गोपाळकाला माहिती मराठी (Gopalkala Mahiti Marathi)
सण उत्सव शुभेच्छा

गोपाळकाला माहिती मराठी – श्रीकृष्ण जन्माष्टमी | गोपालकाला/ दहीहंडी उत्सव – संपुर्ण माहिती

गोपाळकाला माहिती मराठी (Gopalkala Mahiti Marathi) >> गोपाळकाला या सणाला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मा निमित्त साजरा होणारा हा सण असून भारतातील उत्तरेकडील भागात श्रीकृष्णाला मानणारा समुदाय जास्त आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये देखील गोकुळाष्टमी / गोपाळकाला हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

या लेखामध्ये गोपाळकाला या सनाविषयी विस्तृत माहिती आपण बघणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात गोपाळकाला माहिती मराठी.

गोपाळकाला माहिती मराठी (Gopalkala Mahiti Marathi)

लेखाच्या सुरवातीला गोपाळकाला सण का साजरा करण्यात येतो ते आपण जाणून घेऊयात त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचा जन्म व बालपण या बाबत माहिती आणि शेवटी आपण हा गोपाळकाला सण भारतात कसा साजरा करतात ते पाहुयात.

गोपाळकाला माहिती – गोपाळकाला सण का साजरा करतात

मित्रांनो श्रावण महिन्यांतील अष्टमीला सर्वत्र कृष्ण जन्माअष्टमी साजरी केली जाते. मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. आणि म्हणूनच मध्यरात्री 12 वाजता बाळ कृष्णाची मुर्ती पाळण्यात ठेवून त्यांची पुजा केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिदुंचा महत्वाचा सण आहे. श्रीकृष्ण जन्माचे स्मरण ठेवण्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.

भगवान श्रीकृष्ण जन्माचा इतिहास व गोकुळातील त्यांचे वास्तव्य

भगवान श्रीकृष्णाचा मथुरा नगरीमध्ये माता देवकी व पिता वासुदेव यांच्या पेाटी जन्म झाला होता. ते भगवान विष्णुचा आठवा अवतार होते. असेही मानले जाते. दुष्ट कंस मामाचा वध करण्यासाठी भगवान विष्णुने अवतार घेतल्याने यास कृष्णवतार असेही म्हटले जाते.

देवतीच्या उधरी जन्मलेल्या कृष्णाला वासुदेवाने कंसाच्या भितीने रात्रोरात गुप्त पणे गोकुळात यशोदेकडे पोहचविले.गोकुळात कृष्ण जन्मामुळे आनंदीआंनद झाला दृष्टीचा पालन करता विष्णूने या दिवशी आपल्या आठव्या अवतारात श्रीकृष्णाच्या रूपात जन्म घेतला.

गोपाळकाला माहिती मराठी  (Gopalkala Mahiti Marathi)
गोपाळकाला माहिती मराठी (Gopalkala Mahiti Marathi)

भगवान श्रीकृष्णाचे बालपण गोकुळात गेले. माता यशोदा व पिता नंद हे त्यांचे पालनकर्ते होते. गोकुळात श्रीकृष्णांनी लहान वयात अनेक कृष्णलीला दाखवल्या.

गोकुळामध्ये त्यावेळी श्रीकृष्ण हे गोपीकांचे लाडके बनले होते. श्रीकृष्णाने बालपणी गोकुळ वृदांवनातील असंख्य गोपगोपीकांना आपल्या रूपांनी आकर्षित केले. मधुर बासरीने वेड लावले.

गोकुळामधील श्रीकृष्ण लीला
गोकुळामधील श्रीकृष्ण लीला

श्रीकृष्ण जन्माष्टमी / गोपाळकाला (दहीहंडी) सण कसा साजरा करतात

भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा श्रावणातील अष्टमीला झाला होता व त्यारात्री रोहीणी नक्षत्राच्या शुभकाळ होता. ज्या – ज्या वर्षी हा योग जुळून येतो. त्या वर्षाची गोकुळअष्टमी सर्वात शुभ मानली जाते.

श्रीकृष्ण जन्माष्टमीला हिंदू लोक खुप महत्त्व देतात. या दिवशी लोक रात्रभर जागरण करतात. श्रीकृष्णाचे भजन, किर्तन, आरती इ. करतात. दिवसभर उपवास करून श्रीकृष्णाची मंदीरे या दिवशी आकर्षक फुलांनी, दिव्यांनी सजवली जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुस-या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजीत केला जातो. अनेक लोक मोठया आनंदाने यामध्ये सहभागी घेतात. लोक वाईट शक्तीपासून तारणारा देव म्हणून कृष्णास मानतात.

गोपाळकाला माहिती मराठी  (Gopalkala Mahiti Marathi)
गोपाळकाला माहिती मराठी (Gopalkala Mahiti Marathi)- श्रीकृष्ण पाळणा

श्रीकृष्ण जन्मसोहळा विधि रात्री 12 वाजता साजरा केला जातो. भजन, र्कितन, इ. कार्यक्रम मंदीरात आणि घराघरात आयोजित केले जातात. मध्यरात्री पाळण्यात श्रीकृष्णाची छोटी मुर्ती घालून सजवलेला पाळणा हलवला जातो. विविध गाणी, भजने, गाउन जन्मोत्सव साजरा होतो. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची मुर्ती किंवा प्रतिमेला दुधांचा अभिषेक करावा. त्यानंतर श्रीकृष्णाची पुजा करून घ्यावी हे झाल्यानंतर खाली दिलेला जप करावा.

‘ओम कृष्णाय विद्यहे बलभद्राय धिम् र्ही।
तन्नो विष्णु प्रचोदयात ।। ‘
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।

श्रीकृष्णाने कर्माचे महत्त्व गीते द्वारे सांगीतले आहे, आपल्या कर्तव्यामध्ये कधीही कसुर करू नये. हा संदेश समाजाला दिला.श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करीत रहावे. फळांची किंवा कोणत्याही लाभची अपेक्षा ठेवू नये नक्कीच भगवान कृष्ण आणि त्यांनी जिवनात पेरलेली कृष्ण नीतीस सर्वाच्या जीवनासाठी अमुल्य आहे.

कृष्ण जन्माष्टमी हा प्रमुख हिंदु सण आता केवळ भारत देशातच नाही तर नेपाळ बांग्लादेश इ. देशातही कृष्ण भक्तांकडून मोठया उत्साहात साजरा केला जातो.

श्रीकृष्ण प्रसन्न होउन भक्तांच्या जीवनांतील सर्व कष्ट दुर करतात असे पुराण सांगतात. भारताच्या अनेक राज्यांमध्ये हा श्रीकृष्ण जन्माचा सण गोकुळकाला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मथुरा, गोकुळ, वृदांवन पुरी, दवारकादेश क्षेत्रातील गोकुळ अष्टमी सण नेहमीच नजरेत साठवून ठेवावा असा साजरा केला जातो. कोकणात व महाराष्ट्रात उत्सवानिमित्त्य दहीकाला होतो व दहीहंडया फोडतात. उत्तरप्रदेश मध्ये या दिवशी रासलिला खेळतात. रंग उडवून आनंद व्यक्त केला जातो. दुस-या दिवशी नंदउत्सव साजरा होतो.

त्याचप्रमाणे दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुस-या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी च्या या उत्सवात तरुण एक संघ तयार करून दहीहंडी वरती लाऊन ती थर लाऊन फोडतात. आज प्रत्येक गल्ली मध्ये मंडळे तयार झाली आहेत. या उत्सवा दरम्यान उंचावर दहयाने भरलेली हंडी लावले जाते. ही हंडी तरूणांची विविध मंडळे फोडण्याचा प्रयत्न करतात. हा एक प्रकारचा खेळ आहे ज्यात बक्षीसही दिले जाते.  दहीहंडी या वर्षी ०७ सप्टेंबर या दिवशी आहे.

दहीहंडी उत्सव - गोपाळकाला
दहीहंडी उत्सव – गोपाळकाला

श्रीकृष्णाला बालपणी दही, दुध, लोणी या पदार्थाची आवड होती. पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असे तो त्याच्या मित्रांमुळे यासाठी त्याचे मित्र त्याला मदत करत असत. याघटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातेा.

यावेळी संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी वेगवेगळया धार्मिक पंरपरेनुसार दहीहंडी साजरी करण्यात येते. दहीहंडीची प्रक्रिया अंत्यत मजेशीर असते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इ. भरून एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते.

याला फोडण्याचा विविध तरूण मंडळी प्रयत्न करतात दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरूण एक दुस-याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनो-याच्या सर्वात वरच्या थरावर असतो. तो गोविंदा तो आपला तोल सांभाळून हंडी फोडतो. हंडी फोडणा-या मंडळाला विविध भेटवस्तु देउन गौरविण्यात येते.

सारांश – गोपाळकाला माहिती मराठी (Gopalkala Mahiti Marathi)

गोपाळकाला सण का साजरा करतात इथ पासून ते या सणाच्या साजरा करण्याच्या विविध पद्धती व गोपाळकाला सणाची जवळपास सर्वच माहिती वरील लेखामध्ये देण्याचा प्रयत्न केलाला आहे. भारताच्या विविध भागामध्ये त्या त्या भागातील परंपरेनुसार हा सण साजरा केला जातो.हिंदू धर्मामध्ये या सणाला खूप महत्व आहे.

आपल्याला ही गोपाळकाला माहिती कशी वाटली आम्हाला जरूर कळवा तसेच आपल्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *