गुरुत्वाकर्षण माहिती मराठी – गुरुत्वाकर्षण म्हणजे काय

गुरुत्वाकर्षण माहिती मराठी – गुरुत्वाकर्षण म्हणजे काय | गुरुत्वाकर्षण संशोधंनाचा इतिहास | गुरुत्वाकर्षणाचा नियम, सूत्र व महत्व >> गुरुत्वाकर्षण विषयी मराठीत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखामध्ये करणार आहोत. गुरुत्वाकर्षण चा शोध कोणी लावला तर आपल्या समोर जे नाव प्रकर्षाने येते ते म्हणजे न्यूटन. न्यूटन ने गुरुत्वाकर्षनाचा शोध लावला परंतु त्याच्या आधी देखील या सिद्धांतावर अनेक वैज्ञानिकांनी संशोधन केले होते.

हाच सर्व गुरूत्वाकर्षणाच्या सिद्धांता बाबतचा इतिहास, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, गुरूत्वाकर्षणाचा नियम व त्याचे सूत्र (फॉर्म्युला) काय आहे. भौतिक शास्त्रा मधील गुरूत्वाकर्षणाचे महत्व यांसारख्या गोष्टींची माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत.

गुरुत्वाकर्षण माहिती मराठी – गुरुत्वाकर्षण म्हणजे काय | संशोधंनाचा इतिहास | नियम, सूत्र व महत्व (gurutwakrshan(gravity)-information-in-marathi)

या लेखामध्ये आपण गुरुत्वाकर्षण माहिती मराठी बघणार आहोत,सुरवातीला गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात त्यानंतर गुरुत्वाकर्षणाच्या संशोधंनाचा इतिहास,गुरुत्वाकर्षणाचा नियम,सूत्र (फॉर्म्युला) व लेखाच्या शेवटच्या टप्प्यात भौतिक शास्त्रातील गुरुत्वाकर्षणाचे महत्व जाणून घेऊयात.

गुरुत्वाकर्षण हा टॉपिक शाळे पासून आपल्या सर्वांना शिकवला जातो आणि त्याचे महत्व आपल्या अभ्यासात तर आहेच पण दैनंदिन आयुष्यात देखील अनन्य साधारण आहे त्यामुळे तुम्हाला गुरुत्वाकर्षण समजणे खूप गरजेचे आहे.

गुरुत्वाकर्षण म्हणजे काय (What is gravity in marathi)

गुरुत्वाकर्षण माहिती मराठी जाणून घेण्यापूर्वी गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे आपल्याला समजणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात गुरुत्वाकर्षण म्हणजे काय.

पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीकडे ओढल्या जातात, या आकर्षणाला गुरूत्वाकर्षण म्हणतात. वर आकाशाच्या दिशेने फेकलेली कोणतीही वस्तु किंवा पदार्थ पृथ्वी च्या पृष्ठभागाकडे आकर्षिला जातो त्यालाच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. न्यूटनच्या सिध्दांतानुसार पृथ्वीवरील पदार्थाचे पृथ्वीच्या केंद्राशी असलेले आकर्षण आणि पृथ्वी आणि चंद्र यांमधील आकर्षक या दोन्ही आंतरक्रिया एकच आहेत. त्याचप्रमाणे अवकाशातील ग्रह, धुमकेतू, तारे आणि दिर्घिका यांमधील आकर्षणसुदधा गुरूत्वाकर्षणच असते. याचाच अर्थ दोन वस्तूंमधील किंवा पदार्थांमधील आकर्षण म्हणजेच गुरुत्वाकर्षण होय.

गुरुत्वाकर्षण माहिती मराठी - गुरुत्वाकर्षण म्हणजे काय |  संशोधंनाचा इतिहास | नियम, सूत्र व महत्व (gurutwakrshan(gravity)-information-in-marathi)
गुरुत्वाकर्षण माहिती मराठी

गुरुत्वाकर्षण माहिती मराठी – संशोधंनाचा इतिहास ( History of gravitational research in marathi)

प्राचीन भारतात काही तत्त्ववेत्यांनी गुरूत्वाकर्षणाचे अभ्यास केला होता. विशेषत: ब्रम्हगुप्ताने गुरूत्वाकर्षण बल आकर्षक असते असे तत्त्व मांडून त्याला गृहत्वाकर्षण असे नाव दिले होते. आर्यभटटाने पृथ्वीच्या घुर्णनामुळे पदार्थ न पडण्याचे कारण गुरूत्वाकर्षण आहे असे म्हटले होते. तसेच गृहांच्या कक्षा लंबवर्तूळाकार असतात असे दाखवले होते.

गुरूत्वाकर्षणाविषयी आधुनिक काभ गेंलिली गॅलिलीओच्या 1564-1642 संशोधनानंतर झाले असे म्हणण्यास हरकत नाही. गॅलिलीओंनी त्याच्या उतरणीवरून घरंगळणा-या पदार्थाच्या प्रयोगांदवारे वेगवेगळे पदार्थ सारख्याच वेगाने घरंगळतात असे सिदध केले त्यापूर्वी अॅरिस्टॉटलच्या सिदधांतानुसार अधिक वस्तूमान असलेल्या वस्तु अधिक वेगाने पृथ्वीवर पडतात असे मानले जात होते. त्यामुळे गॅलिलीओच्या प्रयोगांमधून निघणारा निष्कर्ष अॅरिस्टॉटल यांच्या सिदधांताशी सुंसंगत नव्हता असे समजले.

त्यापूर्वी योहानेस केलर 1571-1630 यांनी ग्रहांच्या सूर्याभोवती फिरण्याचे नियम संशोधीत केले. त्यांनी सिदध केले कि, ग्रहांच्या सुर्याभोवती फिरण्याच्या कक्षा लंबवर्तुळावर असतात गॅलिलीओच्या संशोधनाप्रमाणेच केल्पस्पे हे नियम न्यूटनच्या गुरूत्वाकर्षणाच्या नियमासाठी पायाभूत ठरले

सर आयझॅक न्यूटन यांनी या आकर्षक बलाचा अभ्यास करून गुरूत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध 1687 मध्ये लावला. या सिध्दांतानुसार पृथ्वीवरील पदार्थाचे पृथ्वीच्या केंद्राशी असलेले आकर्षण म्हणजे गुरुत्वाकर्षण होय.

गुरूत्वाकर्षणाचा नियम (Gravity Rule in marathi)

न्यूटनचा गुरूत्वाकर्षणाचा नियम:-  पृथ्वीवरील पदार्थाचे पृथ्वीच्या केंद्राशी असलेले आकर्षण आणि पृथ्वी आणि चंद्र यांमधील आकर्षक या दोन्ही आंतरक्रिया एकच आहेत. त्याचप्रमाणे अवकाशातील ग्रह, धुमकेतू, तारे आणि दिर्घिका यांमधील आकर्षणसुदधा गुरूत्वाकर्षणच असते.

न्यूटनच्या गुरूत्वाकर्षणाचा नियम वापरून ग्रह, उपग्रह, तारे आणि दीर्घिकांच्या गतीचा अभ्यास करून त्यांची भविष्यातील स्थिती जाणता येते त्यामुळे खगोलशास्त्रामध्ये गुरूत्वाकर्षणाचा नियम हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

गुरुत्वाकर्षण माहिती मराठी - गुरुत्वाकर्षण म्हणजे काय |  संशोधंनाचा इतिहास | नियम, सूत्र व महत्व (gurutwakrshan(gravity)-information-in-marathi)
गुरुत्वाकर्षण माहिती मराठी

न्यूटनच्या गुरूत्वाकर्षणाच्या नियमानुसार गुरूत्वाकर्षणाचे बल कोणत्याही दोन वस्तुमान असलेल्या पदार्थाच्या वस्तुमानांच्या समानुपाती असते आणि ते नेहमी आकर्षक असते.

गुरूत्वाकर्षणाच्या नियमानुसार m1  आणि  m2 वस्तुमाने असलेल्या दोन कणांमधील बल या दोन वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समानुपाती असते, त्या दोघांमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते आणि ते एका कणाकडून दुस-या कणाच्या दिशेने असते. गुरुत्वाकर्षणा वरुण आपल्याला हे समजते की, कोणतेही दोन कण एकाच बलाने एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यामुळे क्रिया आणि प्रतिक्रिया समान असतात हे सांगणारा न्यूटनचा तिसरा नियम गुरूत्वाकर्षणास लागू पडतो.

चार मुलभूत आंतरक्रियांपैकी गुरूत्वाकर्षण ही एक आंतरक्रिया आहे हे कणमौनिकीच्या मानक प्रतिकृतीनुसार स्पष्ट होते. मुलभूत आंतरकियांपैकी सबल अबल आणि विद्यूतचुंबकीय आंतरकिया क्षेत्र सिदधांतावर आधारीत आहेत आणि त्यांना क्वंटीन करण्यास यश आलेले आहे. परंतू गुरूत्वाकर्षणीय क्षेत्र क्वांटीन करण्यास अजून यश आलेले नाही.

गुरूत्वाकर्षणाचे सूत्र (फॉर्म्युला) व भौतिक शास्त्रा मधील गुरूत्वाकर्षणाचे महत्व (gravity formula & importance in marathi)

न्यूटन यांनी 1687 साली प्रिन्सिपिया या पुस्तकात गुरूत्वाकर्षणाचा ‘व्यस्त वर्गाचा नियम ‘ प्रसिदध केला या ग्रथांत न्यूटन यांनी म्हटले की, सूर्याच्या ग्रहांवर असणारे बल सूर्य आणि ग्रहांमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते अशा बलामुळेच ग्रहांची कक्षा लंबवर्तुळावर असते असे त्याने परिगणित केले. यापूढे त्याने परिगणनादवारे दाखवून दिले की, हाच व्यस्त वर्गाचा नियम वापरून पृथ्वीवरील गुरूत्वाकर्षणामुळे होणारे पदार्थांवरील त्वरणाचे पुर्वानुमान करता येते.

सुरूवातीस लिहील्याप्रमाणे दोन कणांमधील गुरूत्वाकर्षणाचा नियम F = [G (m1 m2)]/r2 n असा लिहीता येतो. येथे G गुरूत्वाकर्षणाचा स्थिरांक असून m1  आणि  m2 ही दोन कणांची वस्तूमाने आहेत हे दोन कणांमधील अंतर आहे आणि  f  आणि n   हे अनुक्रमे कणांवरील बल आणि एका कणापासून दुसऱ्या कणापर्यंत दिशा दाखवणारा एककी सदिश होतात.न्यूटनच्या नियमानुसार पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होणारे त्वरण GME/ R2 इतके असते. इथे ME आणि R हे अनुक्रमे पृथ्वीचे वस्तुमान आणि पृथ्वीची त्रिज्या आहेत. हे त्वरण पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेस कार्य करते.

गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक :- गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक (G) हा भौतिकी मधील एक मूलभूत स्थिरांक आहे.त्याचे मूल्य अनेक प्रयोगांद्वारे मोजलेले आहे.[गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक] ग्रह आणि सूर्याची वास्तुमाने आणि ग्रहांच्या भ्रमणाच्या कक्षा माहीत असल्याने न्यूटनला G चे मूल्य परिगणित करता आले.नंतर पृथ्वीवरील प्रयोगांद्वारे G च्या मूल्याचे अचूक मोजमाप करण्यात आले असून ते 6.67408 x 10-11 (m3 kg-1 S-2) आहे.

सारांश – गुरुत्वाकर्षण माहिती मराठी (Summary of gravity information in marathi)

गुरुत्वाकर्षण विषयी माहिती मराठीत या लेखामध्ये आपण गुरुत्वाकर्षणा ची जवळ जवळ सर्व माहिती जाणून घेतलीच आहे. भौतिक व खगोलशास्त्रा मध्ये गुरुत्वाकर्षण व त्याच्या सिद्धांताला अनन्य साधारण महत्व आहे. तुम्ही कोणत्याही शाखेचे विद्यार्थी असा तरी देखील गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमके काय हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ?

पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीकडे ओढल्या जातात, या आकर्षणाला गुरूत्वाकर्षण म्हणतात. वर आकाशाच्या दिशेने फेकलेली कोणतीही वस्तु किंवा पदार्थ पृथ्वी च्या पृष्ठभागाकडे आकर्षिला जातो त्यालाच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. न्यूटनच्या सिध्दांतानुसार पृथ्वीवरील पदार्थाचे पृथ्वीच्या केंद्राशी असलेले आकर्षण आणि पृथ्वी आणि चंद्र यांमधील आकर्षक या दोन्ही आंतरक्रिया एकच आहेत. त्याचप्रमाणे अवकाशातील ग्रह, धुमकेतू, तारे आणि दिर्घिका यांमधील आकर्षणसुदधा गुरूत्वाकर्षणच असते. याचाच अर्थ दोन वस्तूंमधील किंवा पदार्थांमधील आकर्षण म्हणजेच गुरुत्वाकर्षण होय.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपला काही सल्ला असल्यास तो देखील आम्हाला पाठवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top