दिवाळीची माहिती |दिवाळी सणाची माहिती मराठी| दिवाळी विषयी माहिती

दिवाळीची माहिती |दिवाळी सणाची माहिती मराठी| दिवाळी विषयी माहिती >> उत्सव जीवनात उत्साह घेवून येतात. असाच उत्साह निर्माण करणारा सणाचा राजांचा म्हणून प्रसिद्ध असलेला दिवाळी सण आपल्याला माहितच आहे.

हिंदू धर्मा मध्ये प्राचीन काळापासून दिवाळी सणाला खूप महत्व आहे. दिवाळी  हा हिंदू धर्मामधील प्रमुख सण असला तरी सर्व धर्मातील लोक या सणाला उत्साहाने साजरा करताना आपल्याला दिसतात. कारण प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या सणांची आवर्जून वाट पाहत असतो. कधी न भेटलेले व्यक्ती दिवाळी या सणाचे अवचित साधून एकामेकांच्या भेटी घेतात.

भारतीय अर्थव्यवस्थे च्या दृष्टीने विचार केल्यास सर्वात जास्त देवाण घेवाण ही दिवाळी सणाच्या काळातच होत असते. या सणात लोक मोठया प्रमाणात खरेदी करतात उदा. सोने, चांदी, मोटार सायकल इ. एकंदरीत सर्वांसाठीच दिवाळी एक आनंदचा आणि भरभराटीचा सण असतो.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आणखी काही माहिती या आपल्या आवडीच्या दिवाळीची माहिती.

दिवाळीची माहिती – प्रचलित कथा / दिवाळीचे सर्व दिवस आणि त्यांचे महत्व (Diwali Information In Marathi)

दिवाळी सण आपण दरवर्षी अगदी आनंदाने व सामूहिक रित्या साजरा करत असतो पण अनेकांना या सणाची माहिती नसते अशा सर्वांसाठी आपल्याला या लेखामध्ये दिवाळी सणाची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. दिवाळी विषयी कथा तसेच दिवळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व या लेखामध्ये संगितले आहे.

प्रचलित कथा / गोष्ट (दिवाळीची माहिती)

प्राचीन काळापासून लोकांचे असे मत आहे की, याच दिवळी च्या दिवशी भगवान राम यांनी दुष्ट रावाणाचा नाश करुन सीता मातेला त्याच्या तावडीतून सोडून आणले होते. व ज्यावेळी त्यांनी अयोध्या मध्ये प्रवेश केला तेंव्हा तेथील जनतेने त्यांच स्वागत दिवे लावून केले होते, त्या काळापासून दिवाळी ला खरी सुरुवात झाली आहे. असे‍ प्राचीन लोकांचे मानने आहे. आणि दिवाळीची ओळख ही धर्माचा अधर्मावर विजय अशी आहे.

दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची माहिती, वर्णन व महत्व

वसुबारस

वसुबारस या दिवाळी च्या सुरवातीला येणार्‍या दिवसाला हिंदू धर्मात खुप महत्व देण्यात आले आहे. भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे या दिवसाला अधिक महत्व आहे. या दिवशी महिला रात्री गायीच्या वासरु ची पुजा करतात व आपल्या व आपल्या परिवाराची सुख शांती व आरोग्यासाठी प्रार्थना करतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रिया या दिवसी उपवास ठेवतात.

ज्यांच्या घरी गाई असते त्यांच्या घरी पुरणपोळी चा स्वयंपाक केला जातो. घरातील लग्न झालेल्या महिला गाईच्या पायावर पाणी टाकून पुजेची सुरुवात करतात. गाईला हळद कुंकू लाऊन व हार घालून गाई ची पुजा केली जाते. असे समजले जाते की ही पुजा केल्याने आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळते व सुख लाभते.

धनत्रयोदशी

दिवाळीच्या सुरवातीला येणार्‍या सणामध्ये हा एक सण आहे. आपण कमावलेली पैसांची पुजा या दिवशी करतात. नुसते पैशेच नाही तर लक्ष्मी बरोबरच द्यान रूपी सरस्वतीचे देखील पुजन या दिवशी केले जाते, म्हणूनच या दिवसाला धनत्रयोदशी असे म्हणले जाते. साधारण या दिवशी लोक दिवाळीच्या लगबगीला सुरवात करतात. लोक आपआपल्या घरासमोर एक दिवाळीचा कंदील लावतात. दिवाळी साठी एकमेकांना शुभेच्या देतात.

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी याच दिवशी भगवान श्री कृष्णाने महाभयंकर राक्षस नरकासुरचा वध करुन तेथील प्रजेला त्याच्या जुलमी व अन्यायकार राजवटी पासून मुक्त केले होते. प्राचीन कथेनुसार, नरकासुराने तप करुन ब्रम्हदेवांना प्रसन्न करुन कुणाकडून ही वध होणार नाही असे वर प्राप्त केले होते. भगवान श्री कृष्णांनी अशा या महा दानवाचा वध करुन धर्माची लढाई जिंकली म्हणून या दिवसाला अधिक महत्व आहे. नरक चतुदर्शीच्या पहाटेपासूनच दिवाळीचे फटाके उडवायला सुरुवात होते, व तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात.

लक्ष्मी पुजन

लक्ष्मी पुजन हा दिवस दिवाळी सणा मधील सर्वात महत्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदूमध्ये एक समज आहे की, लक्ष्मी खुप चंचल असते, व ती आपल्या कडे स्थिर राहावी, म्हणून लोक लक्ष्मी पुजन करतात.  विषेश करुन  व्यापारी लोक मोठया प्रमाणात हा दिवस साजरा करतांना दिसतात‍.

दिवाळी सणाची माहिती - लक्ष्मी पूजन
दिवाळी सणाची माहिती – लक्ष्मी पूजन

 या दिवसी लोक स्वच्छता करण्यासाठी एक नवी केरसुणी घेतात. ती केरसुणी म्हणजेच लक्ष्मी असे मानून तिची हळद-कुंकु वाहून, झेंडू शेवंती सारखी फुले वाहून पुजा केली जाते. पुजा झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून तिचा वापर घरात करण्यास सुरुवात केली जाते.

बलीप्रतिपदा / पाडवा

 भारतीय हिंदू संस्कतीनुसार साडेतीन मुर्हतातील एक मुर्हत म्हणून या दिवसाला विशेष महत्‍व देण्यात आलेले आहे. बलीप्रतिपदा याच दिवशी इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो म्हणून बळी राजाची पूजा करतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर जाऊन दिवा लावतो. तसेच व्यापारी मंडळी दिवाळीतील पाडवा ही त्यांची आर्थिक नववर्षाची सुरवात मानून आपल्या व्यवसायाची पुजा करून नव्या उमेदीने कामाला लागतात.  

दिवाळीची माहिती - पाडवा
बळीराजा

याच दिवसाला पाडवा म्हणून देखील ओळखले जाते, या दिवशी पत्नी आपल्या पतीला उटणे लाऊन अभ्यंग स्नान घालते व नंतर ओवाळते. नवरा देखील आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी छान अशी एखादी भेटवस्तू देतो.पती पत्नीच्या अतूट नात्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो.

भाऊबीज

दिवाळीची माहिती - भाऊबीज
भाऊबीज

भावा बहिणीच्या नात्यासाठी देखील दिवाळी च्या या मोठ्या सणामध्ये एक दिवस असतो तो म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीज.या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळतात व त्याच्या समृद्धीची कामना देवाला करतात. भाऊ देखील आपल्या लाडक्या बहिणीला उपहार देऊन खुश करतात. लग्न झालेल्या मुली देखील या दिवशी आपल्या लाडक्या भावा साठी माहेरी येतात.

दिवाळी निमित्त होणार्‍या काही विशेष गोष्टी (दिवाळीची माहिती)

दिवाळी निमित्त दरवर्षी मराठी व अन्य भाषाचे साहित्यीक आपले लिखाण प्रकाशीत करतात. त्यानिमित्त काही अंकाना पारितोषित देखील दिले जाते.

दिवाळीचा फराळ हा देखील हिंदू समाजामध्ये वर्षातून एकदाच घरात होत असतो.त्यामुळे दिवाळी निमित्त प्रत्येक हिंदू घरात विविध पदार्थांचा फराळ हा देखील विशेषच असतो.

भारतीय शेयर बाजार हा सोमवार ते शुक्रवार सुरू असतो व इतर सरकारी सुट्टीच्या दिवशी बंद असतो, परंतु दिवाळीतील लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग साथी केवळ 1 तास संध्याकाळी शेयर बाजार सुरू ठेवला जातो.

अनेक विभागातील लोक नव्या उमेदीने या सणा नंतर कामाला लागतात.

दिवाळी सणाची माहिती – सारांश

दिवाळी हा एक नाव चैतन्य देणारा सण आहे व या दिवाळी ची माहिती आपल्याला या लेखाच्या माध्यमातून देण्याचा हा आमचा प्रयत्न. या सणाच्या निमित्ताने प्र्येक जण आपआपल्या परीने खरेदी करत असतो. आपण ‍दिवाळीत गोर गरीबाकडून साहित्य खरेदी करुन त्यांना ही दिवाळी आनंदाने साजरा करण्यासाठी व आनंद देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करु शकतो.

दिवाळी लक्ष्मी पूजन कसे करावे

या दिवसी लोक स्वच्छता करण्यासाठी एक नवी केरसुणी घेतात. ती केरसुणी म्हणजेच लक्ष्मी असे मानून तिची हळद-कुंकु वाहून, झेंडू शेवंती सारखी फुले वाहून पुजा केली जाते.पुजा झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून तिचा वापर घरात करण्यास सुरुवात केली जाते.त्याच बरोबर या दिवशी आपल्या कडे असलेले बँक पासबूक,बँकेचे कार्ड,पैसे यांची देखील पुजा केली जाते.अनेक जण या दिवशी लक्ष्मी देवी ची मूर्ती देखील पूजतात.

आपल्याला ही दिवाळीची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्या कडे अधिक काही माहिती असल्यास अवश्य कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “दिवाळीची माहिती |दिवाळी सणाची माहिती मराठी| दिवाळी विषयी माहिती”

Comments are closed.

Scroll to Top