मेडिटेशन कसे करावे |ध्यान साधना कशी करावी संपूर्ण माहिती

waterdensor diya premium

मेडिटेशन कसे करावे |ध्यान साधना कशी करावी संपूर्ण माहिती (Meditation kase karave) > आधुनिक काळात मानवाला नाना प्रकारच्या समस्याना तोंड ध्यावे लागते.  धकाधकीच्या या जीवनात आपण मानसिक संतुलन बिघडण्याचे बरेचसे उदाहरण पाहिले व वर्तमान पत्रात वाचले असतील. मनुष्य जीवन दुर्लभ असून देखील असंख्य माणसे ऐहिक विषय भोगतच आपले अमुल्य जीवन जगत असतात. आपल्या सत्य स्वरूप ज्ञानाच्या अभावी मानव अस्वभाविक तणाव आणी अनावश्यक मानसिक संघर्षा मध्ये अस्वस्थ, असमाधानी व रोगग्रस्त होऊन जातो.

विज्ञान व तंत्रज्ञाना च्या विकासा सोबतच मानव अस्वस्थ झाला आहे म्हणूनच त्याने आपला मानसिक समतोल गमावला आहे. अशा या संभ्रमित अवस्थेमध्ये त्याला आपल्या अंतनिर्हीत देवत्वाचा विसर पडला आहे. त्यामुळेच ध्यान करणे मानवाला अधिक गरजेचे आहे.चला तर मग बघूयात मेडिटेशन कसे करावे / ध्यान साधना कशी करावी.

मेडिटेशन कसे करावे / ध्यान धारणा कशी करावी / (Meditation kase karave)
ध्यान धारणा कशी करावी

मेडिटेशन कसे करावे / ध्यान धारणा कशी करावी / मन एकाग्र कसे करावे (Meditation kase karave)

waterdensor diya premium

सर्वप्रथम आपण पाठीचा कणा न वाकता बसून श्वास येणे व जाण्याकडे लक्ष केंद्रीत करावे. सुरूवातीला मेडिटेशन / ध्यान करत असताना असभ्य प्रकारचे वाईट व अशोभनिय विचार येतील व ते स्वाभाविक आहे कारण मानवी मनामध्ये सुप्त अवस्थेत हे विचार मनात निर्माण होत असतात, त्याविचाराना न घाबरता अखंड ध्यान करत रहावे जसे जसे आपण ध्यान ‍नियमित करत राहणार तसतसे आपल्याला जाणवेल की मनातील विचार हळू हळू कमी होतील. मनातील विविध पैलु आपणास उघडलेले दिसतील. नंतर हळु हळु आपल्यास एकाग्रता वाढेल व मनाला शांतता निर्माण होईल. रोजच्या जीवनात सर्व वयोगटा तील तरूणांना त्याचा लाभ घेण्यासाठी नियमित व अखंडित ध्यान करणे गरजेचे आहे. तरच या योगाभ्यासाचा पूर्णपणे आपल्याला फायदा जाणवेल.

जेव्हा मोकळा वेळ असेल मन शांत असेल तेव्हा आपण ध्यान करू शकतो. सुरूवातीला ध्यान साधना करत असतांना मनाला त्रास जाणवेल उदा. डोकेदुखी, अंगदुखी, अंगात ताप येणे इ. अडचणी येवू शकतात, पण नंतर हळु हळु आपणास  ध्यान करण्यात नियमितता ठेवल्यास आपल्याला मनशांती व प्रसन्नता जाणवू लागेल. अभ्यासात मन लागत नसल्यास मेडिटेशन किंवा ध्यान केल्याने मनाची एकाग्रता वाढते.

मेडिटेशन कसे करावे / ध्यान धारणा कशी करावी / मन एकाग्र कसे करावे (Meditation kase karave)
मेडिटेशन कसे करावे / ध्यान धारणा कशी करावी

मेडिटेशन किंवा ध्यान कसे करावे – मेडिटेशन चे काही प्रकार

विश्वप्रार्थना

विश्वप्रार्थना हा ध्यान प्रक्रियेला मुख्य भाग आहे आधी आपण विश्वकल्याणसाठी देवाकडे आपण मनात असलेल्या दैवीभाव यांना प्रार्थना करावी की, हे ईश्वरा सर्वांचे भले कर, सर्वाना बुध्दी दे, सर्वाचे जीवन आरोग्यमय बनव सर्वाचे मंगल कर अशा प्रकारे प्रार्थाना केल्यास आपल्यास ध्यान करण्यास अडथळा कमी होईल. एक वेगळया प्रकारची मनाला शांतता निर्माण होईल.

मेडिटेशन कसे करावे / ध्यान धारणा कशी करावी / मन एकाग्र कसे करावे (Meditation kase karave)
Meditation

संपूर्ण क्षमा देणारी प्रार्थना

ध्यान करत असताना दोन्ही डोळे बंद करून मनात आपण केलेल्या चुका व आपल्या हातून काही चुका झालेल्या असतील तर मनातुन त्यांचा बद्दल क्षमा मागा. आपल्या हातून झालेल्या चुका बददल ईश्वरा कडे क्षमा मागितल्याने मनातील भार कमी होऊन जातो व ध्यान करण्याची आपली संकल्पना दृढ होत जाते. व पुढे आपण दृढ निश्चयी झाल्याचे आपल्याला जाणवते. तसेच येणार्‍या समस्ये बददल आपण सकारात्मक विचार करून आपणास यश संपादन करता येईल.

सकारात्मक विचार

सकारात्मक विचार हा ध्यानाचा मुख्य भाग मानला जातो. आपल्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होत असतात पण त्याबददल आपण नेहमी सकारात्मक विचार करण्यासाठी ध्यान करत असताना सकारात्मक गोष्टी बददल विचार  केला पाहिजे. जेणे करून आपल्या जीवनात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते व आपला संपूर्ण दिवस उत्साही व आनंदीमय जाते व कामाच्या ठिकाणी आपली कार्यक्षमता टिकून राहते.

तात्पर्य – मेडि टेशन कसे करावे |ध्यान साधना कशी करावी

प्राचीन काळा पासून आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला ध्यानाचे महत्व पटवून दिले आहे. आपण ध्यान या क्रियेला सुरूवात केली तर आपल्या जीवनात मन शांती व तणाव मुक्ती होईल. व कोणत्याच प्रकारचे डिप्रेशन किंवा तणाव निर्माण होणार नाही.मेडिटेशन केल्याने तुमचे आरोग्य देखील सदृढ व निरोगी राहील.

ध्यान म्हणजे स्वतःला शोधण्याची क्रिया हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आज च्या धावपळीच्या जीवनात आपल्याला ध्यानाची आवश्यकता आहे. जेणेकरून आपण आपल्या समोरील अडचणी साठी मानसिकरित्या तयार राहून येणार्‍या समस्यांना तोंड देवू शकतो व आपले जीवन मंगलमय बनवू शकतो.

आपल्याला मेडिटेशन कसे करावे |ध्यान साधना कशी करावी ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

2 thoughts on “मेडिटेशन कसे करावे |ध्यान साधना कशी करावी संपूर्ण माहिती”

  1. When I initially commented I clicked the
    “Notify me when new comments are added” checkbox and now each time a comment is added I get four e-mails with
    the same comment. Is there any way you can remove people from that service?
    Thanks a lot!

  2. ซุปเปอร์สล็อต

    I really enjoy the blog post.Really looking forward to read more. Awesome.

Comments are closed.

Scroll to Top