तलाठी होण्यासाठी पात्रता
शिक्षण

तलाठी होण्यासाठी पात्रता – शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती

तलाठी होण्यासाठी पात्रता – शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,आवश्यक कागदपत्रे आणि सर्व माहिती (Talathi honyasathi patrata marathi) / Eligibility to be talathi>> तलाठी हे प्रत्येक गावातील अत्यंत महत्वाचे पद आहे.आपल्यातील अनेक जण या पदासाठी परीक्षा द्यायला इच्छुक असतात तसेच त्यांना तलाठी होण्यासाठीची पात्रता काय आहे याची माहिती हवी असते.तर अशा सर्वांसाठी आम्ही या लेखामध्ये तलाठी होण्यासाठी पात्रता काय आहे याची माहिती देणार आहोत.

तलाठी होण्यासाठी पात्रता (Talathi honyasathi patrata marathi) / Eligibility to be talathi

चला तर मग जाणून घेऊयात तलाठी होण्यासाठी ची शैक्षणिक योग्यता,तलाठी होण्यासाठी ची वयोमार्यादा आणि आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती आहेत.

तलाठी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता (Talathi honyasathi shaishanik patrata marathi) / Educational Eligibility to be talathi

तलाठी होण्यासाठी शैक्षणिक म्हणाल तर तुम्ही फक्त पदवीधर असावात. तुम्ही कोणत्याही शाखेची म्हणजे आर्ट्स,कॉमर्स,सायन्स किंवा इतर कोणतीही पदवी घेतलेली असावी. त्याच बरोबर MKCL मार्फत घेण्यात येणारा MS-CIT चा कोर्स तुम्ही उतीर्ण असावात व त्याचे प्रमाणपत्र तुमच्या कडे असावे. या दोनच शैक्षणिक पात्रता तलाठी होण्यासाठी आहेत.ज्या तुम्ही अगदी सहज पणे पूर्ण करू शकता आणि तलाठी होऊ शकता.

तलाठी होण्यासाठी पात्रता - शैक्षणिक पात्रता
तलाठी होण्यासाठी पात्रता – शैक्षणिक पात्रता

तलाठी होण्यासाठी आवश्यक वयोमार्यादा (Talathi honyasathi vayomaryada marathi) / Age Eligibility to be talathi

तलाठी होण्यासाठी ची वयोमार्यादा विविध कॅटेगरी नुसार वेगवेगळी आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरी मध्ये बसता त्यानुसार काय वयोमार्यादा आहे ते जाणून घ्या.

१) मागासवर्गीय – ४३ वर्षे

२) अमागास (ओपन प्रवर्ग ) – ३८ वर्षे

३) दिव्यांग – ४५ वर्षे

४) खेळाडू – ४३ वर्षे

५) प्रकल्पग्रस्त / भूकंप ग्रस्त – ४५ वर्षे

६) माजी सैनिक – ४६ वर्षे

७) अंशकालीन कर्मचारी – ४६ वर्षे

तलाठी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Talathi honyasathi avashyak kagadpatre marathi)/ Documents Required For Talathi

तलाठी होण्यासाठी तुमच्या कडे विशेष अशी काही कागदपत्रे लागत नाहीत,तुम्ही आज पर्यन्त घेतलेल्या शिक्षणाच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रे आवश्यक आहेत. चला तर मग विस्तृत स्वरुपात जाणून घेऊयात तलाठी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोण कोणती आहेत.

१) तुमचा १० वी चा रिजल्ट व सर्टिफिकेट म्हणजेच SSC (एसएससी) ची गुणपत्रिका व प्रमाणपत्र.

२) तुमचा १२ वी चा रिजल्ट व सर्टिफिकेट म्हणजेच HSC (एचएससी) ची गुणपत्रिका व प्रमाणपत्र.

३) तुम्ही घेतलेल्या पदवीची म्हणजेच डिग्री ची गुणपत्रिका व प्रमाणपत्र.

४) एमएससीआयटी (MS-CIT) उतीर्ण झालेले प्रमाणपत्र.

५) जात प्रमाणपत्र.

६) राखीव प्रवर्गानुसार प्रमाणपत्र.

सारांश

तलाठी होण्यासाठी वयोमार्यादा,शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्रे या बाबत ची माहिती तुम्हाला या लेखामध्ये वरती दिलेलीच आहे. चला तर मग वाट कसली बघताय तलाठी होण्याच्या तयारीला लागा. तुम्हाला त्यासाठी आमच्या कडून खूप सार्‍या शुभेच्छा.

तलाठी होण्यासाठी काय करावे लागते

तलाठी होण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता म्हणाल तर तुम्ही पदवीधर पाहिजे आणि त्याच बरोबर तुमचा MSCIT च कोर्स झालेला पाहिजे. शिक्षण एवढंच करावे लागेल तलाठी होण्यासाठी. आता अभ्यास म्हणाल तर साधारण पणे 1 वर्षभर आधी जरी तुम्ही तलाठी होण्यासाठी अभ्यास सुरू केलात तरी आरामात तुम्ही ती परीक्षा पास होऊ शकता,कारण तुम्ही ग्रॅजुएट झालेले असल्यामुळे तुमची आयक्यू क्षमता चांगली असेलच.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Books (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (16) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (15) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

One Reply to “तलाठी होण्यासाठी पात्रता – शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती

  1. धन्यवाद तुमची माहिती माझ्यासाठी म्ह्त्व पूर्ण आहे
    तुमचे आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *