कान दुखणे घरगुती उपाय / कानदुखी थांबवण्याचे काही योग्य घरगुती उपाय

कान दुखणे घरगुती उपाय / कानदुखी थांबवण्याचे काही योग्य घरगुती उपाय (kan dukhane upay in marathi)>> शरीरात पाच प्रमुख  अवयवांच्या मध्ये कान हा महत्वाचा अवयव आहे. मानवाच्या शरीरात  कोणत्या ना कोणत्या अवयवाविषयी समस्या असतात. सध्या च्या विज्ञान युगात अत्याधुनिक यंत्राचा अमाप वापर केल्याने व सार्वजनिक ठिकाणी नको असलेल्या ध्वनीचा त्रास आपल्या कानाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे होतो. कर्णदोष किंवा कान दुखणे देखील त्याचाच एक भाग मानला जातो. त्याचबरोबर वाढत्या वयात कानाचें विकार सुरु होणे स्वाभाविकच आहे.

परंतु तरुण पिढी ज्या पध्दतीने हेडफोन व रॉक संगीत ऐकण्यासाठी डॉल्बी चा मोठया प्रमाणात वापर करत आहेत, त्यामुळे सुध्दा कानाचे विकार वाढल्याचे निदर्शनात आले आहे. आपण काही घरगुती उपाय करुन आपल्या कानाची काळजी घेऊ शकतो.असेच काही कान दुखणे घरगुती उपाय आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

कान दुखणे घरगुती उपाय / कानदुखी घरगुती उपाय (Kan Dukhane Gharguti Upay)

कान दुखणे घरगुती उपाय जाणून घेण्याच्या आधी ही कान दुखी नेमकी कशी असते ते जाणून घेऊयात.

कान दुखणे काय आहे? लक्षणे कोणती आहेत.

कान दुखणे, ज्याला कान दुखी म्हणून देखील संबोधले जाते, हे विविध वैदयकिय  परिस्थीचे एक सामान्य लक्षण आहे. याचा  परिणाम  कोणालाही, कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो.  बहुतांश घटनांमध्ये वेदना, गंभीर सूचक नाही आहेत, पण तीव्र वेदनांचा तपास करणे आवश्यक आहे.

कान दुखणे घरगुती उपाय
विमान प्रवासात – कान दुखणे

बदलणारा वायु दाब कान दुखीचे एक प्रमुख कारण होऊ शकते. उदा. विमानातून प्रवास करतांना अनेक प्रवाशांची कान दुखण्याची समस्या आपण ऐकली असेल. मुळात उडडाणा दरम्यान आपल्या कानांना एक नवीन अनुभव येत असतो, म्हणून आपल्या कानाच्या स्नायु ना जास्त त्रास जाणवतो.

कधी कधी पोहताना किंवा आंघोळ करताना कानात पाणी गेल्यामुळे, किंवा कानात घाण जमा झाल्यामुळे कानदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे ऐकू कमी येते, डोके दुखू लागते. थंड वातावरणात किंवा थंडीच्या दिवसात कानदुखीचा त्रास अधिक जाणवतो.

अनेकदा कान प्रमाणापेक्षा जास्त कोरडे पडल्याने देखील दुखतात अशा वेळी ड्रॉप वापरल्याने देखील कान दुखी थांबते.

कान दुखी मुळे अनेकांच्या कांनातून पाणी येण्यासारखे प्रकार देखील पाहायला मिळतात. यांसारख्या कान दुखीच्या समस्यांवरील योग्य ते उपाय आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

सुरवातीला आपण कान दुखी वर काही घरगुती उपाय आपण जाणून घेऊयात त्या नंतर डॉक्टर काय उपाय सांगतात ते जाणून घेऊयात.

कान दुखणे घरगुती उपाय व त्यांची अंमलबजावणी

लसणाचे तेल – कान दुखणे घरगुती उपाय

लसणाचे तेल तुम्ही कानात घालायला ड्रॉप म्हणून देखील वापरू शकता. घरच्या घरी लसूण तेल तयार करण्यासाठी किमान ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्या आणि त्या एक चमचा तिळ आणि राई च्या तेलामध्ये गरम करा. लसणाचा रंग बदलल्या नंतर गरम करणे थांबवा. आता हे लसणाचा अर्क उतरलेले तेल थोडे गार होऊद्या,आणि कोमट झाल्यानंतर कापसाच्या  बोळ्याच्या सहाय्याने २ ते ३ थेंब कानात टाका.

