प्रतिकार शक्ती कशी वाढवावी | रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपाय

प्रतिकार शक्ती कशी वाढवावी | रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपाय (Pratikar shakti kashi vadhvavi)>> आजच्या आधुनिक युगात मानवाला कामाचा व्याप आणि न मिळणारी विश्रांती यामुळे बहुधा लोकांची प्रतिकार शक्ती कमी होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. आणि त्यामुळे बहुतेक लोक सतत आजारी पडत असतात. विशेष म्हणजे ऋतु बदलाचा परिणाम शरीरावर जाणावायला सुरूवात होते आणि बहुधा इन्फेक्श्नच्या विळख्यात येण्याचे प्रकार पाहायला मिळतात. या आजाराचे मुख्य कारण म्हणजे शरीराची प्रतिकार शक्ती कमी असते. जर रोग प्रतिकार शक्ती मजबुत नसेल तर शरीराची रोगांच्या सोबत लढण्याची शक्ती कमी होते. त्यामुळे आपण लवकर आजारी पडतो. यांचा प्रभाव आपल्या मानसिकेते वर देखील होतो व त्यामुळे आपल्याला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असल्याचे आपल्याला दिसते. त्याचे कारण म्हणजे मासिक पाळी मुळे त्याची प्रतिकार क्षमता कमी होते वा शारिरीक अडचणीना सामोरे जावे लागते. उदा. अंग दुखणे सर्दी खोकला व अंगाला ताप येणे, डोळे लाल होणे, मणक्यात सतत त्रास होणे.

आजकाल हवे मध्ये अनेक प्रकारचे हानिकारक वायरस असतात जे श्वसनाच्या मार्फत शरीरात प्रवेश करतात. आणि जेव्हा तुमची रोग प्रतिकार शक्ती कमी असते तेव्हा हे वायरस तुमच्या शरीरावर अधिक वेगाने हल्ला करतात. ज्यामुळे सर्दी खोकला व ताप या समस्या निर्माण होतात.

त्यामुळे प्रतिकार शक्ती कशी वाढवावी या तुम्हाला नेहमी पडणार्‍या प्रश्नाचे निवारण या लेखामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय व काही उत्पादने या लेखामध्ये दिलेली आहेत.

प्रतिकार शक्ती कशी वाढवावी | रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपाय व उत्पादने (How To Increase Immunity | Measures & Products To Increase Immunity)

या लेखामध्ये सुरवातीला तुम्हाला रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी या साठी काही उत्पादने देण्यात आलेली आहेत. उत्पादना नंतर लेखाच्या दुसर्‍या भागात आपल्याला रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय दिलेले आहेत.

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उत्पादने (उत्पादने वापरुन प्रतिकार शक्ती कशी वाढवावी) (Products To Increase Immunity Power)

खाली काही रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी या साठी उत्पादने दिलेली आहेत त्यातील आपल्याला योग्य वाटणार्‍या उत्पादना ची अधिक माहिती आपण घेऊ शकता. आपल्याला जर अशा प्रकारची उत्पादने घ्यायची असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास खालील “Check It On Amazon” बटन वर क्लिक करून माहिती घेऊ शकता.

Ayur Foods Immune Power Capsule + Tulsi Drop

Sansu Immunity Booster Sugar Free Kadha (500 ml)

TULSI IMMUNE POWER BOOSTER

GNC Women’s One Daily Multivitamin – Supports Immune Health and Healthy Skin – 60 Tablets

Two Brothers Organic Farms Immunity Boosting Powder, 150 gms

cap Roasted Alsi & Chatpata Amla (boost immune power) – 350 Grams (Combo of 2)

c a p Ayush kwath Kadha immunity booster churna a – 100 gms (pack of 2)

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपाय (Measures To Boost Immunity)

रोग प्रतिकार शक्ती कमजोर होण्याची वेगवेगळी कारणे असू शकता. अनेकदा खाण्यापिण्यात हलगर्जीपणा मुळेही रोग प्रतिकार शकती कमजोर होते. अनेकदा तर नशेच्या पदार्थाच्या सेवणामुळे ही समस्या उत्भवते. आता प्रश्न असा उभा राहतो की, रोगप्रतिकार शक्ती मजबुत कशी ठेवायची / प्रतिकार शक्ती कशी वाढवावी. तर याबददलच आपण माहीती आपण जाणून घेऊयात.

