जाणून घेऊयात सगळे नियम मराठी मध्ये

कबड्डी नियम मराठी | कबड्डी चे नियम (kabaddi che niyam marathi)>> कबड्डी हा खेळ हल्ली परत प्रकाश झोतात आला आहे या खेळाला परत एकदा चांगले दिवस यायला लागले आहे आणि त्याचे श्रेय जाते प्रो कबड्डी या स्पर्धेला. तसे पाहायला गेले तर हा पूर्वी पासून खेळत असलेला जुना खेळ आहे. इ.स.१९३४ मध्ये या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिंकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळला गेला. तर इ.स.१९३८ पासून हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.

भारतात जवळ जवळ सर्वच राज्यांमध्ये प्रचलित असा हा खेळ आहे. कबड्डी खेळताना रेडर कबड्डी कबड्डी म्हणत रेड करण्याचा नियम आहे परंतु महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यात हुतुतु, कर्नाटक व ‍ तामिळनाडू मध्ये चाडू गूडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गमने तर बंगालमध्ये दो दो असे म्हणत देखील हा खेळ खेळाला जातो.

कबड्डी नियम मराठी | कबड्डी चे नियम (kabaddi che niyam marathi)

खेळाचा मुख्य उद्देश

कबड्डी हा सांघिक खेळ आहे, जो प्रत्येकी सात खेडाळूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो. रेडरने प्रतिस्पर्धी संघाच्या अर्ध्या भागाकडे जाणे व त्यांचे शक्य तितके बचावकर्ते काढून टाकणे व त्यांच्याअर्ध्या भागांकडे परत जाणे हा खेळाचा उददेश आहे. रेडर प्रतिस्पर्धी संघाच्या एका खेळाडूला किंवा एकापेक्षा जास्त खेळाडूला स्पर्श करून मध्य रेषा ओलांडून परत आपल्या संघाकडे आला की त्यांना गुण मिळतो तर या उलट प्रतिस्पर्धी संघ रेडर थांबविण्याकरिता गुण मिळवतो. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाचा रेडर गुण प्राप्तीसाठी विरोधी संघाच्या अर्ध्या भागात प्रवेश करतो, आणि गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो.

कबड्डी चे नियम | कबड्डी नियम मराठी (kabaddi che niyam marathi)
कबड्डी नियम मराठी

कबड्डी नियम मराठी (kabaddi che niyam marathi) –

कबड्डी नियम मराठी / kabaddi niyam marathi
कबड्डी नियम मराठी
 • कबड्डी च्या मैच ला २० – २० मिनिटांच्या दोन डावांमध्ये विभागले जाते. दोन डावांच्या मध्ये ५ मिनिटांचा विश्रांतीसाठी ब्रेक दिला जातो.
 • महिलांच्या कबड्डी मध्ये २० मिनिटांच्या ऐवजी १५ – १५ मिनिटांचे दोन डाव असतात.
 • नाणेफेक जिंकणार संघ अंगण किंवा चढाई यापैकी एकाची निवड करतो. दुसरया डावात अंगण बदलून अगोदर असतील तेवढेच खेडाळू घेऊन डाव सुरू करतात. त्यावेळी प्रथम ज्या संघाने चढाई केलेली नसतो तो संघ चढाई करतो.
 • कबड्डी खेळाच्या टीम मध्ये 12 खेळाडू असतात, परंतु एका वेळी एका संघाचे केवळ सात खेळाडू मैदानात खेळतात. बाकी खेळाडूंना विशेष परिस्थितीत खेळवले जाते.
 • चढाई करणार्‍याने कबड्डी हा उच्चार स्पष्टपणे व सलग केला पाहिजे. तसे न आढळल्यास पंचाने त्या खेळाडूला ताकीद देऊन विरूध्द संघाला चढाईची संधी दयावी.
 • चढाई करणार्‍याने मध्यरेषा ओलांडण्यापूर्वी दम घालण्यास सुरूवात करावी तसे न आढळल्यास पंचांनी विरूध्द संघाला चढाईची संधी दयावी.
 • खेळ चालू असताना खेडाळूचा कोणताही भाग अंतिम मर्यादेबाहेर जाऊ नये तसा गेल्यास तो बाद ठरविला जाईल.
 • झटापट सुरू झाल्यास राखीव क्षेत्राचा क्रिडाक्षेत्रात समावेश होतो.
 • खेळ चालू असताना खेडाळू ‍अंतिम रेषेबाहेर गेल्यास त्याला पंचांनी बाहेर काढावे.
 • ताकीद देऊनही खेडाळू आपल्या अंगणात दम घालवलयास वा कबड्डी  शब्द उच्चारण्यास सुरूवात करत नसेल तर त्याला बाद न देता त्यांची रेड संपली असे जाहीर करून विरूध्द संघाला एक गुण दयावा.
 • जेंव्हा कधी पण एक संघ दुसर्‍या संघाचे सर्व खेळाडू आऊट करेल तेंव्हा त्या संघाला २ अतिरिक्त गुण मिळतात.
 • एकदा बदली केलेल्या खेळाडूला परत त्या सामन्यात खेळवता येणार नाही.
 • २० मिनिटांचे दोन डाव पूर्ण होऊन देखील दोन्ही संघांचे गुण सारखे झाले तर अतिरिक्त ५-५ रेड दोन्ही संघांना दिल्या जातात त्या मध्ये जो संघ जास्त गुण मिळवेल त्याला विजयी घोषित केले जाते.

कबड्डी या खेळाचे नियम video पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. https://youtu.be/vvA02oQPyN4

सारांश – कबड्डी नियम मराठी

कबड्डी चे नियम/ कबड्डी नियम मराठी (kabaddi che niyam marathi) या लेखामध्ये कबड्डी खेळाचे जवळ जवळ सर्व नियम आपल्याला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. इतर खेळांप्रमाणे या खेळा मध्ये देखील पंचांचा निर्णय अंतिम असतो. हल्ली “Pro Kabaddi” सारख्या खेळांमध्ये advance टेक्नॉलॉजी आली आहे, या द्वारे कबड्डी च्या मैदानावर जे जे घडते ते स्क्रीनवर दिसते आणि या द्वारे चालू असलेल्या कबड्डी खेळा चे बारकावे अगदी सहजतेने दिसतात. तसेच झालेली मॅच पुन्हा देखील बघता येते.

या लेखामध्ये सांगितलेल्या कबड्डी च्या नियमां व्यतिरिक्त आणखी काही माहिती असल्यास किंवा आपला काही सल्ला असल्यास आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आम्हाला सांगा.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top