चवनप्राश खाण्याचे फायदे | (chyawanprash benefits in marathi)

चवनप्राश खाण्याचे फायदे आणि माहिती | (chyawanprash che fayde ani mahiti/ chyawanprash benefits in marathi/best chyawanprash) >> आपल्यातील अनेक जण आपल्या लहानपणा पासून च्यवनप्राश खात असतील,किंवा आता खायला सुरवात करणार असतील. साधारणपणे २५ आयुर्वेदिक घटक एकत्र करून तयार केले जाणारे हे च्यवनप्राश खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. अनेकदा आपल्या मित्र – मैत्रिणींकडून किंवा वडीलधार्‍यांकडून सर्दी खोकला झाल्यावर किंवा अशक्तपणा आल्यावर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. याच च्यवनप्राश संबंधित सर्व माहिती या लेखात दिलेली आहे.

Table of Contents

चवनप्राश खाण्याचे फायदे व तोटे | कशापासून बनवतात | कसे खावे व खाण्या आधी घ्यावयाची काळजी |सर्वात चांगले च्यवनप्राश कोणते आहे ? | (chyawanprash che fayde ani mahiti / chyawanprash benefits in marathi | chyawanprash che tote | best chyawanprash)

अशा या गुणकारी आणि सर्वश्रूत असणार्‍या चवनप्राश खाण्याचे फायदे व तोटे, च्यवनप्राश कसे खावे, चवनप्राश खाण्याच्या आधी कोणती काळजी घ्यावी तसेच सर्वोत्तम च्यवनप्राश कोणकोणते आहेत. ही सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न या लेखामध्ये केलेला आहे. चला तर मग जाणून घेऊयात च्यवनप्राश ची सर्व माहिती.

चवनप्राश खाण्याचे १० फायदे (chyawanprash che fayde) | chyawanprash benefits in marathi

१) रक्त शुद्ध करण्यास च्यवनप्राश मदत करते

तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी चवनप्राश खाण्याचे फायदे आहेत, दिवसातून १ वेळा च्यवनप्राश खाल्याने तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होते व तुमचे शरीर सदृढ रहण्यास मदत होते.

२) हाडांना मजबूत करण्यासाठी च्यवनप्राश गुणकारी

चवनप्राश खाण्याचे फायदे / च्यवनप्राश खाण्याचे फायदे - हाडांना मजबूत करण्यासाठी
च्यवनप्राश खाण्याचे फायदेहाडांना मजबूत करण्यासाठी

चवनप्राश खाण्याचे फायदे असंख्य आहेत, या फायद्यांपैकी हा देखील एक फायदा आहे. हाडांना मजबूत करण्यासाठी चवनप्राश चे दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तुमच्या हाडां मधील प्रोटीन व कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. काहींना हाडांच्या संबंधित आजार असतील जसे की संधिवात, अशांना डॉक्टर रोज च्यवनप्राश खाण्याचा सल्ला देतात. आणि त्यांनी च्यवनप्राश दुधासोबत खाल्यास अधिक गुणकारी ठरते.

३) हृदयाच्या मजबुती साठी फायदेशीर

हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे,आणि अशा या हृदयाचे स्वास्थ जपणे आपल्याला जमलेच पाहिजे. आणि चवनप्राश खाल्ल्याने हृदयाच्या रक्त पुरवठा करणार्‍या नसांना स्वच्छ तर करतेच व मजबूत देखील बनवते. याखेरीस च्यवनप्राश तुमचे हार्ट बीट देखील नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. त्यामुळे ज्यांना हृदय विकाराचा त्रास होत असेल अश्याना दिवसातून किमान एकदा च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे हृदय मजबुत करण्यासाठी देखील चवनप्राश खाण्याचे फायदे आहेत.

४) त्वचा चमकदार बनवते

हवामानातील बदल, प्रदूषण व बदलत्या ऋतूंमुळे देखील तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होत असतात,जसे की त्वचा कोरडी पडणे, किंवा तरुण पणीच काहींच्या चेहर्‍यावर सुरकुत्या दिसायला लागतात. अशा सर्वांना च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. चवनप्राश खाल्याने तुमच्या त्वचेचे आरोग्य उत्तम राहते व त्वचा मुलायम आणि चमकदार दिसायला लागते. त्यामुळे चेहरा उजळवण्यासाठी इतर क्रीम वापरण्याबरोबरच दररोज सकाळी एक चमचा च्यवनप्राश देखील खा तुमचा चेहरा उजळून निघेल.

५) मेंदू साठी देखील चवनप्राश फायदेशीर

च्यवनप्राश खाल्याने स्मरणशक्ती वाढते च्यवनप्राश मध्ये अॅंटी – ओक्सिडेंट असतात जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्याच बरोबर काहींना मेंदूचे आजार असतात, अश्यांना देखील च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शारीरिक फायद्यांसोबत मानसिक संतुलन राखण्यास देखील च्यवनप्राश फायदेशीर आहे मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग होण्यासाठी देखील चवनप्राश खाण्याचे फायदे आहेत.

६) रोग प्रतिरोधक क्षमता वाढवते

प्रतिकार शक्ती कशी वाढवावी
प्रतिकार शक्ती कशी वाढवावी


च्यवनप्राश चा आणखी एक गुणधर्म म्हणजे दैनंदिन च्यवनप्राशच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. कोणत्याही रोगांना किंवा आजारांना विरोध करणारी अशी ही प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दररोज किमान एकदा तरी च्यवनप्राश खाणे चांगले. तुमची रोग प्रतिकार शक्ती उत्तम असल्यास साथीच्या आजारांमध्ये तुम्हाला अशा आजारांपासून वाचण्यासाठी निच्छित फायदा होईल.

७) रक्तातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण नियंत्रनात ठेवण्यास गुणकारी

तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढल्यावर हार्ट अटॅक सारखे परिणाम होतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी असणे फार गरजेचे आहे. आणि हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचे काम च्यवनप्राश करते. त्यामुळे नियमित च्यवनप्राश खाल्याने हार्ट अटॅक सारख्या आजरांपासून तुम्ही दूर राहू शकता.

८) श्वसनाच्या आजारांमध्ये च्यवनप्राश उपयोगी

सहसा काही म्हातार्‍या माणसांमध्ये श्वसनाचे त्रास असतात, आणि अशा सर्वांना डॉक्टर देखील दिवसातून किमान एक चमचा च्यवनप्राश कोमट पाण्यासोबत घेण्याचा सल्ला देतात. परंतु ज्यांना श्वसनाचे विकार आहेत किंवा त्रास होत असतो अशांनी दूध व दही खाणे टाळावे.

९) वजन कमी करण्यासाठी देखील च्यवनप्राश चा वापर

ज्यांचे वजन वाढले आहे परंतु त्यांना ते नियंत्रणात आणायचे आहे अश्यांनी देखील रोज च्यवनप्राश चे सेवण केले पाहिजे. च्यवनप्राश च्या सेवनासोबतच नियमित व्यायाम आणि आहाराच्या बाबतीतील योग्य डायट प्लान अंगिकारल्यास तुमचे वजन नक्कीच लवकर कमी होईल.

१०) पचन प्रक्रिया सुधारते

काहींना पचनाचे आजार असतात, अशा सर्वांसाठी च्यवनप्राश मध्ये असलेले तेजपत्ता व दालचीनी मुळे त्यांना पचनाच्या विकारांपासून आराम मिळतो. नियमित च्यवनप्राश खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते व अन्न व्यवस्थित पचून तुमची पचनशक्ती वाढते. दिवसातून सकाळी किमान एकदा च्यवनप्राश खाल्ल्याने तुमची पचनाच्या विकारांपासून मुक्ती होते.

च्यवनप्राश कशापासून बनवतात

वेगवेगळ्या कंपनीच्या च्यवनप्राश मध्ये वेगवेगळे इनग्रेडीयंट असतात, च्यवनप्राश मध्ये साधारणपणे ४० ते ५० प्रकारचे विविध जडीबुटी पदार्थ वापरले जातात. तरी देखील काही कॉमन असे पदार्थ जे च्यवनप्राश मध्ये असतात ते पुढील प्रमाणे -मध, लवंग, आवळा, केसर, तूप, इलायची, बेल, अडुळसा, तुळशी, अश्वगंधा, पिंपळपान, द्राक्ष, तेज पत्ता, निंब, हळद, शतावरी, तिळाचे तेल व साखर इ.

च्यवनप्राश कसे खावे खाण्या आधी घ्यावयाची काळजी

च्यवनप्राश चे अनेक फायदे आहेत पण हे काही ठराविक लोकांनी न खाल्लेलेच चांगले राहील. चला तर मग जाणून घेऊया की चवनप्राश खाण्याची योग्य पद्धत व ते खाण्या आधी घ्यावयाची काळजी.

  • लहान बाळांना म्हणजे साधारण १ वर्षाच्या पुढील व ७ वर्षा पर्यंतच्या मुला मुलींना साधारण अर्धा चमचा च्यवनप्राश दिलेले चांगले.
  • दिवसातून एकच वेळा च्यवनप्राश खाल्लेले योग्य राहील.
  • च्यवनप्राश सकाळी उपाशी पोटी खाल्लेले चांगले.
  • दुधासोबत देखील तुम्ही च्यवनप्राश खाऊ शकता.
  • कोमट पाणी आणि च्यवनप्राश देखील तुम्ही घेऊ शकता.
  • वय वर्ष ७ ते १२ या वयोगटातील मुलामुलींना एक चमचा च्यवनप्राश देऊ शकता.
  • १२ वर्षांच्या पुढील मुलामुलींना दररोज साधारण १ ते २ चमचे च्यवनप्राश दिवसाला खायला द्यावे.
  • च्यवनप्राश खाल्ल्या नंतर साधारण अर्धा तास तरी आंबट व मसालेदार पदार्थ पदार्थ खाणे टाळा.
  • साधारण १ वर्षाच्या आतील लहान बाळांना च्यवनप्राश खायला देऊ नये.
  • गारोधार महिलांनी देखील च्यवनप्राश खाणे श्यक्यतो टाळावे.
  • च्यवनप्राश मध्ये काही प्रमाणात साखर असते त्यामुळे डायबेटीस असणार्‍या व्यक्तींनी च्यवनप्राश खाऊ नये.
  • ज्यांना सतत तोंड येते किंवा आले आहे अश्यांनी देखील च्यवनप्राश न खाल्लेलेच चांगले.
  • ज्या व्यक्तींना श्वसनाचा त्रास आहे अशा लोकांसाठी च्यवनप्राश गुणकारी आहे परंतु त्यांनी ते दुधासोबत खाऊ नये.
  • झोपण्या पूर्वी कधीही च्यवनप्राश खाऊ नये,असे केल्यास तुमचे दात लवकर खराब होऊ शकतात.

सर्वात चांगले च्यवनप्राश कोणते आहे ?

बाजारात भरपूर च्यवनप्राश च्या कंपन्या आहेत पण त्यातील सर्वात चांगली कोणती हे सांगणे कठीण जाईल परंतु तरी त्यातल्या त्यात आम्ही ३ अशा कंपन्यांचे च्यवनप्राश खाली देत आहोत ज्या की नामांकित कंपन्या आहेत व ज्यांची च्यवनप्राश ची विक्री जास्त होते.

डाबर च्यवनप्राश / डाबर च्यवनप्राश खाण्याचे फायदे

डाबर कंपनीचे च्यवनप्राश जे सर्वात जुने, सर्वात चांगले व आपल्या देशात बनते. खूप वर्षा पासून डाबर कंपनी चे हे उत्पादन बाजारात उपलब्ध आहे व चांगला ग्राहक वर्ग देखील आहे. त्यामुळे हे उत्पादन तुम्ही निसंकोच पणे घेऊ शकता.

बैधनाथ च्यवनप्राश

च्यवनप्राश बनवणार्‍या कंपन्यांमध्ये ही देखील एक नामांकित कंपनी असून ह्यांची देखील च्यवनप्राशची विक्री चांगली आहे. हे च्यवनप्राश देखील तुम्ही विकत घेऊ शकता.

झंडू च्यवनप्राश

वरील दोन्ही च्यवनप्राशच्या तुलनेत ही नवीन कंपनी आहे. पण तरी देखील कमी काळात ह्या कंपनी ने या क्षेत्रात चांगले नाव मिळवले आहे. ह्यांची देखील च्यवनप्राश ची विक्री चांगली आहे,म्हणजे बरेच लोक ह्यांच्या च्यवनप्राशला आपली पसंती दर्शवतात.

च्यवनप्राश चे काही तोटे

तसे पहायला गेले तर च्यवनप्राशचे तोटे किंवा च्यवनप्राश मुळे आपल्या शरीराला काही नुकसान होते अशी काही माहिती उपलब्ध नाहीये. एनसीबीआय च्या एका संशोधणा नुसार ठराविक मात्रेमध्ये च्यवनप्राश खाल्ल्याने तुमच्या शरीराला काही हानी पोहचत नाही.

  • डायबेटीस असणार्‍या व्यक्तींनी च्यवनप्राश खाऊ नये कारण या मध्ये काही प्रमाणात का होईना साखर असते.
  • चवनप्राश मध्ये आवळा असतो त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही च्यवनप्राश खाल्ल्यास तुमच्या दातांवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
  • कुठलीही गोष्ट प्रमाणा पेक्षा जास्त केल्यास त्याचे दुष्परिणाम हे असतातच, तसेच च्यवनप्राश जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचे पोट बिगडू शकते.

चवनप्राश खाण्याचे फायदे – सारांश

च्यवनप्राश / चवनप्राश खाण्याचे फायदे (chyawanprash benefits in marathi ) व चवनप्राश विषयीची इतर सर्व माहिती आपणास या लेखामध्ये मिळालीच असेल. तर मग वाट कसली बघताय आजच तुमच्या आहारात च्यवनप्राशचा समावेश करा आणि त्याचे फायदे तुमच्या शरीराला देखील मिळू द्या. तसेच गर्भवस्थेतील महिला किंवा लहान बाळाला च्यवनप्राश देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

च्यवनप्राश कधी खाल्ले पाहिजे

तुम्हाला जर अशक्त पणा आला असेल,शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले असेल,पचन प्रक्रिया बिघडली असेल,वजन कमी करण्यासाठी,रक्तातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढले असेल किंवा रोग प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी तुम्ही च्यवनप्राश खाऊ शकता. यांखेरीस च्यवनप्राश खाण्याचे अनेक फायदे आहेत जे वरील लेखा मध्ये नमूद केले आहेतच.

आपल्याला ही माहिती कशी वाटली व आपण वरील पैकी कोणते च्यवनप्राश घेतले किंवा घेऊ इच्छिता आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top