ग्रामपंचायत घर नोंदणी अर्ज कसा करावा | सोबत कोणती कागदपत्रे जोडावी

waterdensor diya premium

ग्रामपंचायत घर नोंदणी अर्ज कसा करावा | सोबत कोणती कागदपत्रे जोडावी (gram panchayat ghar nondani arj)>> आपल्यातील अनेक जण कोणत्या न कोणत्या ग्रामपंचायत हद्दीत राहत असतील,किंवा काहींनी नुकतेच नवीन घर बांधले असेल. काही जणांचे जुनेच घर आहे पण त्याची अध्याप ग्रामपंचायत दफ्तरी नोंदणी केलेली नाहीये. अशा सर्वांसाठी ग्रामपंचायतीत घर नोंदणी कशी करावी हा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यासर्वांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत घराची नोंदणी कशी करावी या बाबत सर्व माहिती.

ग्रामपंचायत घर नोंदणी करण्यासाठी लिहायचा अर्ज | डाऊनलोड अर्ज | व सोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे (grampanchayat ghar nondani arj)

चला तर मित्रांनो जाणून घेऊयात घराची नोंदणी करण्यासाठी काय काय करावे लागेल. तुम्ही तुमच्या हाताने साध्या कोर्‍या कागदावर सरपंच व ग्रामसेवक यांच्या नावाने देखील अर्ज लिहू शकता व आम्ही खाली दिलेला अर्ज डाऊनलोड करून त्या अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज भरून त्या सोबत तुमच्या जागेची आवश्यक कागदपत्रे जोडून देखील ग्रामपंचायत मध्ये जमा करू शकता.

ग्रामपंचायत घर नोंदणी करण्यासाठी हाताने लिहावयाचा अर्ज

ग्रामपंचायत घर नोंदणी करण्यासाठी लिहायचा अर्ज | डाऊनलोड अर्ज | व सोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे (grampanchayat ghar nondani arj
ग्रामपंचायत घराची नोंदणी करण्यासाठी हाताने लिहावयाचा अर्ज
waterdensor diya premium

घर नोंदणी करण्यासाठी आपल्याला जो अर्ज लिहावा लागतो त्या अर्जाचा नमुना खालीलप्रमाणे :-

प्रति,

सरपंच / ग्रामसेवक

 विषयः-  माझ्या घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी होणेबाबत.

              वरील विषयास  अनुसरून आपणास, विनंती अर्ज करण्यात येतो की, मी माझ्या स्वतःच्या मालकीच्या गट नं. / ——- मिळकत नं.——-मध्ये नवीन घर बांधकाम / घर दुरुस्ती / घरकुल बांधकाम सन                  मध्ये केलेले आहे.

                        मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे

१) घराची लांबी ———- रुंदी ——— = ————–चौ.फुट

२) घराची दिशाः- पुर्वाभिमुखी / पश्चिमाभिमुखी / दक्षिणाभिमुखी / उत्तराभिमुखी

3) मिळकत वर्णन  :-   

अ) दगड विटा मातीचे घर / विटा वाळु सिमेंट यांचे लोंखडी / सिमेंट पत्राचे घर /

ब) आर.सी.सी घर

क) घराचा व्हरांडा

ड) शौचालय                      

    वरीलप्रमाणे सदर घराचे / मिळकतीचे वर्णन असुन घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी करणेत यावी व मला घराचा उतारा मिळावा हि नम्र विनंती ,

                                                                            आपला विश्वासू

                                         अर्जदाराचे नांव :- ——————————–

ग्रामपंचायत घर नोंदणी करण्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करा

खाली दिलेल्या “Download” या बटन वर क्लिक करून घराची नोंदणी करण्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करून घ्या,त्याची प्रिंट काढून तो भरा आणि त्या सोबत खालील प्रमाणे आपल्या जागेचे इतर कागदपत्र जोडा आणि ग्रामपंचायत दफ्तरी जमा करा.

सर्व प्रकारचे अर्ज internal Ad

अर्जा सोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

  1. जागेचा 7/12 उतारा
  2. जागेचे खरेदी खत / बक्षिस पत्र
  3. आणेवारी संमती पत्र
  4. चतुरसीमा (100 रु स्टँप)

सारांश – ग्रामपंचायत घर नोंदणी अर्ज

तुम्हाला ग्रामपंचायत दफ्तरी तुमच्या घराची नोंदणी होण्यासाठी ग्रापंचायतीला सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या नावे अर्ज करावा लागतो . त्यानंतर नजीकच्या काळात जी ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली जाईल, त्यामध्ये आपण दिलेला अर्जाचे वाचन केले जाते व योग्य ती कागदपत्र पहिली जातात. आणि त्यानंतर आपला अर्ज मंजूर केला जातो . या सर्व कृतींनंतर अपलाल्या आपल्या नावाचा ग्रामपंचायतीचा घरठाण उतारा दिला जातो.

ग्रामपंचायत घर नोंदणी अर्ज कसा करावा

तुम्हाला ग्रामपंचायत दफ्तरी घराची नोंदणी होण्यासाठी ग्रापंचायतीला सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या नावे लेखी अर्ज करावा लागतो,त्या लेखी आरजा मध्ये तुमच्या मिळकती च्या बाबतीत सर्व माहिती लिहलेली असावी जसे की, मिळकत म्हणजेच घराची लांबी,रुंदी,चतुरसीमा व इतर. त्याच बरोबर हाताने लिहलेल्या या अर्जा सोबतच तुम्हाला घर असलेल्या जागेचा सातबारा व 8 अ देखील जोडून द्यावा. घर नोंदणी साथी आपण हाताने लिहलेला अर्ज किंवा प्रिंटेड फॉरमॅट मध्ये असलेला अर्ज भरून दिला तरी चालते.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

2 thoughts on “ग्रामपंचायत घर नोंदणी अर्ज कसा करावा | सोबत कोणती कागदपत्रे जोडावी”

Comments are closed.

Scroll to Top