घरबसल्या काम | घरी बसून स्वतंत्ररित्या काम करून कमवा पैसे | Freelancing...
उद्योगविश्व

घरबसल्या काम | घरी बसून स्वतंत्ररित्या काम करून मिळवा पैसे | Freelancer Websites

Advertisement

घरबसल्या काम | घरी बसून स्वतंत्ररित्या काम करून कमवा पैसे >> आता कोरोना मुळे बर्‍याच कंपन्या मध्ये वर्क फ्रॉम होम चालू आहे. पण बर्‍याच लोकांच्या नोकर्‍या देखील गेलेल्या आहेत तर काहींचे व्यवसाय बंद पडलेत. अशा परिस्तिथित अनेक तरुणांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

ह्याच गोष्टींचा विचार करून आज आम्ही आपल्या साठी घरबसल्या काम मिळवून देणार्‍या काही वेबसाइट ची यादी घेऊन आलो आहे ज्याच्यावर तुम्हाला घरबसल्या काम मिळू शकते व तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकेल.

या लेखा मध्ये तुम्हाला घरबसल्या काम मिळवून देणार्‍या Freelancing Websites बद्दल सर्व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल जसे की Freelancing Website म्हणजे काय ? त्या कसे काम करतात? आर्थिक नफा कसा मिळतो ? Freelancing Websites ची लिस्ट.

Freelancing Websites म्हणजे काय ? त्यावर घरबसल्या काम कसे मिळते

Freelancing वेबसाइट वर तुम्ही रजिस्टर करताना तुम्हाला तुमच्या कडे कोणती कला आहे किंवा कोणते काम तुम्ही उत्तमरीत्या करू शकता ही सर्व माहिती द्यावी लागते.म्हणजे तुम्ही जसे कुठे जॉब मिळवण्यासाठी तुमचा रेज्युम बनवून कंपनी मध्ये देता तसेच तुम्हाला ऑनलाइन करायचे आहे.

अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर तुम्ही आज पर्यन्त केलेल्या कामाचा अनुभव तसेच त्याची काही माहिती किंवा सर्टिफिकेट तुमच्या कडे असेल तर ते देखील तुमच्या प्रोफाइल ल अपडेट करा.

Freelancing वेबसाइट वर ज्या प्रकारे तुम्ही काम शोधत आहात त्याच प्रमाणे विविध कंपन्या देखील अशा वेबसाइट वर त्यांचे काम करण्यासाठी स्टाफ शोधत असतात. तुम्हाला अशा जॉब ला किंवा कामांना Apply करायचे आहे. तुम्ही Apply केल्यानंतर कंपनी / किंवा ज्याने काम पोस्ट केले आहे ती व्यक्ति तुमची प्रोफाइल बघेल व जर त्यांना तुम्ही त्यांचे काम करण्यास योग्य उमेदवार वाटत असाल तर ते काम तुम्हाला मिळेल.

Advertisement

Freelancing वेबसाइट वर काम करत असताना दिलेल्या वेळेत व योग्य प्रकारे काम करणे अपेक्षित असून तुम्ही अश्या प्रकारे काम केल्यास तुम्हाला चांगले रेटिंग मिळते व भविष्यातील कामे मिळवण्यास त्याचा फायदा होतो.

घरबसल्या काम – कोणत्या प्रकारचे काम करता येऊ शकते

तुम्ही अशा प्रकारच्या वेबसाइट वरुण घरबसल्या कोण कोणत्या प्रकारचे काम करू शकता ते आता बघूयात. जर तुमचे कॉमर्स मध्ये शिक्षण झाले असेल तर तुम्ही अकाऊंटिंग चे काम घेऊ शकता. तसेच जीएसटी शी संबंधित कामे देखील तुम्ही घेऊ शकता.

आपण जर इतर कोणते ग्रॅजुएशन केले असेल आणि आपण टुशन घेऊ शकत असाल तर अशा प्रकारचे शिकवणीचे देखील काम आपल्याला अशा वेबसाइट वर मिळेल.

सिव्हिल इंजीनीरिंग झाले असेल तर प्लान काढून देण्यासारखे काम आपण ह्या वेबसाइट वर मिळवू शकता. तसेच सिव्हिल शी संबंधित इतर कामे देखील आपण करू शकता.

आपले जर लिखाण चांगले असेल तर आपण मराठी,हिन्दी किंवा इंग्लिश भाषेमध्ये ब्लॉग रायटींग चे घरबसल्या लिखाण काम करू शकता. तसेच एखाद्या विषयावर आपले प्रभुत्व असेल तर आपण त्या संधर्भात लिखाण काम करू शकता.

आपल्याला जर ऑनलाइन मार्केटिंग चे तंत्र अवगत असेल,किंवा आपल्याला ऑनलाइन फेसबूक,इनस्टाग्राम,ट्वीटर सारख्या सोशल मीडिया साइट वर जाहिरात काशी करायची याची माहिती असेल तर आपण ते देखील काम इथे करू शकता.

Advertisement

डाटा एंट्री, टायपिंग तसेच मायक्रोसॉफ्ट च्या msword, msexcel मध्ये आपण काम करू शकत असाल तर त्या संधर्भात देखील काम आपल्याला इथे मिळेल. जसे की एक्सेल मध्ये चार्ट बनवणे,प्रेझेंटेशन बनवणे इत्यादी.

वरील पर्यायांपेकी जर आपण कश्यातच पारंगत नसाल तरी कलगी करू नका अजून बर्‍याच प्रकारची कामे ह्या वेबसाइट वर उपलब्ध असतात. जसे की लोगो डिजाईन,ग्राफिक्स डिजाईन व इतर. आपल्याला जर आता ग्राफिक्स डिजाइन चे काम येत नसेल पण करायची इच्छा असेल तर आपण आपल्या मोबाइल वरुण देखील ते उत्तमरित्या करू शकता त्यासाठी canva, picsart ह्या मोबाइल apps ची आपण मदत घेऊ शकता.

Top 10 Freelancing Sites ( घरबसल्या काम देणार्‍या वेबसाइट ची यादी )

१) Freelancer

२) Guru

३) Upwork

४) Fiverr

Advertisement

५) Toptal

६) PeoplePerHour

७) Hireable

८) DesignHill

९) 99designs

१०) FlexJobs

Advertisement

तात्पर्य

नोकरी गेली म्हणून हताश होऊन बसू नका घरबसल्या देखील तुम्ही काम करून आताच्या या कोरोनामुळे तयार झालेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढू शकता. यासाठी तुमच्या मध्ये फक्त इच्छा शक्ति असने गरजेचं आहे.

तुम्ही जर घरबसल्या व्यवसाय करण्यास इच्छुक असाल तर आमचा घरगुती व्यवसाय हा लेख वाचा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

1st Android apps Baby Products Books Health Health Related Products Measurement Mechanical Engg Metrology & Quality Control Products udyojak अजित पवार अमिताभ बच्चन उद्योग उपाय कोल्हापूर ग्रामीण छत्रपती ट्रक ट्रोलिंग देश पैसे प्रेरणा फडणवीस फायदा बिजनेस मशीन महाराष्ट्र महाराष्ट्राचे राजकारण मोदी मोबाइल रजिस्टर रेकॉर्ड लहान बाळ वायरल विदेश विद्यापीठ व्यवसाय शरद पवार शेती संधी स्वदेशी स्वयंपाक हिंदू

Advertisement

Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत