मराठी टायपिंग कशी करावी – लॅपटॉप वर किंवा मोबाइल मध्ये

AutoEase™ 2-in-1 Car Seat Hook & Phone Holder (Pack of 2)

मराठी टायपिंग कशी करावी | मराठी टाइपिंग ची सर्वात सोपी पद्धत (Marathi Typing kashi karavi) >> आपल्याला मोबाईल वर मराठी टायपिंग करायचे म्हंटले तर जिवावर येते, मग इंग्लिश भाषेमध्येच मराठी वाचता येईल असे टायपिंग करुन बरेच जण आपल्या मित्र मैत्रिणी सोबत अथवा आप्तेष्टांशी चॅटिंग करतात. तर काहींना मराठी मध्ये अर्ज टाइप करायचा असतो किंवा काही कारणास्तव मराठी टाइपिंग कम्प्युटर वर करायची असते, आणि कम्प्युटर किंवा लॅपटॉप वर मराठी टायपिंग कशी करावी हा मोठा प्रश्न उत्भवतो. आम्ही तुमच्या या प्रश्नाचे निवारण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या लेखामध्ये केलेला आहे.

मराठी टायपिंग कशी करावी – कम्प्युटर/ लॅपटॉप व मोबाइल | मराठी टाइपिंग ची सर्वात सोपी पद्धत ( Marathi Typing kashi karavi )

लेखाच्या सुरवातीला आपण कम्प्युटर / लॅपटॉप मध्ये मराठी टायपिंग कशी करावी ते बघणार आहोत आणि त्यानंतर मोबाईल मध्ये. आता सध्या अनेक जण आपल्या मोबाईल वर मराठी टायपिंग करत देखील असतील, पण ज्यांना माहिती नाही अशा सर्वांसाठी मोबाईल मधील मराठी टाइपिंग ची माहिती उपयुक्त ठरेल.चला तर मग जाणून घेऊयात मराठी टायपिंग कशी करायची.

कम्प्युटर / लॅपटॉप वर मराठी टायपिंग कशी करावी

कम्प्युटर/लॅपटॉप वर मराठी टायपिंग करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातील सर्वात सोपा मार्ग म्हणजे मायक्रोसॉफ्ट चे इंडिक लॅंगवेज इनपुट टूल, जे वापरुन तुम्ही अगदी सहजतेने मराठी टाइपिंग करू शकता. या टूल च वापर करून तुम्ही मोबाईल वर चॅटिंग करताना जसे इंग्लिश वर्ड वापरुन मराठी मध्ये बोलता, अगदी तसेच टायपिंग तुम्हाला इथे करायचे आहे,पण तुम्ही जस जसे इंग्लिश शब्द टायप करताल तसे स्क्रीन वर मराठी शब्द येतील. होय हीच तर खासियत आहे मायक्रोसॉफ्ट च्या या टूल ची.

https://www.microsoft.com/en-in/bhashaindia/downloads.aspx

वरील लिंक वरुन आपण हे मराठी भाषेसाठीचे इंडिक टूल (SDK Version) डाऊनलोड करून घ्या,आणि तुमच्या कम्प्युटर / लॅपटॉप वर इंस्टॉल करा. इंस्टॉल केल्यानंतर खालील फोटो मध्ये दर्शवल्या प्रमाणे तुमच्या स्क्रीन च्या उजव्या कोपर्‍यात असलेल्या ENG या लॅंगवेज इनपुट टूल च्या चिन्हा वर क्लिक करा. किंवा तुमच्या कीबोर्ड वरील विंडोज चे बटन व स्पेस चे बटन एकसाथ दाबा. इंडिक लॅंगवेज टूल चे मेनू ओपन होतील. त्यातील मराठी भाषा निवडा. आता तुम्ही मराठी टाइपिंग सुरू करू शकता.

मराठी टायपिंग कशी करावी - कम्प्युटर/ लॅपटॉप - Step 1
मराठी टायपिंग कशी करावी – कम्प्युटर/ लॅपटॉप – Step 1
मराठी टायपिंग कशी करावी - कम्प्युटर/ लॅपटॉप - Step 2
मराठी टायपिंग कशी करावी – कम्प्युटर/ लॅपटॉप – Step 2

AutoEase™ 2-in-1 Car Seat Hook & Phone Holder (Pack of 2)

मराठी टाइपिंग करताना आपण जे इंग्लिश मध्ये टाइप करताल त्याचे मराठी मधील उच्चार तुम्हाला खाली दिसतील त्यातील जो शब्द तुम्हाला योग्य वाटतो तो तुम्ही क्लिक करून अथवा स्पेसबार चा उपयोग करून मिळवू शकता.

marathi typing by indic keyboard -मराठी  टाइपिंग
मराठी टायपिंग

मोबाईल वर मराठी टायपिंग

मोबाईल मध्ये मराठी भाषेत मेसेज टाइप करण्यासाठी तुम्ही गूगल प्ले स्टोर वरुन गूगल चा इंडिक कीबोर्ड डाऊनलोड करू शकता. यासाठी प्ले स्टोर मध्ये “Google Indic Keyboard” टाइप करा आणि खाली फोटो मध्ये दाखवलेले अॅप तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करा. इंस्टॉल केल्यानंतर त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन मराठी भाषा निवडा.

गूगल इंडिक कीबोर्ड - मराठी टाइपिंग
gogle indic keyboard for marathi typing

ज्या वेळी तुम्ही मोबाईल मध्ये कुठेही टायपिंग करण्यासाठी कीबोर्ड ओपन कराल तिथे तुम्हाला बाजूला मराठी टायपिंग चा पर्याय दिसेल.तो निवडा आणि इंग्लिश शब्दांचा वापर करून खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे मराठी टायपिंग सुरू करा.

मोबाईल मध्ये मराठी टायपिंग - स्टेप १
मोबाईल मध्ये मराठी टायपिंग – स्टेप १

मोबाईल मध्ये मराठी टायपिंग - स्टेप २
मोबाईल मध्ये मराठी टायपिंग – स्टेप २

सारांश

मराठी टायपिंग करणे आता सोपे झाले आहे. वर दिलेल्या सर्वात सोप्या अशा मराठी टायपिंग च्या पद्धतीने आपण अगदी सहज पणे मराठी टायपिंग करू शकता. मग ते तुम्ही मोबाईल वर करत आहात की कम्प्युटर वर हे काही महत्वाचे नाही कारण दोन्ही मध्ये तुम्ही सहजपणे मराठी टायपिंग करू शकता. मराठी टायपिंग ची कामे देखील याच्या सहाय्याने तुम्ही करून देऊ शकता.

मराठीमध्ये टाईप करण्यासाठी वेगवान पर्याय कोणता आहे.

लॅपटॉप / कम्प्युटर मध्ये वेगवान मराठी टायपिंग करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट चा इंडिक कीबोर्ड हा पर्याय उत्तम आहे तो कसा वापरायचा ते वरील लेखामध्ये दिलेले आहेच. आणि मोबाईल मध्ये मराठी टाइपिंग साठी वेगवान पर्याय म्हणाल तर गूगल चे इंडिक कीबोर्ड हे अॅप्लिकेशन तुम्ही गूगल च्या प्ले स्टोर वरुन डाऊनलोड करून तुमच्या मोबाईल मध्ये डिफॉल्ट कीबोर्ड म्हणून वापरू शकता.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top