मोबाइलचे फायदे व तोटे
माहिती

मोबाइल चे फायदे व तोटे मराठी | मोबाइलच्या अती वापराने बदलले घराचे घरपण

Advertisement

मोबाइल चे फायदे व तोटे (Mobile che Fayde va Tote) >> मोबाईल ही आता आपली गरजेची वस्तु बनलेली आहे । पूर्वी जसे म्हंटले जायचे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत,परंतु आता त्यात मोबाइल देखील माणसाची मूलभूत गरज बनला आहे ।

अगदी कमी कालावधीत ह्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाने माणसाच्या आयुष्यातील महत्वाचे स्थान काबीज केले आहे । आज आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईल हा महत्वाचा घटक बनला आहे । मोबाईल नसेल तर आपली अनेक कामे होत नाहीत आणि हल्ली तर मोबाईल शिवाय कामच होत नाही ।

कपडे खरेदी, फिरायला जाताना गाडी बुकिंग, नवीन माहिती घेण्यासाठी, डॉक्टर कडे नंबर लावण्यासाठी,पैसे पाठवण्यासाठी किंवा जेवण मागवण्यासाठी आता मोबाइल च लागतो ।

आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या मोबाइल चे फायदे व तोटे / दुष्परिणाम जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया ।

मोबाइल चे फायदे व तोटे / दुष्परिणाम

मोबाइल चे फायदे

१)हवे त्या व्यक्ती सोबत हवे तेंव्हा आपण बोलू शकतो । जगातील कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही फोन द्वारे पोहचू शकता ।

Advertisement

२)मोबाईल हे यंत्र वापरण्यास अगदी सोपे असल्याने अगदी लहानांपासून थोरा मोठ्यां पर्यंत सगळेच अगदी सहजतेने वापरू शकतात ।

३) मोबाईल एक मनोरंजनाचे उत्तम साधन आहे । तुमच्या आवडीचा चित्रपट, गाणे किंवा भजन कीर्तन पाहिजे तेंव्हा तुम्ही मोबाईल मध्ये बघू शकता ।

४) मोबाईल मध्ये आवश्यक माहिती जतन करून ठेवू शकता । तसेच फोटो किंवा व्हिडिओ काढू शकता ।

५) घरबसल्या कोणतीही खरेदी तुम्ही मोबाईल वरून करू शकता । मग ते कपडे,गाडी,लहान मुलांची खेळणी,बूट-चप्पल असोत किंवा मग हॉटेल मधून जेवण मागवणे असो ।

यांसारखे अनेक मोबाइल चे फायदे असले तरी देखील ह्या आपल्या आवडीच्या उपकरणाचे तोटे / दुष्परिणाम देखील आहेत ।

मोबाइल चे तोटे / दुष्परिणाम

Advertisement

१) मोबाइल च्या अतिरेक झाल्यामुळे घराघरातील व्यक्तींमधील संवाद संपत चालला आहे । पूर्वी घरात ज्या गप्पा मारल्या जायच्या त्या कमी होत चालल्या आहेत । हल्ली घरातील आई वडील आणि मुले आपल्या आपल्या मोबाईल मध्ये गुंगलेले पाहायला मिळतात आपापसात बोलणे कमी झाले आहे ।

२) शाळा कॉलेज मधील मुले मोबाईल चा गैरवापर करताना पाहायला मिळते । मुले शाळेत तासाला बसून मोबाईल चा वापर करतात । ह्या मुळे मुलां मध्ये आत्मकेंद्री पणा वाढताना दिसत आहे ।

३) मोबाईल मुळे वेळेचा अपव्यय होतो । सरकारी कर्मचारी म्हणा किंवा खाजगी कर्मचारी हल्ली सगळ्याच लोकांकडे मोबाईल असतो हे लोक कामाच्या ठिकाणी मोबाईल वर टाईमपास करताना पाहायला मिळतात ।अशा कार्यालयात मोबाईल बंदी गरजेची आहे ।

४) वाहन चालवताना मोबाईल वापरल्यास अपघात होण्याची शक्यता असते । अनेक लोकांना गाडी लावताना मान वाकडी करून मोबाईल वर बोलण्याची सवय असते अशा सवयी मुळे ही लोक स्वतः बरोबरच समाजातील इतर लोकांच्या होणाऱ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतात ।

५) बऱ्याच जणांना मोबाईल चार्जिंग ला लावून बोलण्याची सवय असते काही मोबाईल असे वापरल्यास गरम होऊन त्यांचा विस्फोट होऊ शकतो आणि वापरकर्त्यास मोठी ईजा होऊ शकते । त्यामुळे अशा पद्धतीने मोबाईल वापरणे शक्यतो टाळावे ।

तात्पर्य

Advertisement

मोबाईल हे एक उत्कृष्ट उपकरण असून, मोबाइल चे फायदे व तोटे अभ्यासल्या नंतर मोबाईल आपल्या साठी आहे,आपण मोबाईल साठी नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे | कोणतीही गोष्ट अती केल्यास त्याचे दुष्परिणाम हे असतातच । तसेच मोबाईल चे देखील दुष्परिणाम आहेत त्या पासून वाचण्याचा प्रयत्न करा ।

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

1st Android apps Baby Products Books Health Health Related Products Inspection Measurement Mechanical Engg Metrology & Quality Control Products QC udyojak अजित पवार अमिताभ बच्चन उद्योग कोल्हापूर ग्रामीण छत्रपती ट्रक ट्रोलिंग देश पैसे प्रेरणा फडणवीस फायदा बिजनेस मशीन महाराष्ट्र महाराष्ट्राचे राजकारण मोदी रजिस्टर रेकॉर्ड लहान बाळ वायरल विदेश विद्यापीठ व्यवसाय शरद पवार शेती संधी सण स्वदेशी हिंदू

Advertisement
Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत