अभ्यास कसा करावा | मुलांनी अभ्यास आणि वेळ नियोजन कसे करावे >> अनेक लहान मुलांच्या पालकांना असा प्रश्न पडतो की मुलांनी अभ्यास कसा करावा.आणि काही मोठ्या मुलांना देखील प्रश्न पडतो की अभ्यास कसा करायचा, अभ्यास नियोजन कसे करावे किंवा अभ्यास किती वेळ करावा.
तर मित्रांनो अशा प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी पुस्तक वगैरे नसते तर त्यासाठी तुम्हालाच काही बदल करावे लागतील. तेच बदल कोणते व कसे करावे या विषयीची माहिती तुम्हाला ह्या लेखा मध्ये देण्याचा हा प्रयत्न.
बहुतांश मुलांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम होतो, म्हणजे जर अभ्यासाचे नियोजन नसेल आणि व्यवस्थित अभ्यास नसल्यामुळे परीक्षेत नापास होणे किंवा हुशार असून देखील कमी मार्क पडणे असे प्रकार होतात. हे टाळण्यासाठी अभ्यास कसा करावा हे शास्त्र तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. चला तर मग अभ्यास कसा करायचा या बाबत काही टिप्स जाणून घेऊयात.
अभ्यास कसा करावा / करायचा | अभ्यास किती वेळ करावा |अभ्यासाचे नियोजन कसे करावे – ८ मार्गदर्शक टिप्स
प्रत्येकाची अभ्यास करण्याची वेगवेगळी पद्धत असते, काही ठराविक पण उपयुक्त टिप्स तुम्हाला खाली दिलेल्या आहेत. यातील निवडक टिप्स जरी तुम्ही अंगीकारल्या तरी त्याचा तुम्हाला निच्छितच फायदा होईल.
अभ्यास एकाग्रतेने कसा करावा
तुम्ही अभ्यास करायला बसला की तुम्हाला नाही नाही ती कामे आठवतात आणि मग अभ्यासात मन लागत नाही. यांसारख्या गोष्टींपासून स्वतःला वेगळे ठेवण्यासाठी तुमचा तुमच्या मनावर ताबा असणे गरजेचे आहे. तुम्ही जेवढा वेळ पण अभ्यास कराल तो पुर्णपणे एकाग्रतेने करावा. एकाग्रतेने केलेली कोणतीही गोष्ट ही उत्तमच होत असते. आपण एकाग्रतेने केलेला अभ्यास हा तुमच्या कायम लक्षात राहील व त्याची अनुभूति तुम्हाला परीक्षा देताना येईल.
अभ्यासाची वेळ
अभ्यास कधी करायचा हे पूर्णतः तुमच्या वर अवलंबून आहे. म्हणजे ज्यावेळी तुमचे मन प्रसन्न असेल त्यावेळी तुम्ही अभ्यास करावा ज्यामुळे केलेले वाचन लक्षात राहते.
काहींना पहाटे उठून अभ्यास करायची सवय असते तर काहींना रात्रीची जागून अभ्यास करायची सवय असते. तुमच्या अभ्यास करण्याची वेळ ही नेहमी अशी असावी ज्यावेळी तुम्हाला नको ती कामे किंवा नको त्या मनोरंजनाच्या गोष्टी आठवणार नाहीत. म्हणजे बघा ना एकतर तुम्ही पहाटे अभ्यास केलात तरी तुम्हाला काही कामे आठवत नाहीत आणि जर तुम्ही रात्रीचे जागून अभ्यास केलात तरी तुम्ही काही कारचे म्हंटले तरी करू शकत नाही. आणि विशेष म्हणजे अशा वेळी घरात व सर्वत्र शांतता असते ज्यामुळे अभ्यासात व्यत्यय येत नाहीत.
अभ्यास किती वेळ करावा

अभ्यास कितीवेळ करावा असे काही ठरवून करू नका, जो पर्यन्त तुमचा मेंदू पुर्णपणे त्या वाचनातील किंवा लिखाणातील गोष्टींमध्ये रमतो आहे तो पर्यन्त अभ्यास करावा. जसे बराच वेळ काम केल्यावर किंवा व्यायाम केल्यावर तुमचे शरीर दमते आणि त्याला आरामाची गरज असते. अगदी तसेच तुमच्या मेंदूला देखील ठराविक कालावधी नंतर थोड्या विश्रांतीची गरज असते.
तुम्ही अभ्यास करताना असे जरूर ठरवा की आज मी हा अमुक अमुक धडा किंवा टॉपिक पूर्ण संपवेन, आणि मग बघा तुमचे शरीर आणि मेंदू एकत्रित पणे ते काम पूर्ण करण्यासाठी काम करतील. परंतु तुम्ही जर इतके तास अभ्यास करायचेच असे जर ठरवले तर त्या मध्ये तुमचा म्हणावं तेवढा अभ्यास होणार नाही.त्यामुळेच तुम्ही अभ्यास कितीवेळ करता याला महत्व नाही तर तो कसा करता ते महत्वाचे आहे.
अभ्यासाचे नियोजन कसे करावे
कोणत्याही गोष्टीचे व्यवस्थित नियोजन केल्यास ती चांगली होतेच. जसे की आपण एखाद्या ठिकाणी फिरायला / ट्रीपला जाताना ज्या प्रमाणे सर्व काही आधीच ठरवतो आणि मग त्यानुसार जायच्या दिवशी ठरलेल्या वेळेला निघतो, विविध स्पॉट बघतो आणि रिटर्न च्या दिवशी परत माघारी आपल्या घरी येतो. अगदी तसेच तुम्हाला अभ्यासाचे नियोजन हे करावेच लागेल.
नियोजन बद्ध केलेला अभ्यास हा तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. जर तुमची परीक्षा ही ३० दिवसांनंतर असेल तर त्यानुसार विषयांचे वेळापत्रक बनवा. अगदी प्रत्येक विषयातील प्रत्येक धडा कधी आणि कोणत्या तारखेला करायचा आहे ते संपूर्ण आधीच ठरवा. असे केल्याने तुम्हाला परीक्षा २ – ४ दिवसांवर आल्यावर ताण पडणार नाही. आणि सर्व विषयांना तुम्ही समान वेळ देखील देऊ शकता.
ध्येय

अभ्यास केल्याने काय साध्य होणार आहे हे जो पर्यन्त तुम्ही स्वतःच्या मेंदूला आणि मनाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यासात गती घेणार नाही. लहान लहान ध्येय ठेवून ती पूर्ण करा असे केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. जो पर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला पूर्ण करण्याचे मनाशी ठरवत नाही तो पर्यंत ती पूर्ण होणार नाही आणि ज्या वेळी तुम्ही त्या गोष्टीशी निगडीत एखादे ध्येय ठेवता तेंव्हा तुमचे शरीर,मन आणि मेंदू ते ध्येय गाठण्यासाठी एकत्रित पणे काम करतात.
वाचन – लिखाण – वाचन

अभ्यास करताना सतत एकच कृती करू नये जसे की फक्त वाचन करत बसणे. तुमच्या अभ्यासात नेहमी विविध स्थर असणे गरजेचे आहे जसे की वाचन नंतर लिखाण आणि परत वाचन. असे केल्याने तुमची ग्रोस्पिंग पॉवर वाढते आणि तुम्ही जे काही वाचले आहे आणि नंतर तेच लिहल्यामुळे ते तुमच्या डोक्यात पूर्णतः बसते आणि लिखाण करण्या मागचा दूसरा हेतु म्हणजे शेवटी आपल्याला परीक्षे मध्ये लिहायायचेच असते ना. त्यामुळे नियमित पणे जे काही वाचत आहात ते लिहून काढत जा, आणि लिहून झाल्यावर परत एकदा लिहलेले वाचावे.
विस्तृत माहिती घ्या
एखादा धडा वाचताना त्याची विस्तृत माहिती घ्या. तो धडा किंवा टॉपिक कशावर आधारित आहे आधी ते समजून घ्या, त्या धडयाची प्रस्तावना आणि सारांश व्यवस्थित वाचून काढा ज्यामुळे तुम्हाला त्या धडया मध्ये काय आहे ते समजेल. शक्य असल्यास त्या टॉपिक विषयी विस्तृत माहिती घ्या जसे की त्या टॉपिक शी संबंधित विडियो यूट्यूब वर बघा. एखाद्या टॉपिक समजत नसेल तर त्या विषयावर आधारित विडियो बघा. विडियो बघितल्या नंतर तुम्ही तो धडा वाचल्यास तुम्हाला तो विषय पुर्णपणे समजेल.
नियमितता
सर्वात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे नियमितता. माणसाने कोणतेही काम नियमित पणे केल्यास त्याला त्या मध्ये यश हे निच्छित मिळते. तसेच अभ्यासाचे देखील आहे तुम्ही थोडा का होईना पण नियमित पणे अभ्यास करा, नियमित अभ्यास केल्याने परीक्षा जवळ आल्यावर होणारा ताण कमी होईल व अभ्यासातील रुचि वाढेल. बरीच मुले परीक्षा जवळ आली की पुस्तके घेऊन बसतात आणि मग ऐन वेळी अभ्यासाचा ताण पडतो. असे न करता तुम्ही स्वतःला जर नियमित पणे अभ्यासाची सवय लावलीत तर ते सोयिस्कर आणि योग्य राहील.
तात्पर्य
अभ्यास कसा करावा या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ८ टिप्स वरील लेखामध्ये आपल्याला दिल्या आहेत. आपण यांचा वापर आपण केल्यास यश हे निच्छित मिळेल.
आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आम्हाला कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अजित पवार (1) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)