कान दुखत असताना साधारण दिवसभरात २ वेळा असे केल्याने तुम्हाला नक्की आराम मिळेल.

मोहरीचे किंवा बदामाचे तेल – कान दुखणे घरगुती उपाय

कान दुखी
कान दुखी उपाय

मोहरीचे तेल किंवा बदामाचे तेल कोमट गरम करुन घ्या, नंतर कापसाच्या मदतीने त्याचे काही थेंब कानात घाला. थोड्याच वेळात आराम मिळेल. असे केल्याने देखील कान दुखी वर आराम पडतो.

कांद्याचा रस – कान दुखणे घरगुती उपाय

जर कशाच्या इंफेक्शनमुळे तुमचा कान दुखत असेल तर यावर कांद्याचा रस हा अतिशय उपयुक्त उपाय ठरु शकतो.सुरवातीला कांद्याचा रस काढून घ्या त्यानंतर तो कोमट गरम करा आणि त्याचे २ थेंब कानात घाला. हा उपाय केल्याने देखील कान दुखीवर त्वरित आराम मिळेल. 

मसाज कराकानदुखी घरगुती उपाय

कान दुखी उपाय
कान दुखणे घरगुती उपाय – मसाज करा

जर अचानक कान दुखायला लागला आणि घरात कानात घालण्यासाठी ड्रॉप उपलब्ध नसेल तर तुम्ही घरात असणारे खोबरेल तेल वापरुन कानाच्या बाहेरील बाजूने कॅनची मसाज करू शकता. कानाच्या सर्व बाजूंनी तेल लाऊन मसाज केल्याने देखील तात्पुरता का होईना पण आराम मिळेल.

गरम कापडाने कानाला शेक द्या – कानदुखी घरगुती उपाय

रात्री अपरात्री अचानक कान दुखायला लागल्यास अनेकदा गरम पाण्याच्या पिशवीने देखील कान शेकला तरी आराम पडतो. घरात जर गरम पाण्याची पिशवी किंवा हॉट पॅड नसेल तर काळजी करू नका. सरळ तवा गॅस वर गरम करा आणि त्यावर एखादे सुती कापड गरम करून घ्या.गरम झालेल्या कापडाच्या सहाय्याने तुम्ही तुमचे कान शेकु शकता. या गोष्टी मुळे देखील कान दुखी वर आराम मिळतो.

व्हिनेगरचा वापर ड्रॉप म्हणून करू शकता

व्हिनेगर च वापर तुम्ही एअर ड्रॉप म्हणून देखील करू शकता. अॅपल सिडार व्हिनेगरचे १-२ थेंब कानात घातल्याने कानातील बॅक्टेरीया नष्ट होण्यास मदत होते. या अॅपल सिडार व्हिनेगरमध्ये शरीराला किवा कानाला हानिकारक असे काही केमिकल्स नसतात, त्यामुळे याचा वापर केल्याने कानाला काही साइड इफेक्ट होत नाहीत उलट तुमचा दुखत असलेला कान दुखायचा थांबतो.  

कान दुखी वरील डॉक्टरांचे काही सल्ले / उपाय

कान दुखीची जी काही लक्षणे आहेत जसे की कांनातून पाणी येणे,किंवा अचानक पणे कान प्रकर्षाने दुखणे. जर आपल्याला उपरोक्त रेखांकित लक्षणापैकी काही लक्षणांचा अनुभव येत असेल तर आपण डॉक्टरकडे जावे. प्रभावी निदानासाठी, डॉक्टर कानातून काही द्रव्य  पदार्थांचे नमुने तपासू शकतात. संसर्गाच्या किंवा वेदनांच्या तीव्रतेवर आधारीत, कान दुखणे दूर करण्यासाठी  डॉक्टर विविध उपाय सुचवू शकतात.  त्यापैकी काही असे आहेत.

१) काही  वेळा कानदुखी ही विषाणूमुळे येते. पण ती वेगळी ओळखता येत नाही, म्हणून ५ दिवस कोझाल व मेझोल जंतुविरोधी गोळया घाव्यात. या व्यतिरिक्त ऍसपिरीन किंवा पॅमाल दया.

२) दिवसातून चार किंवा पाच वेळा कानात जंतुनाशक थेंब टाका.

३) कोरडया स्वच्छ कापसाने कानातला पू दर दोन – तीन तासांनी टिपून घ्या. कापसाचा बोळा ठेवून तो  भीजला की काढून नवा बसवणे हा सोपा मार्ग आहे. नळीने पू शोषून घेता आले तर जास्त चांगले, यासाठी सलाईनच्या नळीचा भाग कापून वापर करता येईल.

कान दुखणे
कान दुखणे घरगुती उपाय

४) चार पाच दिवसांत पाणी/ पू  येणे न थांबल्यास किंवा दुखणे कायम राहील्यावर किंवा मेंदूसूजेची चिन्हे दिसल्यास ताबडतोब तज्ञाकडे पाठवा.

५) सततच्या त्रासदायक वेदना दूर करण्यासाठी  मेडिकल स्टोअर मध्ये सहज रीत्या उपलब्ध असलेले वेदना शामक पेन किलर्स औषधांचा वापर करावा.

६) आपणास वॉर्म कम्प्रेसिना किंवा  थेरेपी वापरण्याचा सल्ला देखील दिला जाऊ शकतो. आपण कापड कोमट पाण्यात बुडवून जो कान दुखत आहे त्या कानाच्या बाहेर लावून शेकु शकता.

७) गंभीर संसर्ग  व द्रवपदार्थाचा डिस्चार्ज झाल्यास, आपल्याला  इअर ड्रॉप घेण्याकरिता  देखील सांगितले जाऊ शकते.

८) दाब असंतुलनाच्या बाबतीत, आपणास साधारण च्युइंग गम वापरण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.  हे आपणास दाब मुक्त करण्यास व वेदना कमी करण्यात मदत करते.

९) होमिओपेथी ची निवड

कानासंदर्भात होमिओपेथी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. परंतु त्याचा लगेचच परिणाम दिसणार नाही. परंतु होमिओपेथी चा सतत उपचार घेऊन कान दुखीवर आपण कायमची मात करु शकता.

कान दुखी होऊ नये म्हणून घ्यावयाची सावधगिरी

आपण आंघोळीच्या वेळेस आपण घाईगडबडीत आपल्या कानांना व्यवस्थीतपणे साफ करत नाही, पर्यायाने  कानातील मळ खुप दिवसांपासून कानात जमा होतो व काही दिवसांत आपल्याला कानांत मळांचा भोळा असल्याचे जाणवते,  जेव्हा आपण डॉक्टरां कडे जातो तेव्हा आपल्या लक्षात येते की, कान साफ करावे लागतील, म्हणून आपण रोज आपल्या कानांची निगा राखली पाहिजे.

इलेक्ट्रॉनिक वस्तुचा अतिवापर टाळावा.

     हल्लीच्या काळात आपण इलेक्ट्रानिक वस्तूंच्या इतके आहारी गेले आहोत की त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे आपल्या कांनावर दुष्परिणाम झाल्याचे दिसते. मोबाईल फोन मुळे देखील कानावर दुरगामी परिणाम होऊ शकतो. उदा. मोबाईलवर सतत बोलत राहणे, गाणे ऐकण्यासाठी हेडफोनचा मर्यादे बाहेर वापर करणे, अशा मुळे देखील आपल्याला भविष्यात कर्णदोष  निर्माण होऊ शकतो.

तात्पर्य

 अशा पध्दतीने आपण घरच्या घरी काही खबरदारी व घरगुती उपचार केले तर कानांची काळजी घेऊ शकतो. जेणेकरुन आपल्याला मानसिक व पर्यायाने आर्थिक त्रास होणार नाही.

कान दुखण्यावर उपाय

कान दुखणे घरगुती उपाय म्हणून तुम्ही घरच्या घरी लसणाचे तेल/मोहरीचे तेल/ बदामाचे तेल/ कांद्याचा रस यांपैकी कोणताही एक द्रव्य पदार्थ कानात सोडू शकता,याने आराम मिळेल. यांचबरोबर तुम्ही कानाची मसाज करून किंवा गरम कापडाने कान शेकल्यास देखील आराम मिळेल. यांखेरीस तुम्ही व्हिनेगर चा देखील ड्रॉप म्हणून वापर करू शकता.
वरील उपायां करून देखील तुम्हाला जर जास्तच कान दुखी चा त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “कान दुखणे घरगुती उपाय / कानदुखी थांबवण्याचे काही योग्य घरगुती उपाय”

  1. We are a group of volunteers and opening a new scheme in our
    community. Your site offered us with valuable
    info to work on. You have done a formidable job and our entire community will be
    grateful to you.

Comments are closed.

Scroll to Top