हरतालिका पूजा कशी करावी व हरतालिकेची कहाणी – संपुर्ण माहिती

हरतालिका पूजा कशी करावी व हरतालिकेची कहाणी / हरितालिका पूजा / hartalika puja vidhi in marathi >> घरातील स्रिया गणेश उत्सवाच्या एक दिवस आधी हरतालिकेची पूजा करतात. ही हरतालिका पूजा का केली जाते व गणेश चतुर्थीच्या अधल्या दिवशीच हा सण का साजरा केला जातो याबाबतची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊयात हरतालिका पूजा कशी करावी, हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य व हरतालिकेची कहाणी.

हरतालिका पूजा कशी करावी (hartalika puja vidhi in marathi)

हरतालिका पूजा कशी करावी याची माहिती देण्याचा या लेखामध्ये प्रयत्न केला आहे. सर्वप्रथम हरितालिका ची पूजा मांडताना सर्व प्रथम आपण मोठा पाट घ्यायचा आहे त्याच्या वरती लाल नवीन कापड टाकायचे आहे. नवीन लाल कापड पहिल्या पाटावर व्यवस्थित घालून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्या घरात जर महादेवाची पिंड असेल तर ठेवली तर चालेल किंवा वाळूची सुध्दा पिंड आपण घरात बनवू शकतो.

हरतालिका पूजा कशी करावी व हरतालिकेची कहाणी (hartalika puja vidhi in marathi)
हरतालिका पूजा कशी करावी (hartalika puja vidhi in marathi)

हरतालिकेची पूजा कशी करावी या लेखाच्या सुरवातीला पूजेसाठी लागणारे साहित्य त्यानंतर विधीवत हरतालिकेची पूजा कशी करावी ति माहिती आणि लेखाच्या शेवटच्या भागात हरतालिकेची कहाणी आपण बघणार आहोत.

हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य (hartalika puja vidhi sathi lagnare sahitya in marathi)

सर्वप्रथम आपल्याला लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताम्हण, बेलपत्रे, पाच प्रकारची पाने, केळी, नारळ आणि महत्त्वाचे म्हणजे सुवासिनी त्या दिवशी उपवास करायचा असतो, त्यासाठी रताळे खाल्ले तरी चालतात. पुर्ण उपवास हा रताळे खाउन करावा लागतो. त्याच्यासाठी लागणारे अजुन साहित्य म्हणजे त्याच्या मध्ये थोडीशी खडीसाखर, हळदी-कुंकू , ओटी भरण्याचे साहित्य त्यामध्ये बदाम, खारीक, सुपारी, हळकुंड असे ओटी भरण्याचे साहित्य घ्यायचे आहे.

त्याचबरेाबर कापुर, धूप, अगरबत्ती, निरंजन, आणि ओटी भरण्याचे कापड घ्यायचे आहे. ओटी भरणाचे कापड घेत असताना नवीन कापड घ्यायचे आहे. त्याच पध्दतीने पाच प्रकारची फळे घ्यायची आहेत. उदा. मोसंबी, केळ,सिताफळ, पेरू, डाळींब थोडेसं वाटी भर तांदूळ घ्यायचे आहे. करदळीची पाने घ्यायचे आहे. त्याचबरोबर समई व आरतीसाठी धूपआरती वैगेरे इ. त्याच्यामध्ये पंचपात्री मध्ये फुलवाती घ्यायच्या आहेत. तुपामध्ये भिजवुन इ. हे पुजेसाठी लागणारे साहित्य आधी घ्यायचे आहे.

हरतालिका विधी व पूजन (हरतालिका पूजा कशी करावी)(hartalika vidhi v puja in marathi)

प्रथम पाटावर लाल कापड घालुन घ्यायचे आहे त्यावर मगाशी सांगितल्याप्रमाणे पिंड ठेवायची आहे. किंवा वाळूची पिंड तयार करायची आहे. पाटावर पहिला पाच खायची पाने मांडून घ्यायची आहेत. त्याच पध्दतीने महादेवाला बेलाचे पान वाहायचे आहे. त्याच्यानंतर महादेवाची पुजा करायची आहे. मनोभावे हरतालिकेची पूजा करायची आहे. आता आपण जी पाचपाने मांडली आहेत त्यांच्यावर एक पानावर खारीक, बदाम, हळकुंड, सुपारी हे पाच प्रकार पानावर ठेवुन घ्यायचे आहे. त्यानंतर देवाला खडीसाखर वाहायची आहे. धूप व अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे पाच फळे ठेवायची आहेत.

त्यानंतर समई वगैरे लावून घ्यायची आहे. त्यानंतर शंकराची आरती म्हणायची आहे. त्याच्या वर फुले वैगेरे वाहायची आहेत त्यामध्ये पाटावर मध्ये खाली तांदूळ घालून त्याच्यावर पार्वती व तिची सखी या दोन मुर्ती तिथे ठेवायची आहे. व त्याची पूजा करून घ्यायची आहे. अशी सर्व हरतालिकेची पूजा करून घ्यायची आहे.

हरतालिका पूजा कशी करावी व हरतालिकेची कहाणी (hartalika puja vidhi in marathi)
हरतालिका पूजा कशी करावी व हरतालिकेची कहाणी (hartalika puja vidhi in marathi)

हरतालिकेची कहाणी (hartalika puja kahani in marathi)

श्री हरतालिका व्रत कथा. श्री हरतालिकाच्या व्रताच्या देवता शिव व पार्वती आहेत, पार्वती ही शिवाची अर्धांगिणी आहे. महान पतीव्रता पार्वती ने जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून उग्र तप केेले, व्रत केले तेच हे श्री हरतालिका व्रत. पार्वतीचे पिता दक्षराज यांना ही गोष्ट आवडली नाही त्यामुळे दक्ष प्रजापती यांनी महायज्ञ याग सत्रास आरंभ केला. सर्व देवांना आमंत्रण दिले परंतु शिव व पार्वतीला मात्र त्याने बोलावले नाही. ते ब्रम्हा विष्णू ज्याला वंदन करतात, वेद आणि शेष ज्यांचे स्तवन करतात अशा शिव जगदांपत्याचा शिवमहिमा जाणून न घेता दक्षराज रात्र दिवस शिवाची निंदा करीत असे. शिवाला तो देव मानत नसे. 

आपल्या पित्यांने महायज्ञ याग सत्र समारंभ आरंभिला असून सर्वांना आमंत्रणे केली, परंतु आपल्या पतीला व आपल्याला बोलाविले नाही म्हणून पार्वतीला अतिशय दुःख झाले. आपला पिता आपल्याला कदाचित विसरला असेल आमंत्रण येईल अशा आशेने दक्षकन्या पार्वती आतुरतेने कैलासात वाट पाहत होती. नंतर पार्वती शिवशंकराला म्हणाली हे प्राणनाथा माझ्या पित्यांनी आपल्या सदनी यज्ञयाग मांडला आहे, त्यांनी आपल्या सर्व कन्यांना सन्मानाने आमंत्रित केले आहे, मला आमंत्रण देण्यास ते कदाचित विसरले असावे. मात्र मला तिथे जावे असे वाटत आहे. पार्वतीचे उद्गार ऐकून शिव म्हणाले मृगलोचने गौरी तू मुळीच तिथे जावू नकोस तुझा पिता माझा द्वेष करतो हे शुभ नव्हे तु तिथे गेलीस तर तूझा पिता तुला देखील अपमानित करेल.

भगवान शिवशंकर अंबीकेला हे सांगत असताना देवऋषी नारदमुनी तिथे आले, नारदांनी त्यांच्या संवाद ऐकला होता. ते पार्वतीला म्हणाले देवी पित्यांच्या घरी जाण्यासाठी कन्येने मानपान पाहू नये. नारदाचे हे वचन ऐकून पार्वतीने दक्षराजाच्या दक्ष समारंभास जाण्याचा निश्चय केला लगेच पार्वती देवी बरोबर भूतगन घेवून नंदीवर बसून दक्षाच्या यज्ञयाग मंडपात आले. यज्ञ मंडपात सर्व देव आणि ऋषी ना दक्षराजाने सन्मानित बसवले होते. भवानी जगदंबा पार्वती आलेली पाहून सर्व देवांना व ऋषींना अत्यंत आनंद झाला, नंदी वरून उतरून पार्वती पित्याजवळ गेली. दक्षराजाने तिच्याकडे बघीतले सुध्दा नाही.

जगतमाता गुननिदान पार्वतीने आपल्या पित्यांच्या चेह-याकडे पाहिले तिला वाटले धुराने डोळे भरले म्हणून कदाचित आपल्याकडे त्यांची दृष्टी गेली नाही. नंतर पार्वतीने आपल्या सर्व बहिणींकडे बघितले. त्या सर्व बहिणींना राजाने सन्मानित केले होते. त्यादेखील पार्वतीशी बोलल्या नाहीत. नंतर पार्वतीने आपल्या आईकडे पाहिले. मात्र तीने सुध्दा पार्वतीकडे बघितले नाही.

पार्वतीचे मन अगदी खिन्न झाले, त्याचवेळी दक्ष प्रजापती म्हणाले ही कशाला ईथे आली, हिला ईथे कोणी बोलावले. कन्या पार्वती आणि जावाई शंकर माझ्या दृष्टी समोर नकोत असे बोलून आधी माया प्रणवरूपींनी,अनंतब्रम्हांडाची स्वामीनी, अर्पणादेवी पार्वतीचा दक्षाने अपमान केला. आधीशक्ती जगदंबा दक्षायिनी पार्वती या अपमानामुळे अत्यंत प्रोशहित संतप्त झाल्या. आकाशातुन प्रलय करणारे वीज धरणीवर अकस्मात पडावी त्याप्रमाणे पार्वतीने धगधगत्या यज्ञ कुंडात एकदम उडी घेतली. पुढे मग हिमालय पर्वताच्या उदरी त्रिपुर सुंदरी पार्वतीने अवतार घेतला.

आदीमाया प्रणवरूपीं पार्वती ही हिमालय पर्वताची कन्या झाली. यास्वरूप् सुंदर कन्येची ब्रम्हाडांत दुसरी प्रतिमा नव्हती. अष्टविनायकाच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगणाची सर येणार नव्हती तिच्या स्वरूपाचे वर्णन करण्याची शेषाला ही शक्ती नव्हती. तिच्या ठुमठूम टिळकामध्ये सुर्याचे तांबडे लाल बिंब देखील नम झाले होते. पार्वतीचा पिता हिमालय याने तिचा विवाह करण्याचे ठरविले, आपल्या स्वरूप सुंदर कन्येला विष्णूस दयावे असे नारदमुनीने सुचविले. हिमालयाला वाटले विष्णू हाच आपल्या मुलीला योग्य वर आहे, त्यांनी ही गोष्ट आपली कन्या पार्वतीला सांगितली, तेव्हा पार्वती म्हणाली त्रैल्योक्याचे अधोपती कैलाश आधीपती शंकर माझे पती व्हावेत हीच माझी इच्छा आहे.

भगवान शंकर हेच माझे जन्मोजन्मीचे पती आहेत, मी दुस-या कोणाला ही वर मानणार नाही. मुली शंकराला लोक गैर मानतात, हे मला ठाउक आहे. पण तो बहुत करून स्मशानात आढळतो, सर्वांगास राख लावतो, सापांचे अलंकार घालतो. तसेच कन्ये दक्षप्रजापती राजाला जावई म्हणून तो आवडला नव्हता व त्याच्या कन्येने त्याच्याशी लग्न केले म्हणून त्याने तिचा आणि कैलास नाथांचा अपमान केला होता. हिमालय उद्गरला तुझ्या सारखी स्वरूप भवती स़्त्री ही त्रिभूवनात कोणी नसेल, तुला मी श्री विष्णूस देणार आहे तोच तुला योग्य वर आहे. त्यावर कन्या पार्वती म्हणाली, नाही मी शिवशंकराला मनाने वरले आहे.

पार्वती ही शिवाची शक्ती आहे असे म्हणून पार्वती आपल्या सखीला घेउन अरण्यात निघून गेली. तेथे नदीकाठी बसून तिने वाळुचे शिवलिंग स्थापन केले. आपल्या सखीला बरोबर घेउन तिने शंकराची आराधना केली. शिवलिंगाची मनोभावे पुजा केली. संपुर्ण दिवस उपवास केला. भाद्रपद शुध्द त्रितेयेचा तो दिवस होता. 

हरतालिका पूजा कशी करावी व हरतालिकेची कहाणी (hartalika puja vidhi in marathi)
हरतालिकेची कहाणी (hartalika puja kahani in marathi)

पार्वतीची भक्ती पाहून शंकर बटुशेष करून तिच्या समोर झाले हे सुंदरी तु हे व्रत कोणत्या हेतूने केले आहेस यावर पार्वती म्हणाली कैलासनाथा श्री शंकर माझे पती व्हावेत म्हणून मी हे व्रत केले आहे. हे ऐकून बटुरूप शंकर म्हणाले तु तर हिमालय राजाची राजकन्या आहेस तुला तो वर मुळीच योग्य नाही. श्री विष्णू सर्वगुण संपन्न आहेत त्याला तु वर कर शंकराचा नाद तु सोडून दे कारण तो महान क्रोधी आहे, वाघाचे कातडे परीधान करतो, सर्पाची भुषने धारण करतो, स्मशनात वास्तव करतो.

त्यांच्या सभोवती भुतगन असतात म्हणून तुला मी हे सांगत आहे. हे त्या बटुचे वचन ऐकून पार्वती रागाने खवळली हे शिवनिंदका तु इथून चालता हो तुझे तोंड मला परत दाखवू नकोस. तु ब्राम्हण आहेस म्हणून, मी हे तुझे ऐकून घेतले नाहीतर मी तुला शिक्षा करणार होते. शिवशंकर हे तिचे उद्गार ऐकून संतुष्ट झाले व त्यांनी आपले स्वरूप प्रकट केले शिवशंकराना पाहताच पार्वती ने जयजयचंद्र मोळी असा जय जयकार करून त्यांचे चरण धरले.

शंकर प्रसन्न होउन त्यांना म्हणाले पार्वती तुला काय पाहिजे ते माग, ते ऐकून पार्वतीला अत्यानंद झाला ती म्हणाली हे जगताम्या, जगदीश्वरा तुझ्या अर्धांगी मला ठाव दे. त्यावर तथास्तु असे सांगुन श्री शंकर अंतरधान पावले जगदंबा पार्वती आपल्या पितृ सदनात गेली. सप्तऋर्षीनी शिवाला हिमाचलावर पाठवले हिमालयाने श्री शंकराचे आदराने पूजन केले. खरोखर शिव आणि पार्वती यांचा जोडा अनुरूप असा शोभणारा आहे. हे जे ब्रह्मदेवाने हिमालयाला सांगितले होते, ते त्याला पटले शिव गौरी चे त्यांनी लग्न लावून दिले.अशी ही पुराण कथा आहे तालिका म्हणजे सखी हरिता म्हणजे अरण्य. पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून ह्या व्रताला श्री हरतालिका व्रत हे नाव पडले.

सारांश – हरतालिकेची पूजा कशी करावी (Summary – hartalika puja vidhi in marathi)

हरतालिकेची पूजा कशी करावी या बाबत ची विस्तृत माहिती आपण वरील लेखामध्ये बघितली त्या प्रमाणे भक्ति भावाने ही पूजा केल्यास भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच आपण ही हरतालिकेची पूजा का केली जाते या बाबतची कहाणी बघितली ती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

आपल्याला ही हरितालिका पूजा माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top