दसरा
स्पेशल

दसरा सणाची माहिती मराठी / दसरा विषयी सर्व माहिती

Advertisement

दसरा सणाची माहिती मराठी / दसरा विषयी सर्व माहिती / विजयादशमी माहिती >> हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसरा या सणाचे अनेक अर्थाने महत्व आहे. विजयाची प्रेरणा देणारा आणि छात्रवृत्ती जागृत करणारा हा सण असून, या लेखाच्या माध्यमातून दसरा सण साजरा करण्यामागील काही महत्त्वाची कारणे समजून घेऊया .

चला तर मग जाणून घेऊया दसरा सणाचे महत्व.

Table of Contents

दसरा सणाची माहिती मराठी / दसरा सणाची माहिती मराठी / विजयादशमी सण माहिती (Dasara Festival Information Marathi)

दसरा म्हणजेच विजयादशमी या सणा विषयी सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न या लेखामध्ये करण्यात आलेला आहे.

दसरा सणा विषयी अख्यायिका / प्रचलित कथा

अख्यायिका

साधारण पणे त्रेतायुगापासुन साजरा केला जाणारा विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण असून या सणाला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.

अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी. असे म्हणतात की, याच दिवशी भगवान रामाचा पूर्वज रघु या आयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला होता. त्या काळापासून म्हणजे त्रेतायुगापासून हिंदू लोक विजयादशमी महोत्सव साजरा करतात.

विजयादशमी / दसरा विषयी काही प्रचलित कथा

१) विजयादशमीला रावणाचा जन्म झाला आणी वधही. पण याविषयी अनेक लोकांमध्ये मतभेद आहेत.

Advertisement

२) श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी अख्यायिका प्रचलित आहे .

३) याच दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत आपल्या राज्याकडे निघाले होते.

दसरा सणाच्या काही महत्वाच्या गोष्टी व त्यांचे महत्व

दसरा सणाला शास्त्र आणि शस्त्र पूजनाचे महत्त्व

विजयादशमीला शस्त्र आणि शास्त्र पूजन करण्या बाबत वेगळे वेगळे महत्त्व आहे प्राचीन काळापासून क्षत्रीय युद्धाला जाण्यासाठी या दसरा या दिवसाची निवड करत होते. त्यांचे मानणे असे होते की दसर्‍याच्या दिवशी केलेल्या युद्धा मध्ये विजय निश्चित मिळतो.

क्षत्रीय लोकांप्रमाणे ब्राह्मण लोक देखील दसरा या दिवशी विद्या ग्रहण करण्यासाठी घराबाहेर पडत. तसेच व्यापारी लोक विजयादशमी च्या या पवित्र दिवशी नवीन दुकान, शोरूम इत्यादींचा शुभारंभ करणे शुभ मानतात.

दसरा सणाला लागणार्‍या महत्वाच्या काही वस्तु

शमी

दसरा ला शमी वृक्ष पूजनाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी संध्याकाळी शमी वृक्षपूजन केल्याने आरोग्य व धन संपत्ती प्राप्त होते असे मानले जाते.

Advertisement

आपट्यांची पाने

या वृक्षाला अश्मंतक असेही म्हणतात. आपट्याची पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत. विजयादशमीला आपट्यांची पाने  परस्परांना दिले जातात. यालाच सोने लुटणे असेही म्हणतात .

विजयादशमी सण साजरा करण्याच्या पद्धती

सरस्वतीतत्व अप्रकटावस्थेत जाणे

या दिवशी सरस्वतीतत्व सगुणाचा अधिक्य भावाच्या निर्मितीतून बीजरुपी अप्रकटावस्था धारण करते,म्हणून या दिवशी तिचे क्रियात्मक पूजन आणि विसर्जन केले जाते .

महाराष्ट्रात कातकरी किंवा आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हंटले जाते. तसेच बंजारा व इतर समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात .

घराला आंब्याच्या पानांची आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात .दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे .यंत्रे ,वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या जातात. आणि संध्याकाळी सर्व लोक एकत्र येत सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो.

Advertisement

दसरा / विजयादशमी सणा मधून मिळणारी शिकवण

१) स्वतः समवेत इतरांचाही विचार करण्यास शिकवणारा सण दसरा

विजायदशमी हा देवीचा सण आहे आणि देवी ही शक्तीची देवता आहे. यासाठी अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीचे आवाहान करुन रामनवमी प्रमाणे नऊ दिवस तीचे भजन, पूजन, कीर्तन करायचे असते. अष्टमीच्या दिवशी सरस्वती स्वरूपी भगवतीचे पूजन नवमीच्या दिवशी शस्त्र देवीचे पूजन आणि दशमीच्या दिवशी शांततेचे पूजन करायचे असते. हे शांततेचे पूजन आपल्या गावच्या शिवेबाहेर जाऊन करायचे असते.

गावाबाहेरही शांतता राखुन जिकडे तिकडे सुख समृद्धी यावी असा यामागचा उद्देश आहे. बाहेर सर्वत्र शांतता राखण्यासाठी शस्त्राचे प्रदर्शन करायचे असते आणि शत्रू असेल तर त्याचे पारिपत्य करण्यासाठी या दिवशी निघायचे असते. शत्रूचे पारिपत्य करून शांतता प्रस्थापित केल्यानंतर सर्वांना सोने वाटायचे असते.

२) तमोगुण आणी वाईट शक्ती यांचा नाश होणे आणि परस्परांप्रती प्रीती जागृत होणे

देवी तत्त्व कार्यरत असल्यास सगुण स्तरावर तमोगुण आणि वाईट शक्ती यांच्या नाशाचे कार्य होत असते अन केवळ विष्णु तत्त्व कार्यरत असल्यास निर्गुण स्तरावर तमोगुण आणि वाईट शक्ती यांच्या नासाचे कार्य होत असते असे शास्त्र आहे.

दसर्‍याच्या दिवशी ताराक देवितत्त्व विष्णु तत्त्वाच्या समवेत एकत्रपणे कार्यरत होते. या दोन भिन्न तत्त्वाने संयुक्तपणे कार्य केल्यामुळे तमागुण आणि वाईट शक्ती यांच्या नाशाचे कार्य संपन्न होण्याबरोबर या दोन तत्त्वांमधील परस्परांविषयीची प्रीती जागृत होऊन त्यांच्यातील तत्त्वांकडून विनाशाचे कार्य करण्याबरोबरच सज्जनतेचे म्हणजे स्थिती संबंधीचे कार्य ही आपोआप होऊ लागते.

देवी आणी विष्णू यांच्या संयुक्त कार्यरत तत्त्वांकडून प्रक्षेपित होणाऱ्या प्रीतीयुक्त कल्याणकारी स्थितीजन्य लहरी संपूर्ण ब्रह्मांडात पसरतात. त्यामुळे सर्जकतेच्या कार्यास गती प्राप्त होते आणि त्यामुळे पीक चांगले होणे भरभराट होणे यासारखे परिणाम दिसून येतात.

स्थितीजन्य कार्य करण्यासाठी श्रीविष्णूची सहयोगी म्हणून श्रीलक्ष्मी त्यांच्या बरोबर प्रत्येक अवतारामध्ये श्रीलक्ष्मीही सहभागी असते आणी दोघेही मानवदेह धारण करुन पृथ्वीतलावर एकाच वेळी अवतार घेतात .

Advertisement

३) श्री राम आणि हनुमान तत्त्वे अन्न छात्रवृत्ती जागृत करणारा दसरा सण

दसऱ्याच्या दिवशी ब्राह्मंडात श्रीराम तत्त्वाच्या तारक, तर हनुमान तत्त्वाच्या मारक लहरीचे एकत्रीकरण झालेले असते. दसरा या तिथिला जिवाचा छात्र भाव जागृत होतो. आणि छात्रभावातूनच जिवावर छात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. दसऱयाला श्रीराम आणि हनुमान यांचे स्मरण केल्याने जीवात दास्यभक्ती निर्माण होऊन श्रीरामाचे तारक म्हणजेच आशीर्वादरूपी तत्त्वे मिळण्यास साह्य होते.

दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात लाल आणि तांबूस रंगांच्या स्प्रिंग सारख्या लहरी  कार्यरत अवस्थेत असतात. या लहरींमुळे जिवाची आत्मशक्ती जागृत होण्यास साह्य होऊन जीवांच्या मारक भावाबरोबरच नेतृत्व गुणांमध्येही वाढ होते.

तात्पर्य

हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा आणि तितकाच भक्ति भावाने साजरा करण्यात येणारा दसरा हा सण विविध भागात विविध पद्धतीने साजरा केला जातो. पण या सणाच्या ज्या काही रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत, त्या काय आहेत, त्यांचे महत्व काय आहे. आणि या सणाच्या माध्यमातून आपल्याला काय शिकवण मिळते हे सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा,त्याच सोबत आपल्या काही सूचना असतील तर त्या देखील अवश्य कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Advertisement

1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) सण (4) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)

Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत