गॅस सिलेंडर बाबत ही माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.

गॅस सिलेंडर ची माहिती – जागरूक व्हा

प्रकाश ला मागच्या महिन्यात असेच एक दिवस सुट्टी होती, त्यामुळे घरात असताना गॅस संपल्यावर नवीन सिलेंडर जोडायचा योग आला. उचलताना वजन कमी वाटले म्हणुन जिज्ञासेपोटी घरातल्या डिजिटल काट्यावर त्याने वजन केले.

ते सव्वा दोन किलोने कमी भरले. गॅस एजन्सीत तक्रार केली असता ही तुमची चुक आहे सिलेंडर घेताना वजन करुन घ्यायचा असतो. डिलीवरी देणाऱ्याकडे काटा असतो असे उत्तर मिळाले.

आणि आज योगायोगाने नेमका परत प्रकाश घरी असताना सिलेंडर आला. वजन करून दाखव असे प्रकाश म्हणताच सिलेंडर देणारा गडबडला. हा सिलेंडर लीक आहे, दुसरा आणतो या बहाण्याने तो परत घेउन गेला.

बराच वेळ परत न आल्यामुळे उत्सुकतेने प्रकाश खाली गेला तर गाडी गेली होती. गेटच्या बाहेर गाडी लावुन त्यांचा योग्य वजनाच्या सिलेंडरचा शोध सुरू होता.

साधारण दहा पंधरामधे एकही सापडला नाही. नंतर दहा पंधरा मिनिटांनी एक सिलेंडरडिजीटल वजनकाटा घेऊन स्वारी आली व वजन दाखवुन सिलेंडर दिला. साहेब काय करणार कंपनीकडूनच कमी भरुन येतो. तुमच्या समोरच सील खोलले ही सारवासारव.

प्रकाश च्या मनात विचार येऊन गेला, मागील पधरा वर्षे आपण गॅस वापरतोय पण कधीही वजन करून घेतला नव्हता किती बरे नुकसान झाले असेल? प्रकाश सारखेच सर्वानी वजनाचा आग्रह धरलाच पाहिजे ते प्रत्येक ग्राहकाचे कर्तव्य आहे.

कंपन्या अशी फसवणूक करत असतील तर सबसिडी का नाकारायची?
क्रुपया सिलेंडर घेताना वजन तपासून पहा….
एलपी.जी.गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते
आपण ही आजचं तपासा.

जर आपल्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली असेल तर तो गॅस सिलेंडर म्हणजे आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे, त्यामुळे खालील सुचना वाचून आपल्या गॅस वितरकाशी खात्री करा आणि सुरक्षित रहा कारण आपलं जीवन आपल्या घरच्यांकरता मौल्यवान आहे

गॅस सिलेंडर ची माहिती – कशी ओळखाल आपला गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट

सिलेंडरच्या पकडण्यासाठी जी गोल लोखंडी रिंग असते. त्याच्या खाली तीन रंगाच्या पट्ट्या असतात. त्यातील काळ्या रंगाच्या पट्टीवर गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते. यावर A,B, C आणि D अक्षर असल्याचे स्पष्ट होते.

तसेच या अक्षरांसोबत दोन अंक लिहिले असतात. या अक्षरांवरुन सिलेंडर ची एक्सपायरी डेट लक्षात येते

गॅस  सिलेंडर, gas cylinder - गॅस सिलेंडर ची माहिती
सिलेंडर , gas cylinder

उदाहरणार्थ:-

A – जानेवारी ते मार्च

B – एप्रिल ते जून

C – जुलै ते सप्टेंबर

D – अॉक्टोबर ते डिसेंबर

  • या शब्दांनंतर जे दोन अंक लिहिले आहेत त्यावरून हे लक्षात घ्यावे!!!
  • समजा आपल्या सिलेंडरवर A20 लिहिले असेल तर त्या सिलेंडरची एक्सपायरी डेट आहे मार्च 2020. म्हणजे हा सिलेंडर मार्च 2020 नंतर वापरणे गृहिणीसाठी घातक आहे.

गॅस सिलेंडर बाबत अधिक माहिती साठी विडियो

कृपया याबाबत आपल्या गॅस वितरकाशी संपर्क करुन माहिती घ्या.आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top