ग्रामीण भागातील व्यवसाय
उद्योगविश्व

ग्रामीण भागातील व्यवसाय,सुरवात-गुंतवणूक-नफा सर्व माहिती

Advertisement

ग्रामीण भागातील व्यवसाय>> लहान मोठा व्यवसाय / धंदा कोणताही असो तो जिद्दीने आणि चिकाटीने केला तर त्यात यश नक्की येते.आणि आता तर इंटरनेटचे युग आहे,इंटरनेट मुळे जगाच्या कोणत्याही काना-कोपऱ्यातून तुम्ही आपला व्यवसायाला जगभर ओळख देऊ शकता.

परंतु तूर्तास तरी आपण एखाद्द्या ग्रामीण भागातील तरुणाला उद्योजक होण्याची इच्छा असेल नोकरी करण्यापेक्षा एखादा लहान मोठा व्यवसाय / उद्योग धंदा करावासा वाटत असेल तर त्याला काय आणि कोणत्या प्रकारचे व्यवसाय करता येऊ शकतात त्या बद्दल बोलूयात. जाणून घेऊ या gramin bhagatil vyavsay konte ?

ग्रामीण भागातील व्यवसाय सूरु करताना तुम्हाला प्रथम खालील २ गोष्टींचा अभ्यास करावा लागेल.

१)तुम्ही सर्विस विकू इच्छिता का एखादे उत्पादन(वस्तू).
उदा. थोडक्यात सर्विस म्हणजे कोणतीही वस्तु भाडे तत्वावर देणे आणि उत्पादन म्हणजे एखादी नवीन वस्तू तुम्ही स्वतः बनवून विकणे.

२)तुम्हाला आधी तुमच्या भागातील लोकांच्या गरजा काय आहेत आणि त्या भागवण्या साठी त्यांना तुम्ही काय विकू शकता याचा सर्व्हे करणे गरजेचे आहे.

या २ गोष्टींचा अभ्यास केला की तुम्हाला कळेल की उद्योग / व्यवसाय कोणता करावा,व्यवसाय कसा करावा म्हणजे तो जास्त फायदेशीर होईल.

व्यवसाय करायचा म्हंटले की त्यासाठी लागतात या गोष्टी अनुभव, भांडवल, मार्केटिंग स्किल आणि मनुष्य बळ.पण काही व्यवसाय असे देखील आहेत की ज्या मध्ये ह्या गोष्टी नसल्या तरी देखील तुम्ही यशस्वीरीत्या व्यवसाय करू शकता.

Advertisement

आता आपण मुख्यतः ग्रामीण भागात तुम्ही कोण कोणते व्यवसाय करू शकता ते पाहू.सुरवातीला आपण तुम्हाला थोडीफार माहीती असलेले व्यवसाय बघू त्यानंतर तुमच्या साठी या लेखाच्या अंतिम टप्यात शून्य गुंतवणुकी मध्ये ग्रामीण भागातून करता येणारे काही व्यवसाय आणि बोनस व्यवसाय आयडिया आहेत.

मुख्य ११ ग्रामीण भागातील व्यवसाय

ऑनलाइन सर्विस सेंटर (ग्रामीण भागात चांगला चालणारा व्यवसाय)

 • तुम्हाला जर थोडे फार कॉम्पुटर चे ज्ञान असेल तरी तुम्ही ग्रामीण भागात ऑनलाईन सेंटर चालू करु शकता.
 • त्यासाठी खर्च कमीत कमी २० ते २५ हजार येईल आणि जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या हेतूने १लाख पर्यंत खर्च तुम्ही करू शकता.
 • सुरवातीच्या काळात तुमच्या कडे,कमी configuration असलेला कॉम्पुटर असला तरी काम होऊ शकते,आणि तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे एक प्रिंटर लागेल तो तुम्हाला ७ते ८ हजार रुपया पासून देखील उपलब्ध होईल.
 • हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट वापरता येणे गरजेचे आहे.
 • या अश्या ऑनलाईन सेंटर मधून तुम्ही अनेक कामे करू शकता जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड काढून देणे,सरकारी योजनांचे फॉर्म भरणे,नोकरीचे फॉर्म भरणे,लोकांचे ऑनलाईन PF चे फॉर्म भरणे,शाळकरी मुलांच्या प्रोजेक्ट च्या प्रिंट मारून देणे, झेरॉक्स काढून देणे यां सारखी अनेक कामे तुम्ही अश्या ऑनलाईन सेंटर च्या माध्यमातून करू शकता.
 • ह्या व्यवसाय मध्ये मार्जिन हे ७० ते ८०% च्या पेक्षा जास्त मिळू शकते.
 • ग्रामीण भागात ह्या गोष्टींची नेहमीच कमतरता असते अगदीच एखादे ऑनलाईन सेंटर आता तुमच्या गावात चालू जरी असेल तरी तुम्ही देखील चालू करू शकता आणि उत्तम रित्या व्यवसाय करू शकता.
 • तसेच ह्या व्यवसाया सोबतच तुम्ही मोबाईल व टीव्ही चे रिचार्ज,जनरल व्हरायटीज मध्ये असते त्या प्रमाणे वह्या,पेन,पेन्सिल,ग्रीटिंग यांसारखे प्रॉडक्ट देखील विकू शकता.

किराणा दुकान (ग्रामीण भागातील एक जुना व्यवसाय)

 • ग्रामीण भागात गावात किरणांचे दुकान हा तर खूप जुना व्यवसाय आहे परंतु त्याला तुम्ही नव्या पद्धतीने सुरू केला तर हा व्यवसाय देखील तुम्हाला चांगला फायदा करून देऊ शकतो.
 • आता नव्या पद्धतीने म्हणजे कसे तर तुम्ही सुरवातीला कमी फायद्या मध्ये विक्री केल्यास आणि दुकान व्यवस्थित आणि साफ ठेवल्यास तसेच दुकान कायम मालाने भरलेले असल्यास हा व्यवसाय नक्कीच तुम्हाला जास्तीचा नफा मिळवून देईल.

किराणा दुकान- ग्रामीण भागातील व्यवसाय
किराणा दुकान- ग्रामीण भागातील व्यवसाय

 • या धंद्या साठी सुरवातीला शक्यतो तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणाहून माल भरावा कारण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होलसेल मार्केट असते,तिथून माल घेतल्या मुळे तुमचा नफा वाढतो.
 • नंतरच्या काळात कमी प्रमाणात लागणार माल हा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणावरून घेतला तरी काही फारसा फरक पडत नाही.

हॉटेल/स्नॅक्स सेंटर

 • तुमच्या गावात किंवा तुमच्या गावाच्या शेजारी एखादे मोठे गाव असेल ज्याची लोकसंख्या साधारण ७०००-८००० किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही हॉटेल किंवा स्नॅक्स सेंटर चालू करू शकता.
 • ज्या मध्ये चहा,कॉफी,मिसळ,भेळ,वडापाव,समोसा,डोकळा, पोहे या सारख्या भरपूर खप असणारे पदार्थ तुम्ही ठेऊ शकता.
 • हॉटेल व्यवसायामध्ये जवळ पास ५०% मार्जिन असते.

बेकरीचा व्यवसाय

 • आपल्या गावाच्या जवळ एखादे जिल्ह्याचे ठिकाण असेलच की,किंवा तालुका पण चालेल जिथून तुम्ही सुरवातीच्या काळात होलसेल किंमती मध्ये बेकरी चा माल विकत घेऊ शकता आणि आपल्या गावात विकू शकता.
 • आणि ज्या वेळेस चांगला प्रतिसाद मिळेल त्या वेळी तुम्ही स्वतः एक एक बेकरी प्रॉडक्ट बनवून विकू शकता.
 • या व्यवसायाला देखील ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
 • केक,क्रीम रोल,पाव, ब्रेड, खारी, टोस्ट,बिस्कीट,नानकेट असे आणखी बरेच पदार्थ या व्यवसायाच्या अंतर्गत तुम्ही विकू शकता.

फळे,भाजीपाला विक्री व्यवसाय

 • हा व्यवसाय तुम्हाला जुना वाटेल परंतु या मध्ये देखील तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.
 • फळे व भाजीपाला विक्री हा व्यवसाय तुम्ही जेवढे जास्त कष्ट घ्याल तेवढे जास्त उत्पन्न तुम्हाला मिळवून देईल.
 • सुरवातीच्या काळात तुम्हाला ह्या व्यवसाया मध्ये जास्त पैसे गुंतवण्याची देखील आवश्यकता नाही.

फळे,भाजीपाला विक्री व्यवसाय
फळे,भाजीपाला विक्री व्यवसाय

 • सुरवात कशी कराल:-आपल्या गावातील किंवा जवळच्या गावातील शेतकऱ्यानं कढून तुम्ही कांदा, बटाटा,वांगे,शेवगा,मिरची,भोपळा,टोमॅटो,गवार यांसारखी तरकारी तसेच भाजीपाला आणि फळे घेऊ शकता.किंवा जवळच्या तालुक्याच्या ठिकाणा वरील मार्केट कमिटी मधून तुम्ही लिलावात माल घेऊ शकता.
 • हा घेतलेला माल व्यवस्थित विलगीकरन करून तुम्ही डायरेक्ट जिल्ह्याच्या मार्केट ला देखील पाठवू शकता किंवा एक गाडी ठेऊन फिरत्या स्वरूपात मोठ्या गावांच्या आठवडे बाजारात देखील विकू शकता.
 • या व्यवसाया मध्ये एकाच गोष्टीची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे तुम्ही घेणार माल हा नाशवंत असतो त्यामुळे तो ठराविक कालावधी मध्ये विकला गेलाच पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल.

साहित्य भाड्याने देण्याचा व्यवसाय

 • आपल्या गावा मध्ये एखादे लग्न,साखरपुडा, जागरण गोंधळ किंवा देवाचा भंडारा चा कार्यक्रम असुद्या या सगळ्या कार्यक्रमात लागणारे सर्व भांडे, मंडप, डेकोरेशन चे सामान, जनरेटर किंवा लाइट च्या माळा यांच्या सारख्या वस्तू तुम्ही भाड्याने देऊ शकता.
 • हा व्यवसाय लहान जरी वाटत असला तरी ह्या मधून देखील तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.
 • ह्या व्यवसायात तुम्हाला फक्त एकदा पैसे गुंतवावे लागतात ते म्हणजे हे सर्व सामान घेण्यासाठी नंतर तुम्हाला इतर जास्त काही खर्च येत नाही.

ब्युटी सलून- स्त्रीयांसाठी घरगुती व्यवसाय

 • छान दिसणे,किंवा चांगला मेकअप करणे प्रत्येकालाच आवडते त्या मुळे हा व्यवसाय ग्रामीण भागात देखील आता जोर धरत आहे.
 • आपल्या घरातील स्त्री साठी जर तुम्ही चांगला घरगुती व्यवसाय शोधत असाल तर हा व्यवसाय तुमच्या साठी अत्यंत चांगला पर्याय होऊ शकतो.
 • या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त एकदाच पैश्यांची गुंतवणूक करावी लागते.
 • घरातील सर्व कामे करून देखील महिला हा व्यवसाय उत्तम रित्या करू शकते.हा एक कमी गुंतवणुकी मध्ये फायदेशीर असा व्यवसाय आहे.

आर ओ वॉटर फिल्टर

 • जलप्रदूषणा मूळे आज जवळ जवळ प्रत्येक गावात पिण्याचे पाणी हे अशुद्ध झाले आहे. त्यामुळे आर.ओ. वॉटर फिल्टर प्लांट हा एक चांगला व्यवसाय म्हणून आज प्रत्येक गावात जोम धरताना पाहायला मिळत आहे.
 • काही गावांमध्ये तर २-४ वॉटर फिल्टर झालेले आहेत.तुमच्या गावात जर फिल्टर नसेल तर तुम्ही तो चालू करू शकता.
 • तसेच त्याच्या सोबतीला तुम्ही जर मोबाईल व्हॅन म्हणजेच फिल्टर केलेलं पाणी पोहच दिले तरी तुमचा व्यवसाय मोठा होयला वेळ लागणार नाही.

Advertisement
आर ओ वॉटर फिल्टर - ग्रामीण भागातील उत्तम व्यवसाय
आर ओ वॉटर फिल्टर व्यवसाय

 • ह्यासाठी तुम्हाला कमीत कमी २ ते ३ लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल.
 • हा व्यवसाय म्हणजे आजमितीला सर्व गाव पातळी वर जोरात चालत असलेला व्यवसाय आहे.
 • ज्या ज्या ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे तिथे तुम्हाला हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो.

शेतीस आवश्यक वस्तू/अवजारांचे दुकान

 • ग्रामीण भागात दैनंदिन लागणाऱ्या वस्तूं मध्ये शेतीशी निगडित वस्तू देखील येतात.
 • तुमच्या गावाची लोकसंख्या जर ५०००-६००० पेक्ष्या जास्त असेल तर तुम्ही हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता.
 • शेतीशी निगडित ट्रॅक्टरची अवजारे,पाइपलाइन चे मटेरियल,खते यांच्या सारख्या वस्तू ह्या ग्रामीण भागात रोज लागत असतात आणि ह्या जर तुम्ही गाव पातळी वर उपलब्ध करून देऊ शकला तर तुमचा हा व्यवसाय सेट होयला फारसा कालावधी लागणार नाही.
 • ग्रामीण भागातील व्यवसाय बघायचे म्हंटले तर हा एक उत्तम आणि भरपूर फायदेशीर व्यवसाय असू शकतो.

फोटोग्राफी

फोटोग्राफी - ग्रामीण भागातील व्यवसाय
फोटोग्राफी – ग्रामीण भागातील व्यवसाय

 • तुम्हाला जर फोटोग्राफी क्षेत्रात आवड असेल तर तुम्ही तो व्यवसाय देखील आपल्या स्वतःच्या गावात चालू करू शकता.
 • कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा हा व्यवसाय आहे.
 • सुरवातीला जर तुम्हाला ह्या व्यवसायाचे काहीच माहिती नसेल पण तुम्हाला आवड आणि जिद्द असेल तर तुम्ही एखादा चांगला फोटोग्राफी चा व्यवसाय करणाऱ्या कडे क्षुल्लक पगारात किंवा बिनपगारी का होईना सर्व मूलभूत गोष्टी शिकून घेणे गरजेचे आहे.
 • ह्या व्यवसाय साठी तुम्हाला सुरवातीला गुंतवणूक आहे नंतर ह्या मध्ये गुंतवणूक करावी लागणार नाही.
 • आपले स्वतःचे फोटोग्राफी चे दुकान तुम्ही गावात चालू केल्यास तुम्हाला गावातील लग्न,वाढदिवस, सत्कार समारंभ,शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम यांसारख्या कार्यक्रमाच्या ऑर्डर मिळू शकतात.
 • हा व्यवसाय थोड्या कालावधी मध्ये तुम्हाला चांगला फायदा करून देऊ शकतो.

आइस्क्रीम पार्लर

 • आजकाल लोक उन्हाळा असो वा पावसाळा आइस्क्रीम खात असतात.हा व्यवसाय देखील आता ग्रामीण भागात चांगला चालू शकतो.
 • तुमच्या गावात किंवा जवळपास कुठं असे आइस्क्रीम चे शॉप नसेल तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता.
 • अनेक मोठं मोठ्या ब्रॅण्ड च्या कंपन्या या फ्रँचायजी द्यायला तयारच बसलेले आहेत तुम्हाला फक्त ते घेण्याची आवश्यकता आहे. फ्रँचायजी घेऊन तुम्ही मोठा व्यवसाय करू शकता.

आइस्क्रीम पार्लर
आइस्क्रीम पार्लर

 • हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला जरा जास्त प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल.
 • एक सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे आइस्क्रीम पार्लर जर तुम्हाला चालू करायचे असेन तर साधारण कमीत कमी 5लाख रुपयांच्या आसपास खर्च येऊ शकतो.
 • गावची लोकसंख्या आणि गावातील लोकांचा अभ्यास करूनच हा व्यवसाय निवडावा.

शून्य गुंतवणुकी मध्ये करता येणारे ग्रामीण भागातील व्यवसाय

Youtube

Advertisement
 • युट्युब वर विडिओ अपलोड करून देखील आपण पैसे कमवू शकता.
 • आपल्याला जर शेतीची आवड असेन तर आपण शेतीशी निगडित विडिओ बनवुन ते युट्युब वर अपलोड करा,त्याला लोक बघतील आणि त्यामध्ये गूगल जे काही जाहिरात दाखवेल त्याच्यातुन तुम्ही पैसे कमवू शकता.
 • या साठी युट्युब च्या काही अटी आहेत त्यांचा आपल्याला आधी अभ्यास करावा लागेल तो केल्या शिवाय आपण विडिओ बनवू नये.

Affiliate Marketing (ऍफिलियेट मार्केटिंग)

Affiliate Marketing (ऍफिलियेट मार्केटिंग) - ग्रामीण भागातून करता येणारा व्यवसाय
Affiliate Marketing (ऍफिलियेट मार्केटिंग)

 • ऍमेझॉन,फ्लिपकार्ट या सारख्या अनेक कंपन्या आहेत ज्या ऑनलाईन वस्तू विकतात.तुम्ही अश्या कंपन्या सोबत भागीदारी करून त्या वस्तू तुम्ही विकू शकता.
 • तुमच्या सोशल मीडिया च्या माध्यमातून या वस्तू तुम्ही विकू शकता आणि त्या विकल्या बद्दल तुम्हाला कमिशन मिळते.त्यालाच ऍफिलियेट मार्केटिंग असे म्हणतात.
 • हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही गुंतवणुकीची आवश्यकता नाही.
 • अश्या प्रकारच्या कोणत्याही कंपनी सोबत अश्या प्रकारची भागीदारी करण्या पूर्वी त्या कंपनी च्या अटी तुम्ही वाचून समजून घेणे अपेक्षित आहे.

