संतुलित आहार म्हणजे काय ? सकस आहार म्हणजे काय? संपूर्ण माहिती

संतुलित आणि सकस आहार म्हणजे काय / संतुलित आहार – Santulit Aahar in marathi >> अन्न हे मानवी जीवनाचे अस्तित्व टिकवण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. आपल्या शरीराची वाढ होणे ,झीज भरुन काढणे,ऊर्जा निर्मिती हे सर्व आपल्याला अन्नातून मिळणार्‍या घटक पोषण तत्त्वांमुळे पूर्ण होऊ शकते .आहारात घेतलेले अन्न पोषण दृष्ट्या समतोल असायला हवे.

चला तर मग आपण जाणून घेऊया संतुलीत आहार म्हणजे काय व सकस आहार म्हणजे काय.

संतुलित आणि सकस आहार म्हणजे काय

रोजच्या अन्नपदार्थात पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वाचा समावेश करणार्‍या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात.

संतुलित आहाराचे प्रकार व फायदे कोणते, संतुलित किंवा सकस आहार कसा असावा व या संतुलित आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश होतो ते आपण ह्या लेखामध्ये विस्तृत स्वरुपात बघूयात.

संतुलीत आहार – प्रकार

१) दुग्धजन्य पदार्थ : अंडी,मास,मासे इ.

२) फळे व भाजीपाला : केळी,हिरव्या पालेभाज्या इ.

३) स्निग्ध पदार्थ : लोणी,तुप,तेल इ.

४) तृणधान्य व कडधान्य – मोड आलेले उसळ, चपाती इ.

संतुलित आणि सकस आहार म्हणजे काय / संतुलित आहार - Santulit Aahar in marathi
संतुलित व सकस आहार

संतुलीत व सकस आहार – फायदे

संतुलीत आहाराचा आपण आपल्या जेवनात समावेश नाही केलात तर आपले शरीर निरोगी व धडधाकड नाही राहू शकनार. पोषक तत्त्वांचा आहारात सामावेश असने गरजेचे असते. संतुलित आहार आपण घेतल्यामुळे आजारपण येत नाही .मानसिक स्वास्थ चांगले राहते त्यामुळे आपल्या अन्नपदार्थात संतुलित आहार घेणे खूप गरजेचे आहे.

या धावपळीच्या जीवनात आपल्या शरीराकडे लक्ष देणे व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टिक आहाराची आवश्यकता असते पौष्टिक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला तरी दुष्परिणाम शरीरावर होतो .म्हणून निरोगी तंदुरुस्त शरीरासाठी संतुलीत आहाराची आवश्यकता आहे .आहारात कॅलरी, लोह व जीवनसत्वे विशिष्ट प्रमाणात व त्यामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश आहे की नाही हे समजून घेतले पाहिजे, कारण अन्नात पौष्टिक घटकांसोबत पोषणमूल्य नसलेल्या घटकांचा समावेश असू शकतो

संतुलित आहार कसा असावा

आजच्या आधुनिक काळात संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.संतुलित आहार म्हणजे टेलरमेड आहार .प्रत्येक व्यक्तीचा आहार हा टेलरमेड आसावा.थोडक्यात आपल्या शरीराची क्षमता व आवडीनिवडी लक्षात घेऊन आपला आहार हा ठरलेला असावा त्यालाच समतोल व संतुलित आहार असे म्हणतात. त्यात व्हिटॅमिन्स कर्बोदके प्रथिने यांचे प्रमाण असावे.

चला तर मग जाणून घेऊयात आपला आहार कसा असावा.

  • १) चांगला  प्रथिनयुक्त आहार .
  • २) आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश असावा .
  • ३) फल आहाराचा समावेश असावा .
  • ४) दैनंदिन आहारात साखरेचे कमी प्रमाण.

आपल्या आहारामध्ये सुमारे पस्तीस टक्के भाग प्रथिनांचा आसावा.असे आहारतज्ज्ञांचे मत आहे .ही प्रथिने आपल्याला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ  डाळी पालेभाज्या  मोडविलेली कडधान्ये याद्वारे मिळतात .प्रथिनांपासून आपल्या  शरीरातील पेशी व स्नायूंना पोषण मिळत असते .तसेच आपले त्वचा केस यासाठी देखील प्रथिने आवश्यक आहे .पुरुषांचे स्नायू महिलांच्या मानाने जास्त बळकट असल्याने पुरुषांना अधिक प्रमाणात प्रथिनांची गरज असते .त्यामुळे आहार तज्ज्ञांच्या मते आपल्या  दर जेवणामध्ये एक भाग तरी प्रथिनांचा  असायला हवा .ही प्रथिने शिजवलेले डाळ उसळ पनीर किंवा मासे या कोणत्याही स्वरूपात असावित पुरुषांना दिवसाला ६० ग्रॅम प्रथिने आवश्यक आहेत.तर स्त्रियांना ५५ ग्रॅम प्रथिनांची गरज असते.

संतुलित आणि सकस आहार म्हणजे काय
संतुलित आणि सकस आहार

आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्स ची देखील आवश्यकता असते .आपण स्वयंपाकामध्ये वापरत असलेले तेल किंवा तूप हे फॅट्स चे मुख्य स्त्रोत असतात .जीवनसत्त्व आणि झार आपल्या शरीराच्या चयापचयावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. तसेच हाडे व पेशींचे आरोग्यही यांच्यावर अवलंबून असते. शेंगदाने फळे हिरव्या पालेभाज्या मासे इत्यादी पदार्थांमधून जीवनसत्त्वे आणी झार मुबलक मात्रेमध्ये मिळतात.

लोह आणि कॅल्शियम हे देखील शरीराच्या पोषणासाठी आवश्यक तत्त्वे आहेत, दूध दुग्धजन्य पदार्थ भाज्या पालेभाज्या यामधून आपल्याला ही दोन्ही तत्त्वे मिळतात .

शरीराचे कार्य सुरळीत चालू राहावे या करिता दिवसातून दोन वेळा जेवण आवश्यक आहे. तसेच त्याच्या जोडीने मधल्या वेळचा नाश्ता देखील हलका फुलका पौष्टिक असावा. दिवसाच्या सुरुवातीला केला जाणारा नाश्ता बाकी दोन्ही जेवणाच्या मानाने जास्त असावा तर रात्रीचे जेवण अगदी हलके व पचण्यास सोपे असे असावे. तसेच जेवण्याच्या वेळा सांभाळणे देखील गरजेचे आहे .

संतुलित आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश होतो

जंक फूडच्या जमान्यात आपल्या लठ्ठपणा किंवा स्थूलतेचं प्रमाण वाढलेलं दिसतं .त्याचं मुख्य कारण म्हणजे कोलेस्ट्रॉल ची पातळी वाढणे हे होय. ही पातळी जंक फूड मुळेच वाढते. परिणामी हृदय आणि त्यासंबंधित आजाराचं प्रमाण वाढते.

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकालची तरुण मंडळी जंक फूडकडे ओढली गेली आहेत. या जंक फूडमुळे तरुण वयातील मुला मुलींना कोणत्याना कोणत्या तरी आजाराने ग्रासलेले असते किंवा स्थूलपणा सांधेदुखी यांसारख्या समस्यांचे ते बळी ठरलेले असतात. आपली तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेलेल्या प्रत्येकाला डॉक्टर समतोल आहार किंवा सकस आहार घ्यायला सांगतात. पण सकस आहार म्हणजे काय किंवा रोजच्या आहारात काय बदल केले म्हणजे आपण समतोल आहाराचं सेवन करू शकतो हे जाणून घेवुया.

आहार संतुलित असण्यासाठी आहारात प्रोटीन जीवनसत्त्व, खनिजद्रव्य, फॅट्स, कॅल्शियम, फायबर अशा घटकांचा समावेश करावा .अशा आहाराने शहरातील अवयव आणि अणू रेणू सुदृढ होतात व त्यांची वाढ होते. थोडेसे वजन वाढले की आहार कमी करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये अधिक आहे परंतु तसं करण्यापेक्षा आहार समतोल चौरस असावा याकडे लक्ष दिले पाहिजे. जेवणात भाजी आमटी ताक ज्वारी किंवा बाजरीची भाकरी कोशिंबीर यांचा समावेश असावा. हे अन्न कमी तेलात तयार केलेले असावे याशिवाय आणखी काय टाळावे व काय खावे हे पाहुयात.

संतुलित आणि सकस आहार म्हणजे काय / संतुलित आहार - Santulit Aahar in marathi
संतुलित आहार

कोणत्या वेळेला  कोणत्या अन्न पदार्थाचे सेवन करावे हे पाहूया.

१. सकाळी न्याहारी.

गरज :- कॅल्शियम, प्रोटीन व लोह.

पोषणासाठी आवश्यक पदार्थ :- एक ग्लास  दूध दही ताक  पनीर त्यापैकी कोणताही एक पदार्थ .

ऊर्जेसाठी पूरक :- शिरा, पोहे, पोळी, टोस्ट, ब्रेड, अंडे व फळे.

२. दुपारचे जेवन

गरज :- प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स व लोह.

पोषणासाठी आवश्यक पदार्थ :- एक मध्यम आकाराची वाटी घट्ट डाळ, उसळ व मांसाहारी मध्ये मासळी किंवा चिकन अंड्याचा पदार्थ.

ऊर्जेसाठी पूरक :- चपाती, भात, भाकरी, ताक, दही व कोशिंबीर इ.

३. संध्याकाळची न्याहारी

गरज:- कॅल्शियम, प्रोटीन.

पोषणासाठी आवश्यक व ऊर्जेसाठी पूरक पदार्थ:- चणे दाणे पनीर लिंबू शरबत.

४. रात्रीचे जेवण

पोषणासाठी आवश्यक पदार्थ :- भाकरी, पोळी, भात, फळभाजी, कोबी, गाजर, दुधी भोपळा व बटाटा.

ऊर्जेसाठी पूरक:- कढी, सुप व कोशिंबीर .

तात्पर्य – संतुलित आहार (santulit aahar in marathi)

आजच्या फार्स्ट लाइफमध्ये आपल्या कडून फास्ट फूड व जाहिरात बाजी मुळे नको ते अन्न सेवन केले जात आहे .आरोग्यावर परिणाम करणाऱ्या बहुतेक घटकांवर आपले नियंत्रण नसते त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी उत्तम संतुलित व सकस आहार, पुरेशी झोप आणि जोडीला व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे .

जरी विभिन्न आपले वेश भाषा, विभिन्न आपले अन्न, परी शारीरिक तंदुरुस्तीसाठी संतुलित आहार गरजेचा आहे.

संतुलित आहाराचे महत्व काय ? / संतुलित आहाराचे महत्व सांगा

शरीर निरोगी व धडधाकड ठेवायचे असेल तर संतुलित आहार घेणे व पोषक तत्त्वांचा आपल्या आहारात सामावेश असणे गरजेचे असते. संतुलित आहार आपण घेतल्यामुळे आजारपण येत नाही. मानसिक स्वास्थ चांगले राहते.
या धावपळीच्या जीवनात आपल्या शरीराकडे लक्ष देणे व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टिक आहाराची आवश्यकता असते पौष्टिक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला तरी दुष्परिणाम शरीरावर होतो .म्हणून निरोगी तंदुरुस्त शरीरासाठी संतुलीत आहाराची आवश्यकता आहे .आहारात कॅलरी, लोह व जीवनसत्वे विशिष्ट प्रमाणात व त्यामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश आहे की नाही हे समजून घेतले पाहिजे.
त्यामुळे आपल्या दैनंदिन आयूष्यात शरीर निरोगी व सदृढ ठेवाण्यासाठी संतुलित आहाराचे महत्व जास्त आहे.

समतोल आहार म्हणजे काय

समतोल आहार म्हणजे जो तुमच्या शरीरातील प्रथिने,पोषक तत्वे,चरबी या सर्व गोष्टी समतोल ठेवतो. म्हणजे जे खाल्याने तुमच्या शरीरातील चरबी (Fat) वाढत नाही. जो आहार चांगला  प्रथिनयुक्त असतो तसेच ज्या आहारात तंतुमय पदार्थांचा व फळांचा समावेश असतो आणि ज्या आहारामुळे तुमच्या शरीराला कल्शियम देखील मिळते.अशा आहारालाच समतोल आहार असे म्हणतात.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तसेच आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top