प्रतिकार शक्ती कशी वाढवावी या बाबत काही घरगुती उपाय आपल्याला खाली दिलेले आहेत. यातील कोणताही उपाय जो तुम्हाला करणे सोपे आणि सोयीस्कर असेल तो आपण जरूर अमलात आणावा.

कच्चा लसूण

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कच्चा लसूण खाणे कधीही चांगले. रोज साधारण २ ते ३ कुड्याकच्चा लसूण खाल्याने प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. लसणा मध्ये व्हिटॅमिन ए, झिंक, सेलेनियन आणि सल्फर चे प्रमाण भरपूर असते. हृदय विकाराचा त्रास असणार्‍या लोकांसाठी देखील हा उपाय गुणकारी आहे.

ब्लॅक आणि ग्रीन टी

चहा हा आपल्याला दैनंदिन काम करताना आलेला थकवा घालवून ऊर्जा देऊन जातो. या चहा मधून देखील तुम्ही तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवू शकता त्यासाठी तुम्हाला दुधाचा चहा पिणे बंद करून कोरा चहा (ब्लॅक) किंवा ग्रीन टी पिणे सुरू करावे लागेल. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चा हा एक उत्तम उपाय आहे. कोरा चहा पिल्याने आपल्या शरीरातील वायरस तर मरतातच पण तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल तर त्यावर देखील हा एक गुणकारी उपाय ठरू शकतो.

लिंबू, आवळा व संत्री

लिंबू - प्रतिकार शक्ती कशी वाढवावी
रक्त वाढीसाठी उपाय (आवळा - प्रतिकार शक्ती कशी वाढवावी)

रोग प्रतिकार वाढविण्ययासाठी विटामिन सी अत्यंत फायदेशीर असते. लिंबू, आवाळा व संत्री हे जणू विटामिन सी चे भांडारच आहेत. त्यामुळे यांचे ‍नियमित सेवन करा.लिंबू हे तुमच्या दैनंदिन आहारात असले पाहिजे जेणे करून तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

दही

दही - प्रतिकार शक्ती कशी वाढवावी
दही

दही हे देखील तुम्हाला विविध आजरांपासून वाचवण्याचे काम करते. नियमित दही खाल्याने देखील तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. तुमच्या दुपारच्या आहारात शक्यतो दहयाचा समावेश करा.

योगा / व्यायाम

अभ्यासात मन लागण्यासाठी काय करावे
व्यायाम

व्यायाम केल्याने तुम्हाला एक वेगळाच फ्रेशनेस मिळेल. रोजच्या नियमित व्यायामाने शरीर निरोगी तर राहतेच पण रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योगा आणि व्यायाम यांची मदत मिळते. नियमित व्यायामाचे या खेरीस अनेक फायदे आहेत.

लहान मुलांसाठी आईचे दूध

लहान बाळाला इतर कोणत्याही औषधा पेक्षा आईचे दुध हे अधिक गुणकारी आणि गरजेचे असते. नवजात बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आईच्या अंगावरील दूध हे रामबाण उपाय आहे. जे लहान बाळाला कशाच्याही एलर्जी व इन्फेकशन पासून वाचवते.

पालेभाज्या

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणे हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. पालेभाज्यांमध्ये सर्वात गुणकारी असणार्‍या पालक मध्ये ‍विटामीन सी असते जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. लहान किंवा मध्यम वयोगटातील मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. त्यांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या नियमित असु दयाव्यात.

मशरूम

बोकली मध्ये विटामिन सी असते ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते. त्या बरोबरच तुमच्या शरीराला प्रोटीन व कॅल्शियम देखील मिळते. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मशरूम खाणे देखील फायदेशीर ठरते.त्यामुळे आहारात मशरूम चा समावेश केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

पूर्ण झोप

पुर्ण झोप

आपले शरीर निरोगी व सदृढ ठेवायचे असेल तर त्यासाठी जशी सकस आहाराची गरज असते त्याच प्रमाणे आरामाची देखील गरज असतेच. अनेकदा झोप पूर्ण न होणे हे रोग प्रतिकार शक्ती कमी होण्याचे मुख्य कारण असते. लहान मुलांची इम्यून सिस्टम मजबुत राहावी यासाठी त्यांना ८ ते १० तास झोप ही आवश्यकच आहे.त्यामुळे नियमित पणे पूर्ण झोप घेणे हे देखील तुमच्या प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या केलेल्या निच्छयाला मदत करेल.

स्मोकिंग टाळा

स्मोकिंग टाळा - प्रतिकार शक्ती कशी वाढवावी

स्मोकिंग केल्याने देखील तुमची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे तुम्ही जर स्मोकिंग करत असाल तर ते त्वरित बंद करावे. तसेच बिडि आणी सिगारेट यांच्या धुरा पासून लहान मुलांना देखील दूर ठेवावे. यामुळे देखील रोग प्रतिकार शक्तीचा विकास होत नाही.

विटामिन डी देणारे पदार्थ

विटामिन डी आपल्या शरीरासाठी फार महत्वाच असतं. याने वेगवेगळया रोगांशी लढण्यासाठी शक्ती मिळते. सोबतच हाडेही मजबूत होतात आणि हदयासंबध् आजारही दूर राहतात. त्यामुळे तुमच्या आहारात विटामिन डी असणे गरजेचे आहे. अंडे, चिकन, सोया फूड हे विटामिन डी देणारे पदार्थ आपल्या आहारात असणे फायदेशीर ठरू शकते.

तात्पर्य – प्रतिकार शक्ती कशी वाढवावी

हिरव्या पालेभज्या, वेगवेगळी मोसमी फळे, दूध यांचा आहारात नियमित समावेश कराल तर तुम्हाला शरीरासाठी पोषक तत्वे नियमित मिळतील. या पोषक तत्वांमुळेच रोग प्रतिकार शक्ती मजबूत राहण्यासाठी मदत  मिळते. वरील घरगुती उपयांचा आपण वापर केला तर आपली रोग प्रतिकार नक्कीच वाढेल.यांखेरीस आपल्याला प्रतिकार शक्ती वाढवणारी काही उत्पादने दिलेली आहेत त्यांचा देखील आपण वापर करू शकता. खरेदी किंवा अधिक माहिती साठी उत्पादना च्या खाली दिलेल्या “Check It On Amazon” बटन वर क्लिक करा.

pratikar shakti meaning in marathi

pratikar shakti म्हणजे तुमच्या शरीरातील अशी शक्ति जी रोगांना विरोध करते,रोगांना आपल्या शरीरात प्रवेश करण्यास विरोध करणारी शक्ति म्हणजेच प्रतिकार शक्ती. आपल्या शरीरात जे काही विषाणू या न त्या मार्गाने प्रवेश करतात त्यांच्या मुळे आपल्याला विविध रोग/ आजार जडतात. अशा रोगांपासून आपल्या शरीराला वाचवणारी शक्ती म्हणजेच रोग प्रतिकार शक्ती.

रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी ? / pratikar shakti vadhavnyasathi upay

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय पुढील प्रमाणे :- १) नियमित योगा / व्यायाम करा. २) स्मोकिंग टाळा. ३) पूर्ण वेळ झोप घ्या. ४) चहा पिणे टाळा त्याऐवजी ब्लॅक किंवा ग्रीन टी घ्या. ५) कच्चा लसूण,लिंबू,आवळा,संत्री,दही,पालेभाज्या,मशरूम व विट्यमिन डी देणारे पदार्थ जसे की अंडे, चिकन, सोया फूड यांचा तुमच्या आहारात समावेश करा.
वरील उपाय करून तुम्ही रोग प्रतिकार शक्ती वाढवू शकता.

आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

      

Scroll to Top