बँक खाते | बँक खाते प्रकार | बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया

बँक खाते | बँक खाते प्रकार | बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया व पैसे पाठवणे >> आपल्या सर्वांनाच आपण केलेल्या कष्टांच्या मोबदल्यामध्ये पैसे मिळतात, जे आपण आपल्या आवश्यकतेनुसार अनेक ठिकाणी वापरत असतो. आपले आर्थिक व्यवहार औपचारिक, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी बँक व्यवस्था मोलाची भूमिका बजावते, आणि म्हणूनच “बँक” या वित्तीय संस्थेला देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. याच

बँक मध्ये खाते हल्ली सर्वांचेच असते परंतु ग्रामीण भागातील महिला व काही शेतकरी बांधवांचे अजून देखील बँक खाते नाहीये अश्याच काही गरजुंसाठी या लेखामध्ये आम्ही आपल्याला बँक खाते असण्याचे फायदे, बँक खाते प्रकार, बँक खाते उघडण्याची प्रक्रिया तसेच पैसे पाठवणे, फायनान्स सेवा यांसारख्या विविध बँक सलग्न गोष्टींची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात बँके विषयी ची ही सोपी पण महत्वाची माहिती.

बँक खाते माहिती | बँक खाते प्रकार | बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया व पैसे पाठवणे – संपूर्ण माहिती

बँकेच्या माध्यमातून व्यवहार करताना आपल्याला प्रामुख्याने 3 प्रकारचे लाभ मिळतात:-

  • तुम्ही बँकेमध्ये पैसे जमा करु शकतात जे सुरक्षित राहतात आणि त्या रकमेवर बँकेकडून तुम्हाला व्याज देखील मिळते.
  • आर्थिक व्यवहार बँकेच्या अटी आणि शर्तींनुसार पार पाडले जातात, जे कोणत्याही खाते सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
  • तुमच्या व्यावसायिक/ कौटुंबिक इत्यादी आवश्यकतांनुसार बँकेकडून तुम्हाला कर्ज मिळते.

बँक खाते असण्याचे फायदे

  • बँकेमध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात.
  • तुमचे आर्थिक व्यवहार पारदर्शक आणि बँकेच्या अटी आणि शर्तीनुसार पार पाडले जातात.
  • तुम्हाला तुमच्या ठेवींवर व्याज मिळते.
  • बँकेमध्ये खाते असल्यामुळे तुम्हाला जनधन योजना, सुकन्या समृद्धी यासारख्या योजनांचा तत्काळ लाभ घेता येतो, तसेच निवृत्ती वेतन, विमा या सारख्या योजनांचा देखील लाभ घेता येतो.
  • जर तुम्ही तुमचे बँक खाते सहा महिने योग्यरीतीने हाताळले तर तुम्हाला ओव्हरड्राफ्टसारख्या उत्तम योजनांचा लाभ घेता येतो.
  • तुम्ही उच्चशिक्षण, लग्नकार्य अशा प्रसंगी आवश्यकतेनुसार बँकेकडून कर्ज घेवू शकता.
  • इतकच नाही तर तुमचे बँक खाते हे एक वैध ओळखपत्र देखील आहे ज्याचा अनेक सरकारी कामकाजामध्ये वापर करता येवू शकते.
  • जनधन योजनेसारख्या उत्तम सरकारी योजनांमुळे तळागाळातील, दुर्गमभागातील आणि स्थलांतरित नागरिकांसाठी बँकिंग सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. जिथे आसपास कुठेही बँक शाखा नाही आशा दुर्गम भागांमध्ये देखील “बँक मित्र” यासारखी फिरती बँक सेवा ग्रामस्थांच्या दाराशी उपलब्ध होऊ शकते.
बँक खाते असण्याचे फायदे

बँक खाते प्रकार

बँकेमध्ये खाते उघडताना बँकेचा प्रतिनिधी तुम्हाला कुठल्या प्रकारचे खाते उघडायचे आहे याविषयी विचारणा करतो. बँक खात्याचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत एक म्हणजे बचत खाते/सेव्हिंग अकाउंट आणि दुसरे म्हणजे चालू खाते/करंट अकाउंट.

जर तुम्ही वैयक्तिक व्यवहारांसाठी खाते उघडत असाल तर बचत खाते हा योग्य पर्याय ठरतो. तसेच जर तुम्ही व्यवसाय संबधित खाते उघडत असाल तर चालू खाते हा योग्य पर्याय ठरतो.

बँकेच्या नियमांनुसार तुम्हाला बचत खात्यामध्ये ठेवावी लागणारी किमान शिल्लक रक्कम ही चालू खात्याच्या तुलनेत खूप कमी असते. बचत खात्यामधील रकमेनुसार बँकेकडून तुम्हाला व्याज मिळते.

बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया / बँकेत खाते उघडण्याची पद्धत

  • बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी, एखादे वैध ओळखपत्र, राहत्या जागेची हमी देणारा पत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो फॉर्मसोबत बँकेकडे सबमिट करून तुम्ही बँकेमध्ये खाते उघडू शकता.
  • ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, PAN कार्ड, मतदान ओळख पत्र,चालक परवाना,रेशन कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक तुम्ही वापरू शकता.
  • राहत्या जागेचे हमीपत्र म्हणून पासपोर्ट, आधारकार्ड, चालक परवाना, अगदी नजीकच्या काळातील विजेचे बिल यापैकी कोणतेही एक तुम्ही वापरू शकता.
  • बँक खाते उघडण्याची प्रक्रिया बँकेकडे अर्ज/फॉर्म सबमिट केल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्ण होते. त्यांनंतर बँक तुम्हाला “वेलकम कीट” पाठवते, ज्यामध्ये बँकेचे पासबुक, चेकबुक म्हणजेच धनादेश पुस्तिका तसेच डेबिट कार्डची मागणी केली असेल तर डेबिट कार्ड अशा घटकांचा समावेश होतो.
  • तर थोडक्यात काय, खाते उघडल्यानंतर बँकेमध्ये तुम्ही रोख रक्कम जमा करणे, तुमच्या बँक खात्यातील एकूण शिल्लक तपासून पाहणे, बँक खात्यातून रोख रक्कम भरणे/काढणे, चेक/धनादेश वापरून दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या खात्यामधील अपेक्षित रक्कम हस्तांतरित करणे अशी विविध कार्ये करता येऊ शकतात.
  • पासबुकामध्ये बँकच्या प्रत्येक व्यवहारांची नोंद केली जाते जसे की एखाद्या ठराविक तारखेला एखाद्या व्यक्तीकडून मिळालेली रक्कम/एखाद्या व्यक्तीला तुम्ही हस्तांतरित केलेली रक्कम आणि त्यानंतरची तुमच्या खात्यामधील शिल्लक रक्कम. आजकाल बऱ्याच बँक ई-स्टेटमेंट ची सुविधा देखील पुरवितात, ज्यामध्ये तुम्हाला ठराविक कालावधीमधील सर्व व्यवहारांची नोंद झालेली दिसते.
बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

पैसे पाठवणे – विविध पद्धती

चेक/धनादेश वापरून पैसे पाठवणे

चेक/धनादेश वापरून तुम्ही बँकेला पैसे देण्यासाठी सूचना देता आणि त्याप्रमाणे बँक ती सूचना ग्राह्य असल्यास बँक तुमच्या आदेशाचे पालन करते. तुम्ही दोन प्रकारचे धनादेश देयकाला देऊ शकता :-

  • पहिला प्रकार म्हणजे अकाउंटपेइ चेक, ज्यामध्ये चेकच्या डाव्या वरच्या कोपऱ्यात दोन आडव्या रेघा मारून त्यामध्ये “अकाउंटपेइ” असे नमूद करता आणि आदात्याचे नाव, तारीख, रक्कम आकड्यांमध्ये आणि अक्षरांमध्ये नमूद करता आणि चेकच्या उजवीकडे खाली खातेधारकाला सही करावी लागते. आदात्याने चेक बँकेमध्ये जमा केल्या नंतर दोन ते तीन दिवसांमध्ये त्याच्या खात्यामध्ये चेकवर नमूद केलेली रक्कम जमा होते.
  • दुसरा प्रकार म्हणजे बेअरर/धारक चेक, जेव्हा आदात्याला तत्काळ पैसे हवे असतात किंवा आदात्याचे बँकेमध्ये खाते नसते अशा स्थितीमध्ये बेअरर/धारक चेकचा वापर योग्य ठरतो. बेअरर चेक़ हा स्वतःसाठी बँकेमधून पैसे काढताना सुद्धा वापरता येतो. बेअरर चेक़ देताना डाव्या बाजुंच्या वरच्या कोपरयात आडव्या रेघा मारायची गरज नसते. हा चेक देताना तुम्हाला दोन ठिकाणी तुमची सही करणे अनिवार्य असते, एक उजव्या बाजूच्या सहीच्या रकान्यात आणि एक चेकच्या मागील बाजूस.

चेक/धनादेश वापरून पैसे पाठवणे

चेक़/धनादेश देताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जसे की चेक़वर कुठल्याही प्रकारची खाडाखोड नको, चेकवर केलेली सही ही बँक खाते उघडताना केलेल्या सहीप्रमाणेच असावी. चेकवर रक्कम नमूद करताना तुमाच्या खात्यामध्ये तेवढी रक्कम आहे ह्याची खात्री करावी अन्यथा चेक़ ग्राह्य धरला जात नाही.

बँक खात्यात रोख रक्कम जमा करताना किंवा चेक़ जमा करताना बँकेमध्ये जाऊन डिपॉझीट स्लीप भरावी लागते. डिपॉझीट स्लीपवर खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक, चेक़ किंवा रोख रक्कमेचे तपशील नमूद करून सही करावी लागते. डिपॉझीट स्लीप आणि रोख रक्कम किंवा चेक़, बँकेमधील टेलरकडे जमा करावा लागतो.

डिजिटल पद्धतीने पैसे पाठवणे

नजीकच्या काळात NEFT (National electronic Fund Transfer) आणि RTGS (Real-Time Gross Settlement) ह्या पैसे पाठवण्याच्या/निधी हस्तांतरण पद्धत्ती खूप लोकप्रिय झाल्या आहेत. ह्या पद्धतीचा अवलंब करून देयकाला तत्काळ पैसे पाठविणे शक्य होते. ही सेवा वर्षभर 24 X 7 अविरत चालू असते. तुम्ही प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन/ नेट बँकिंगच्या माध्यमातून या सेवेचा लाभ घेवू शकता. NEFTच्या माध्यमातून तुम्ही देयकाला जास्तीत जास्त रु.2,00,000/- पाठवू शकता, तसेच त्यापेक्षा मोठ्या रकमेसाठी RTGS चा वापर करू शकता.

NEFT च्या माध्यमातून पैसे पाठवणे

मागील दशकापासून बँकचे व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यास सरकारकडून मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे, त्यामुळे डेबिट कार्ड, ATM, नेटबँकिंग आणि UPI सारख्या डिजिटल पेमेंट पद्धतींची माहिती करून घेणे सर्वांसाठीच हिताचे आहे. उपरोल्लेखित बँकेच्या सेवा/सुविधा वर्षभर, आठवड्याचे सातही दिवस, चोवीस तास (365 x 24 x 7) अविरत चालू असतात. नेटबँकिंगचे व्यवहार तुम्ही अगदी घरबसल्या किंवा जगाच्या कुठल्याही काना-कोपऱ्यातून करू शकता.

यु.पी.आय.(UPI) च्या माध्यमातून पैसे पाठवणे

तात्पर्य – बँकेत खाते – बँक खाते प्रकार

तर मंडळी, थोडक्यात काय तर प्रत्येकाने “बँक” या महत्त्वपूर्ण अशा वित्तीय संस्थेशी विश्वासाचे नाते जोडून बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध योजनांचा,फायनान्स सेवांचा दीर्घकाळ लाभ घेत राहणे हे सर्वस्वी आपल्याच फायद्याचे आहे. त्याच बरोबर या सर्व गोष्टी आपल्या आर्थिक व्यवहारांशी जोडलेल्या असल्यामुळे, व्यवहार पार पडताना काही प्रमाणामध्ये जोखीमेचा भाग असला तरी सावधगिरी बाळगून तुम्हाला तुमचे खाते सुरक्षित ठेवता येते.

बँक खाते प्रकार

बँक खात्याचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत एक म्हणजे बचत खाते/सेव्हिंग अकाउंट आणि दुसरे म्हणजे चालू खाते/करंट अकाउंट.
जर तुम्ही वैयक्तिक व्यवहारांसाठी खाते उघडत असाल तर बचत खाते हा योग्य पर्याय ठरतो. तसेच जर तुम्ही व्यवसाय संबधित खाते उघडत असाल तर चालू खाते हा योग्य पर्याय ठरतो.
बँकेच्या नियमांनुसार तुम्हाला बचत खात्यामध्ये ठेवावी लागणारी किमान शिल्लक रक्कम ही चालू खात्याच्या तुलनेत खूप कमी असते. बचत खात्यामधील रकमेनुसार बँकेकडून तुम्हाला व्याज मिळते.

आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट मध्ये सांगा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “बँक खाते | बँक खाते प्रकार | बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया”

Comments are closed.

Scroll to Top