या शून्य गुंतवणुकीच्या व्यवसायां व्यतिरिक्त तुम्ही घर बसल्या शून्य गुंतवणुकीमध्ये Free Lancing द्वारे देखील काम करून पैसे कमवू शकता. तुम्हाला जे काही काम करता येते ते तुम्हाला इथे मिळेल ते तुम्हाला तुमच्या घरून पूर्ण करून द्यायचे असते. या साठी तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीची आवश्यकता नाही.

बोनस व्यवसाय आयडिया

वरील सर्व तुम्हाला थोडी बहुत माहिती असणाऱ्या ११ व्यवसायाची माहिती तुम्हाला दिल्या नंतर आता आम्ही तुम्हाला एक बोनस आयडिया देत आहोत हा ग्रामीण भागातील व्यवसाय तुम्ही कमी खर्चात करू शकाल आणि आपल्या घरातून करू शकता.

Advertisement

मोबाईल कव्हर प्रिंट करण्याचा व्यवसाय

 • हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातून देखील करू शकता.
 • ह्या साठी गरजेचे आहे ते एक कॉम्पुटर,एक sublimation मशीन,एक प्रिंटर आणि काही नवीन कंपन्यांचे मोबाइल चे ब्लॅंक(काहीही प्रिंट न केलेले) कव्हर.
 • हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला जवळ पास ६०-७० हजार रुपये खर्च येईल.
 • तुमची ह्या केलेल्या खर्चाची तुम्हाला सुरवातीच्या अवघ्या २ ते ३ महिन्यात नफ्याच्या स्वरूपात परतफेड होईल याची शाश्वती आहे.
 • हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला फोटोशॉप हे सॉफ्टवेअर वापरता यायला हवे.

मोबाइल कव्हर प्रिंटिंग - ग्रामीण भागातील व्यवसाय
मोबाइल कव्हर प्रिंटिंग

 • तुमची विक्री:-तुम्ही customize म्हणजेच लोकांचे(गिऱ्हाईकाचे) स्वतःचे फोटो मोबाईल च्या कव्हर वर प्रिंट करू शकता.तसेच तुम्ही काही डिजाईन ह्या स्वतः करून ते कव्हर प्रिंट करून ऑनलाईन ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईट वर देखील विकू शकता.
 • ह्या अश्या प्रिंट केलेल्या कव्हर ला आपण डायरेक्ट दुकानातून किंवा इतर मोबाइल दुकानदारांना होलसेल किंमती मध्ये विकू शकता.
 • हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला दुकानाची आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या घरातून देखील हा व्यवसाय करू शकता.

तात्पर्य

वरील सर्व व्यवसाय हे ग्रामीण भागात करता येण्या जोगे आहेत. यातील कोणताही बिजनेस तुम्ही करू शकता,त्यासाठी तुम्हाला चिकाटीने आणि टिकून राहून व्यवसाय करावा लागेल.वरील सर्व व्यवसाय हे कमीत कमी गुंतवणुकीत होण्यासारखे आहेत.

आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट मध्ये सांगा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Advertisement

1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अजित पवार (1) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)

Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

11 Replies to “ग्रामीण भागातील व्यवसाय,सुरवात-गुंतवणूक-नफा सर्व माहिती

  1. तुमच्या जवळ पास च्या २५ किमी मधील मोठ्या गावांना भेटी द्या. त्या गावांमधील मोबाइल विक्री करणार्‍या दुकानदारांना भेटा त्यांना होल सेल किंमती मध्ये प्रिंट केलेले कव्हर द्या. तसेच amazon flipkart यांसारख्या कंपनी च्या वेबसाइट वर देखील तुम्ही कव्हर विकू शकता. ह्या व्यवसायला भरपूर मार्केट आहे तुमची व्यवसाय करायची जिद्द असेल तर नक्की यश मिळेल.तुम्हाला तुमच्या भावी व्यवसायासाठी शुभेछ्या.

 1. Howdy! I could have sworn I’ve visited your blog
  before but after looking at many of the posts I realized it’s new to
  me. Regardless, I’m definitely happy I stumbled upon it and I’ll be book-marking it
  and checking back often!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत