पोट कमी करण्यासाठी व्यायाम
आरोग्य

पोट कमी करण्यासाठी व्यायाम व इतर काही घरगुती उपाय

Advertisement

पोट कमी करण्यासाठी व्यायाम | पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम>> स्थुलपणा ही सध्या मोठयाप्रमाणात समस्या आपल्याया पाहावयास मिळते. विशेषकरून तरूण पिढीसाठी खुप मोठया प्रमाणात या  त्रासाला सामोरे जात असतांनाचे चित्र आहे. अवेळी जेवण व अपुरी झोप महत्वाचे म्हणजे व्यायाम करत नसल्याने आपल्या शरीराचा आकार खास करून आपले पोट वाढल्याचे दिसते. शरीरात जास्त चरबी असलयाने त्याचा भार आपल्या पोटावर पडतो. परिणामी आपल्याला पोटांच्या व्याधी वाढतांत .

अशा प्रकारच्या विकारांपासून वाचायचे असेल तर पोट कमी करावेच लागेल आणि पोट कमी करण्यासाठी काही गोष्टी व व्यायाम कराव्या लागतील.अशा च काही तुमच्या फायद्याच्या गोष्टी व पोट कमी करण्यासाठी व्यायाम या लेखामध्ये सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.

चला तर मग जाणून घेऊया पोट कमी करण्यासाठी व्यायाम कोणते कोणते आहेत.

पोट कमी करण्यासाठी व्यायाम / पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम (Pot Kami Karanyasathi Vyayam)

राजीव दिक्षीत यांच्या म्हणण्या नुसार, पोट वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपण जेवण झाल्या झाल्या पाणी पितो. प्राचीन काळापासून आपल्या सांगितले आहे की, “भोजनांते विषम वारी” अर्थात जेवण केल्याने लगेच पाणी पिणे म्हणजे विष पिण्यासारखे आहे. कारण आपण जेव्हा अन्नांचा कण तोंडात घेतो तेव्हा आपल्या पोटात एक अग्नी तयार होते, त्यालाच जठर अग्नी म्हणतात. ती अग्नी आपण केलेले जेवण शरीरात पचवतो, शिवाय त्या जेवणातून रक्त, पित्त चरबी तयार करते, परंतु आपण जेवण केल्यानंतर लगेचच पाणी पिऊन टाकतो, पिरिणामी तो जठर अग्नी शांत होतो व आपल्या पोटांतील अन्न पचत नाही तर सडते व आपल्या विविध प्रकारचे पोटाचे आजार उदभ्वतात.

जर आपण लवकर व्यायम करायला सुरूवात केली तर आपले वजन व पोट नियंत्रणात आणता येऊ शकते.खाली काही व्यायाम दिलेले आहेत ते दैनंदिन केल्यास पोट कमी करण्याच्या तुम्ही केलेल्या निच्छयाला नक्कीच मदत मिळेल.

योगासन – पोट कमी करण्यासाठी व्यायाम / योगासन गरजेचे आहे

दैनंदिन आयूष्यात योगासन करण्याचे अनेक फायदे आहेत आणि त्यातील एक म्हणजे योगासन केल्याने वजन घटण्यास मदत होते. पोट कमी करण्यासाठी नौकासन हा योगासनाचा प्रकार सर्वोत्तम आहे.

Advertisement

मॉर्निंग वॉक – वजन कमी करण्यासाठी योग्य उपाय

तुम्ही जर वजन कमी करण्याचा निच्छय केला असेल तर तुम्ही पहाटे उठून पायी चालाण्याची सवय स्वतःला लाऊन घ्या. असे केल्याने तुमच्या पोटावर आलेली चरबी कमी होण्यास सुरवात होईल.असे काही नाही की तुम्ही सकाळी उठून पळले पाहिजे नुसते चालण्याने देखील वजन कमी होऊ शकते. परंतु सकाळी उठून साधारण कमीत कमी २ किमी तरी चालले पाहिजे ज्यामुळे तुमचे पोट कमी करण्यास नक्की मदत होईल.

वक्रासन (पोट कमी करण्यासाठी योग्य व्यायाम)

हे आसन करण्यासाठी आधी तुम्ही सपाट पृष्टभागावर पाठीवर झोपावे. त्यानंतर दोन्ही पायांच्या मध्ये तुमच्या खांद्या एवढे आंतर ठेऊन तुमचे पाय गुडघ्यात वाकवून शरीराच्या जवळ उभे करा आणि तुमचे पोट वरती उचला. हे करत असताना आपले हात हे सरळ रेषेत पृष्ट्भागावरच ठेवा.

कपालभाती व अनुलोंमविलोम (पोट कमी करण्यासाठी व्यायाम)

समस्त शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कपालभाती व अनुलोंमविलोम हा रामबाण उपाय मानला जातो. सतत या पध्दतीने योगा केल्यास आपल्याला ‍चांगले परिणाम दिसायला लागतात.

भुजंगासन – पोत कमी करण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम

भुजंगासन केल्यामुळे तुमच्या पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल भुजंगासन करण्यासाठी आधी तुम्ही पोटावर झोपा नंतर दोन्ही हात छातीवरच्या बाजूस ठेवा व त्यानंतर हळूवार श्वास घेत घेत, हळूहळू शरीर वर उचला. हा प्रकार करत असताना तुमची नाभी सुध्दावर उचलली जाईल याचा प्रयत्न करा त्यानंतर नॉर्मल श्वास घेत आपल्या शरीराला सुरूवातीच्या स्थितीत आणून ठेवा. हे आसण १० ते १२ वेळा करा असे केल्यास पोटावरची चरबी निघून जाण्यास मदत होईल.

उष्ट्रासन

उष्ट्रासन करण्यासाठी पायांना लांब करून बसा व डाव्या पायाच्या गुडघ्याला वाकवा. तुमचा टाचा मागच्या भागाला टच होईल असे ठेवा. हे करत असताना श्वास सोडत असताना कमरेचा मागच्या भागाला मागे ढकला मग उजव्या हाताने डाव्या पायाला व डाव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करा किंवा समान पकडलं तरी चालेल. या गोष्टीकडे लक्ष असू दया की खाली वाकत असताना मानेला त्रास होईल अशी हालचाल असू नये हे आसान केल्याने कंबरेचा व पोटाचा आकार कमी होण्यास मदत होईल.

नौकासन

सर्व प्रथम पोटावर झोपा. पाय जुळलेले असावे. हात शरीराजवळ असावेत. पूर्ण श्वास सोडावा व श्वास घेत दोन्ही हात व पाय एकाचवेळी जमिनीपासून ३० अंश वर उचलावे. म्हणजे संपूर्ण शरीराचा बॅलन्स पोटावर आला पाहिजे. हया स्थितीत थोडा वेळ थांबावे व सावकाश आसन सोडावे. वजन कमी होते व तुम्ही वजनावर नियंत्रण मिळवून पाहिजे तशी फिगर मिळवू शकता.

Advertisement

शतपावली

जेवणानंतर आपण लागलीच झोपतो व पर्यायी आपल्या शरीरात  अतिरिक्त चरबी तयार होते, पर्यायाने ती चरबी आपल्याला पोटावर दिसते. जेवण केल्यानंतर कमीत कमी आपण शंभर पावले तरी चालले पाहिजे.त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यानंतर थोडावेळ का होईना फिरायला जाण्याची सवय लावा.  

पोट कमी करण्यासाठी इतर काही घरगुती उपाय (Pot Kami Karanyasathi Gharguti Upay)

पोट कमी करण्यासाठी विविध व्यायाम बघितल्या नंतर आता आपण इतर काही पोट कमी करण्याचे उपाय बघूयात. ज्याप्रमाणे व्यायाम महत्वाचा आहे त्याच प्रमाणे व्यायामा सोबतच इतरही काही गोष्टी आपल्याला करणे गरजेचे आहे, त्या जाणून घेऊयात.

लिंबू – पोट कमी करण्यासाठी उपयुक्त

कोमट पाण्यात लिंबाचा रस व थोडे मिठ मिसळून घ्या. रोज सकाळी या मिश्रणाचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॅलिजम चांगले राहाते आणी त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास सुरवात होईल.

जेवणाची वेळ महत्वाची आहे

रात्री उशीरा जेवण केल्याने पोटावरील चरबी वाढते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी किमान २ तास तुमचे जेवण झालेले पाहिजे.

तात्पर्य

अशा प्रकारे आपण काही घरगुती उपचार व पोट कमी करण्यासाठी व्यायाम करून दवाखान्याचे पैसा व वेळ वाचवून आपल्या पोटाची चरबी सहजरित्या कमी करू शकता.

आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका.

Advertisement

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अजित पवार (1) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)

Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत