रक्त वाढीसाठी उपाय
आरोग्य

रक्त वाढीसाठी उपाय | रक्त वाढीसाठी किंवा हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काय खावे – संपूर्ण माहिती

Advertisement

रक्त वाढीसाठी उपाय | रक्त वाढीसाठी किंवा हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काय खावे >> एखाद्या गाडीला किंवा वाहनाला जशी इंधनाची गरज असते तशीच आपल्या शरीराला देखील रक्ताची गरज असते. तुमच्या शरीरात जर रक्त किंवा हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी झाले तर त्याचे एक न अनेक दुष्परिणाम आहेत.

शरीरातील रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यास थकवा लागणे, अशक्त पणा जाणवणे यांखेरीस काहींच्या त्वचेवर काही परिणाम आढळून येतात,तर काही जणांचे विशेषतः प्रौढांचे हात पाय सुजण्यासारखे परिणाम होतात. या शरीरावरील दुष्परिनामा सोबतच एनिमिया सारखे रोग देखील होऊ शकतात.

यांसारख्या शरीरातील रक्त कमी होण्यामुळे होणार्‍या विकारांपासून वाचण्यासाठी व रक्त वाढीसाठी उपाय / हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उपाय या लेखामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. रक्तवाढीसाठी किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी संतुलित आहारा बरोबरच काय खावे व काही घरगुती उपाय या लेखात देण्याचा हा प्रयत्न.

Table of Contents

रक्त वाढीसाठी काही घरगुती उपाय (Rakt Vadhisathi Upay)/ रक्त किंवा हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काय खावे – उपायांची यादी (Measures for Blood Growth)

खाली काही रक्त वाढीसाठी उपाय दिलेले आहेत,यातील जवळजवळ सर्वच घरगुती उपाय आहेत. रक्त वाढीसाठी काय खावे ? काय खाणे टाळावे यांसारख्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील.

मोड आलेले धान्य खाणे – रक्त वाढीसाठी एक उत्तम उपाय

रक्त वाढीसाठी / हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी - मोड आलेले कडधान्य खावे
मोड आलेले कडधान्य

मोड आलेली मटकी, हुलगे, चवळी यांसारखी कडधान्ये तुमच्या रोजच्या आहारात असायला हवीत. या मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश तुमच्या दैनंदिन आहारात केल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.रक्त वाढीसाठी हा सर्वोत्तम उपाय होऊ शकतो.

Advertisement

आहारात टोमॅटो चा समावेश

टोमॅटो / टोमॅटो ज्यूस - हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उपाय
टोमॅटो / टोमॅटो ज्यूस

दैनंदिन आहारात टोमॅटो चा समावेश केल्याने देखील शरीरातील रक्त वाढीसाठी मदत होते. लवकर रिजल्ट पाहिजे असल्यास टोमॅटो चा सूप किंवा ज्यूस रोज प्या. टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन सी असते जे रक्त वाढीसाठी अत्यंत गुणकारी मानले जातात.

गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे हा रक्त वाढी साठी योग्य उपाय ठरतो

अनेकदा शरीरातील रक्त किंवा हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढवण्यासाठी गुळ आणि शेंगदाणे खाण्याचा सल्ला घरातील प्रौढ मंडळी देतात. असे केल्याने नक्कीच तुमच्या शरीरातील रक्त वाढवण्यासाठी मदत होते.

सफरचंद व बीट हे रक्त वाढीसाठी खावे

रक्त वाढीसाठी उपाय - बीट खावे / बीट ज्यूस प्यावा
बीट / बीट ज्यूस

सफरचंद आणि बीट नियमित पणे तुमच्या आहारात असुद्या. सफरचंदाचा ज्यूस नियमित पणे प्यावा हा तुमच्या रक्त वाढी साठी उत्तम उपाय होऊ शकतो. या सफरचंदाच्या ज्यूस मध्ये जमल्यास एखादा चमचा मध देखील टाका. रक्त किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मध हे देखील गुणकारी आहे.

Advertisement

बरेच लोक जेवताना नियमित पणे कांदा तसेच लिंबू खातात पण त्या बरोबरच बीट देखील खा. बीट हे रक्त वाढी साठी योग्य आहे, यामुळे तुमच्या शरीरातील लोह वाढते. दररोज सकाळी बीट चा ज्यूस घेतल्यास ताबडतोब रक्त वाढीसाठी याचा फायदा होईल.

डाळिंब खाणे – रक्त वाढीसाठी उपाय

डाळिंब / डाळिंब ज्यूस - रक्त वाढीसाठी उपाय
डाळिंब / डाळिंब ज्यूस

डाळिंब हे अतिशय गुणकारी असून, डाळिंब नियमित पणे खाल्यास तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते. डाळिंबात प्रथिने, लोह व फायबर असते ज्यामुळे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

डाळिंबा पासून तुम्ही रक्त वाढीसाठी अजून एक उपाय करू शकता, डाळिंबाच्या रसा मध्ये थोडे काळे मीठ (सेंधव मीठ) आणि काही प्रमाणात मिरी पाऊडर मिसळा. असा रस दररोज पिल्याने तुमच्या शरीरातील आयर्न वाढण्यास आणि पर्यायाने रक्त वाढण्यास मदत होते.

रक्त वाढी साठी आवळ्याचे काही उपाय

रक्त वाढीसाठी उपाय
आवळ्याचा रस – रक्त वाढीसाठी उपाय

रक्त वाढी साठी तुम्ही आवळ्याचा रस हा उपयुक्त आहे. आवळ्याचा रस हा दररोज सकाळी चहा च्या ऐवजी घेतल्यास निच्छितच तुमच्या शरीरातील रक्त वाढी साठी त्याची मदत होईल.

तसेच आवळ्याचा मुरांबा बनवून खाल्यास देखील रक्त वाढवण्याच्या तुम्ही केलेल्या निच्छयास मदत होईल.

Advertisement

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवायचे असेल तर आवळ्याच्या रसामध्ये थोडे अश्वगंधा चे चूर्ण मिसळा व ते प्या. किंवा आवळ्याच्या रसा मध्ये जांभळाचा रस मिसळा व तो प्या. असे केल्यास तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते.

हळद – रक्त वाढीसाठी गुणकारी आहे

हळद ही अत्यंत गुणकारी मनाली जाते. हळदीचे जसे इतर ही अनेक फायदे आहेत त्याच प्रमाणे हळद ही रक्त वाढीसाठी उपाय म्हणून देखील काम करते. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कोमट पाण्यामध्ये एक लहान चमचा हळद टाकून पिल्याने देखील शरीरातील रक्त वाढते.

सुकामेवा भिजवून खावा

सुकामेवा म्हणजेच काजू, बदाम, खारीक वगैरे दुधात भिजवून खाल्याने देखील रक्त वाढीसाठी मदत मिळते. झटपट रक्त वाढीसाठी साधारण १५ – २० नग सुकामेवा एक ग्लास लिंबाच्या पाण्यात रात्रभर भिजवत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या व सुकामेवा खा. सुकामेवा तुमच्या शरीरातील रक्त वाढीसाठी उपयुक्त आहे.

Advertisement

अंजीर खाणे हा देखील रक्तवाढी वरील एक उपाय आहे

अंजीर हे आपल्या शरीरसाठी अत्यंत गुणकारी असून, रक्त वाढी साठी त्याचा उपयोग होतो. दररोज सर्वसाधारण पणे २ – ३ अंजीर दुधा मध्ये टाकून दूध उकळून प्या. असे केल्यास तुमच्या शरीरातील रक्त वाढी बरोबरच रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण देखील वाढेल.

लसूण रक्त वाढवण्यासाठी खावा

लसूण हा आपल्या शरीरा साठी अत्यंत उपयुक्त आहे. लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यातील च एक म्हणजे रक्त वाढीसाठी लसूण खावा. लसूण आणि मीठ खाल्याने तुमचे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

लसणाची चटणी खाल्ली तरी रक्त वाढीसाठी किंवा हिमोग्लोबिन वाढीसाठी गुणकारी ठरते. रक्त वाढी बरोबरच लसूण खाल्यामुळे तुमचे रक्त पातळ देखील होते. रक्त पातळ झाल्यामुळे शरीरातील कोलस्ट्रोल चे प्रमाण कमी होऊन हार्ट अटॅक सारखे आजार होत नाहीत.

चहा आणि कॉफी पिणे टाळा

दैनंदिन आयुष्यात बरेच जण चहा नियमित पणे आणि खूप जास्त वेळा पित असतात. पण जर तुम्हाला रक्त वाढवायचे आहे तर तुम्ही चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. चहा जास्त प्रमाणात पिल्यास तुमच्या शरीरातील रक्त वाढी च्या प्रयत्नांना अडथळा निर्माण होऊ शकतो.

Advertisement

तीळ खाणे हा रक्त वाढीसाठी चांगला उपाय आहे

सर्व साधारण आपण वर्षातून एकदाच म्हणजे मकर संक्रांती सणाच्या त्या २ – ३ दिवसांमध्येच तीळ खातो, परंतु हे तीळ आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत आणि विशेषतः रक्त वाढी साठी तर अत्यंत गरजेचे आहेत.

साधारण पणे अंदाजे ३ चमचे तीळ पाण्यात १ ते २ तास भिजवा, चांगले भिजलेल्या तीळाची पेस्ट करून घ्या. त्या पेस्ट मध्ये एक चमचा भर मध मिसळा आणि ही नव्याने तयार झालेली पेस्ट दिवसातून २ ते ३ वेळा खा. हे मिश्रण खाल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.

मक्याचे कणीस खाणे – रक्त वाढीसाठी उपाय

मक्याचे कणीस खावे
मक्याचे कणीस

विशेषतः पावसाळ्यामध्ये बरेच लोक मक्याचे कणीस खाताना पाहायला मिळतात. हो मित्रांनो हेच मक्याचे कणीस किंवा मका दाणे हे तुमच्या शरीरासाठी पौष्टिक असतात. मक्याचे दाणे खाल्याने देखील तुमच्या शरीरातील रक्त वाढीस मदत होते.

Advertisement

दूध आणि खजूर – रक्त किंवा हिमोग्लोबिन वाढीसाठी उपाय

तुम्हाला जर तुमच्या शरीरातील रक्त झटपट वाढवायचे असेल तर हा उत्तम पर्याय आहे. रोज रात्री झोपण्या पूर्वी दुधात खजूर टाकावे, खजूर साधारण १ तास भिजल्यानंतर दूध प्यावे.दूध पिऊन झाल्यावर ते खजूर खावे. असे दररोज केल्यास तुमच्या शरीरातील रक्त वाढीसाठी मदत होईल.

सोयाबीन खावे – रक्त वाढीसाठी उपाय

सोयाबीन हे आपल्या शरीराला सदृढ ठेवण्यासाठी गुणकारी आहे. सोयाबीन मध्ये आयर्न चे प्रमाण जास्त असते आणि त्याचे सेवन नियमित पणे केल्यास तुमच्या शरीरातील रक्त वाढण्यास नक्कीच मदत होते. तुम्ही सोयाबीन ची भाजी बनवून किंवा सोयाबीन उकडून देखील खाऊ शकता.वजन वाढवण्यासाठी देखील भिजवलेले सोयाबीन खाल्ले जाते.

अंडी

तुम्ही जर मांसाहार करत असाल तर अंडी खाल्याने देखील रक्त वाढण्यास मदत होते. दररोज सकाळी उकडलेले अंडे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्त वाढीसाठी फायदा होऊ शकतो. अंड्यामध्ये आयर्न आणि प्रोटीन चे प्रमाण अधिक असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत होते.

Advertisement

पालेभाज्या नियमित खाव्यात

अनेक जणांच्या आहारामध्ये पालेभाज्यांचे प्रमाण हे फार कमी असते. पण पालेभाज्या ह्या तुमचे शरीर निरोगी आणि सदृढ ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. त्याच बरोबर शरीरातील रक्त वाढीसाठी पालेभाज्या नियमित पणे खाणे गरजेचे आहे.

पालेभाज्यांमध्ये पालक ही अत्यंत गुणकारी असून पालक खाणे हा शरीरातील रक्त वाढीसाठी एक अत्यंत योग्य उपाय होऊ शकतो. पालक मध्ये व्हिटॅमिन सी, बी ९, ए, आयर्न आणि फायबर चे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे पालक खाल्याने तुमच्या शरीरातील रक्त वाढते. पालकाची हाटीव भाजी, सूप तसेच पालक भजी यांसारखे विविध पदार्थ बनवून तुम्ही खावू शकता.

तात्पर्य

वरील सर्व रक्त वाढीसाठी उपाय तुम्ही घरगुती करू शकता. रक्त वाढीसाठी काय खावे आणि काय खाऊ नये याची सर्व माहिती तुम्हाला या लेखा मध्ये देण्याचा हा आमचा प्रयत्न. वर नमूद केलेले हे उपाय केल्यास तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढून तुम्ही निरोगी आणि सदृढ बनाल.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

Advertisement

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अजित पवार (1) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)

Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत