बैल पोळा |Bail Pola >> हा सण काही ठिकाणी श्रावण अमावस्या या दिवशी करतात तर काही भागात भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा हा बैलांचा सण आहे.
Table of Contents
बैल पोळा माहिती (bail pola information in marathi)
- बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैल पोळा हा एक सण असून हा विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणा वर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो.
- ज्यांच्याकडे शेती नाही ते बैल पोळ्याला मातीच्या बैलाची पूजा करतात.
- भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा बैल जोडीचा सण म्हणजे बैल पोळा.
- शेतकऱ्यांसाठी सदैव कष्ट करणार्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणाऱ्या पोळा सणाचे ग्रामीण भागात महत्व आहे .
- महाराष्ट्राच्या काही प्रदेशात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैल पोळाला म्हणजे पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसर्या दिवसाला तान्हा पोळा असे म्हटले जाते.
- काही भागात या सणाला बेंदूर उत्सव असे देखील म्हणतात.
सणा विषयी आख्यायिका
- बैल पोळा या सणाविषयी एक आख्यायिका आहे, जेव्हा प्रभू विष्णू कृष्णाच्या रुपात धरतीवर आले होते तेव्हापासून कृष्णाचा मामा कंस भगवान कृष्णाचे प्राण घेण्याचा प्रयत्न करत होता. कंसाने अनेकदा कृष्णाचा वध करण्यासाठी असुर पाठवले होते. एकदा मामा कंसाने पोलासुर नावाचा राक्षस कृष्ण भगवान चा वध करण्यासाठी पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध करुन सर्वांना चकित केले होते तो दिवस श्रावण अमावस्येचा होता. म्हणून या दिवसाला पोळा असे म्हणू लागले.
- पोळा अमावस्याच्या दिवशी येत असून याला पिठोरी अमावस्या म्हणून देखील साजरा करण्याची पद्धत आहे.

बैल पोळा सण कसा साजरा करतात
- सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दिवस बैला न ची पुजा करून नांगरापासून दूर ठेवले जाते.
- या दिवशी त्यांना उटणे लावून मालीश करुन स्नान करवतात. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सजवलं जातं. त्यांना रंगबिरंगी वस्त्रांनी, दाग-दागिन्यांनी सजवण्यात येतं.
- बैल पोळा सणाच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घातली जाते. नंतर त्यांना चारा देऊन घरी आणतात.
- बैलाच्या खांद्याला तुपाने आणि हळदीने शेकतात. याला खांड शेकणे असे म्हणतात.
- तसेच त्यांच्या पाठीवर विविध नक्षीकाम केलेली झूल चढवतात, आणि सर्व अंगावर गेरूचे ठिपके देऊन, शिंगांना बेगड बांधतात.
- काही शेतकरी आपल्या बैलाच्या पाठीवर रंगकाम करून त्याला सजवतात.
- डोक्याला बाशिंग बांधून, गळ्यात छुम छुम करणार्या घुंगरांच्या माळा घातल्या जातात.
- सगळं काही नवीन , नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घातले जातात.
- बैलां ना गोड पुरणपोळी चा नैवेद्य असतो. बैलाची निगा राखणाऱ्या घरगड्यास नवीन कपडे घेतले जातात.आणि मग गावात बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.


बैल पोळा Video
आपल्या भारत देशात प्रामुख्याने महाराष्ट्र,कर्नाटक या राज्यांच्या ग्रामीण भागात हा सण मोठ्या उस्साहात साजरा केला जातो. गावाकडील या सणाची मज्ज्या चं वेगळी आहे.
मित्रांनो आपल्या काही बैल पोळ्या च्या आठवणी असतील तर त्या कमेंट करून नक्की शेअर करा.आणि तुमच्या भागात हा सण कसा साजरा होतो ते आम्हाला कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) सण (4) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)