मिस वर्ल्ड १९६६>> सन १९६६ पर्यंत भारताला च काय तर संपूर्ण आशिया खंडातील कोणत्याच देशाला मिस वर्ल्ड चा तो मुकुट जिंकता आला नव्हता.
१९६६ मध्ये ही किमया पहिल्यांदा करून दाखवलेली ती महिला म्हणजे “रीटा फरीया-पॉवेल”.
तिचा जन्म २३ ऑगस्ट १९४३ ला गोआन (Goan-गोव्यातील लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात येत असलेला शब्द आहे.) पालकांमध्ये झाला.
जे ब्रिटिश बॉम्बे (आताच्या मुंबई) येथे वास्तव्यास होते. तिने १९६६ मध्ये “Miss World” चे विजेतेपद पटकावले आणि अशी किमया करणारी ती पहिली आशियाई महिला ठरली.
रीटा फरीया या एक भारतीय मॉडेल आणि डॉक्टर होत्या.डॉक्टर म्हणून पात्र होणाऱ्या त्या पहिल्या मिसवर्ल्ड विजेत्या आहेत.
करिअर :-
- प्रथम त्यांनी १९६६ मधेच मिस मुंबई हा किताब जिंकला होता.
- त्यानंतर तिने “Eve’s Weekly Miss India” ही स्पर्धा जिंकली. (कृपया गोंधळून जाऊ नका, त्या वर्षीचा “famina Miss India” हा किताब यास्मिन दाजी हिने जिंकला होता.)
- १९६६ च्या मिस वर्ल्ड स्पर्धे दरम्यान, ‘Best in Swimsuit‘ आणि साडी नेसल्या मुळे ‘Best in Eveningwear‘ ही उप शीर्षके जिंकली.
- अखेर तिने इतर देशातून आलेल्या ५१ प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत मिस वर्ल्ड १९६६ हा किताब जिंकला.
- मिस वर्ल्ड च्या तिच्या १ वर्ष्या नंतर साहजिकच तिला अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करण्याच्या ऑफर येऊ लागल्या होत्या.
- परंतु रीटा फरीया ने मॉडेलिंग आणि अनेक चित्रपटांना नाकारले.त्याऐवजी तिने आपल्या वैद्यकीय अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.
- नंतर १९७६ मध्ये पुन्हा एकदा लंडन येथे झालेल्या मिस वर्ल्ड च्या स्पर्धे मध्ये तिला न्यायाधीश म्हणून बोलावण्यात आले होते. या स्पर्धेत तीने डेमिस रौससोस सोबत न्यायाधीश म्हणून काम पाहिले ,या स्पर्धे मध्ये सिंडी ब्रेक्सपियर ला मिस वर्ल्ड म्हणून गौरविण्यात आले होते.
- त्यानंतर बऱ्याच वर्ष्या नंतर म्हणजे १९९८ ला “Femina Miss India” या स्पर्धे मध्ये तिने पुन्हा एकदा जज म्हणून काम पाहिले होते.
वैयक्तिक आयुष्य:-
- लहान पणा पासूनच रीटा ला लोकांची या ना त्या मार्गाने सेवा करायची इच्छा होती.म्हणूनच तिने शालेय शिक्षणा नंतर वैद्यकीय क्षेत्र निवडले होते.
- रीटा फरीया या मुंबई मधील भायखळा येथील “ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे. जे.ग्रुप ऑफ हॉस्पिटल” च्या विद्यार्थीनी होत्या. इथूनच त्यांनी एम.बी.बी.एस. ची पदवी मिळवली.
- त्यानंतर पुढील शिक्षणा साठी त्या “किंग्स कॉलेज हॉस्पिटल,लंडन” येथे गेली.
- १९७१ मध्ये लंडन मध्येच डेव्हिड पॉवेल यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि नंतर १९७३ मध्ये डब्लिन येथे हे जोडपे स्थायिक झाले.त्यानंतर तिथेच त्यांनी आपला मेडिकल चा सराव सुरू केला.
- रीटा फरीया नेहमीच असा दावा करतात की मिस वर्ल्ड या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या मित्राने आग्रह केला होता,म्हणून फक्त मनोरंजनासाठी त्या या स्पर्धे मध्ये सहभागी झाल्या होत्या. आणि त्यांनी थेट “Miss World” चा किताब पटकावला.
- आता सध्या त्या आयर्लंड मधील डब्लिन प्रांतात वास्तव्यास आहेत.त्यांच्या सोबत त्यांचा पती डेव्हिड, २ मुले आणि ५ नातवंडे आहेत.
मिस वर्ल्ड १९६६ रीटा फरिया-पॉवेल
‘Beauty with Brain’ या म्हणीचा खर्या अर्थाने साक्षात्कार करणारी अशी ही स्त्री,जीला संपूर्ण भारत देश सदैव लक्षात ठेवेल.
आपल्याला आमचा हा लेख कसा वाटला कमेन्ट मध्ये जरूर कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाआणिटि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)