अष्टविनायक गणपती दर्शन कसे करावे |अष्टविनायक दर्शन यात्रा कशी करावी

अष्टविनायक गणपती दर्शन कसे करावे |अष्टविनायक दर्शन यात्रा कशी करावी | Ashtavinayak Ganpati Darshan >> गणपती हे आपल्या सर्वांचे आवडते दैवत असून गणपती बुद्धीची देवता म्हणून देखील लोकप्रिय आहे. कोणत्याही कार्याची सुरवात ही गणपतीचे पूजन करून केली जाते. गणपतीच्या दर्शनाने मन प्रसन्न होते, आणि तुम्ही जर अष्टविनायक गणपती दर्शन करण्याचे ठरवले असेल तर दुद्य शर्करा योगच म्हणावं लागेल.

अष्टविनायक शब्द च आपल्याला सांगतो की आठ विनायक(गणपती). अशा या आठ गणपती च्या मंदिरांना मिळून अष्टविनायक म्हंटले जाते. गणपतीची ही आठ मंदिरे अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेली असून, ही मंदिरे पुण्याच्या आस-पास च्या परिसरा मध्ये आहेत. आजकालच्या या धका धकीच्या युगात आपण अष्टविनायक गणपती दर्शन केलेत तर मनाला अगदी प्रसन्न आणि शांत वाटते.

या लेखा मध्ये तुम्हाला अष्टविनायक गणपती ची व दर्शन करण्यासाठी आवश्यक माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न.

अष्टविनायक गणपती नावे (Ashtavinayak Ganpati Names)

१) मयुरेश्वर (मोरगाव)

२) सिद्धीविनायक (सिद्धटेक)

३) बल्लाळेश्वर (पाली)

४) वरदविनायक (महाड)

५) चिंतामणी (थेऊर)

६) गिरिजात्मज (लेण्याद्री)

७) विघ्नहर (ओझर)

८) महागणपती (रांजणगाव)

अष्टविनायक गणपती दर्शन यात्रेविषयी काही रूढी परंपरा, लोकांमधील समज व यात्रेचे स्वरूप

  • तुम्ही अष्टविनायक दर्शन यात्रा टुरिस्ट कंपनी कडून किंवा खाजगी वाहनाने देखील करू शकता.
  • व्यवस्थित आणि धावपळ न करता तुम्हाला अष्टविनायक यात्रेसाठी ३ दिवस व २ रात्री लागतील.
  • असे म्हणतात की अष्टविनायक गणपती दर्शन यात्रा ही खाली दिलेल्या क्रमाने व शास्त्रोक्त पद्धतीने केल्यासच ती सफल होते.
  • अष्टविनायक दर्शन यात्रेची सुरवात ही मोरगाव च्या मोरेश्वर गणपती पासून करावी व 8 गणपतींचे दर्शन झाल्या नंतर पुन्हा मोरगाव च्या गणपतीचे दर्शन घ्यावे लागते.
  • प्रवास सुरू झाल्यानंतर संपूर्ण अष्टविनायक यात्रा संपन्न होई पर्यंत परत घरी येऊ नये किंवा पाहुण्यांकडे अथवा मित्र / मैत्रिणीं कडे देखील जाऊ नये.

अष्टविनायक गणपती दर्शन यात्रा कशी करावी (क्रम)

अष्टविनायक गणपती दर्शन यात्रेचा प्रारंभ मोरगाव च्या मयुरेश्वर गणपतीच्या दर्शनाने होते. खाली अष्टविनायक गणपती दर्शन कोणत्या क्रमाने करावा या विषयी माहिती दिलेली आहे. व संपूर्ण अष्टविनायक दर्शन यात्रा मोरगाव च्या गणपती पासून सुरवात करून, परत मोरगाव पर्यंत किती किलोमीटर मध्ये होते ही सर्व माहिती दिलेली आहे.

१) मोरगाव चा मयुरेश्वर गणपती (० कि.मी.) {पहिला दिवस}

मोरगाव चा मयुरेश्वर गणपती - अष्टविनायक गणपती दर्शन कसे करावे
मोरगाव चा मयुरेश्वर गणपती

तुम्ही पुणे किंवा मुंबई तून अष्टविनायक यात्रा आरंभ करत असाल तर मोरगाव ल येण्यासाठी तुम्हाला पुण्यातून पुणे – हडपसर – सासवड – जेजूरी मार्गे मोरगाव ला जावे लागेल. हडपसर मधून आतमध्ये सासवडच्या दिशेने गेल्यावर रस्ता थोडा खराब आहे. पुण्यातून मोरगाव पर्यंतचे अंतर ६८ कि.मी. आहे.

सुंदर अशा मयुरेश्वर गणपतीच्या या मंदिर प्रांगणात आकाराने मोठा आणि भव्यदिव्य असा नंदी आहे. मंदिरापासून जवळच म्हणजे २५ कि.मी. वर जेजूरी असून खंडोबाचे दर्शन देखील तुम्ही घेऊ शकता. ३ दिवसा मध्येच जर यात्रा पूर्ण करायची असेल तर जेजूरी अष्टविनायक यात्रे दरम्यान करू नये.

२) सिद्धटेक चा सिद्धीविनायक गणपती (मोरगाव ते सिद्धटेक अंतर ७० कि.मी.) [एकूण प्रवास = ७० कि.मी.]

सिद्धटेक चा सिद्धीविनायक गणपती - अष्टविनायक दर्शन कसे करावे
सिद्धटेक चा सिद्धीविनायक गणपती

मोरगाव वरुन सिद्धटेक ला जाण्या साठी चौफुल्या ला म्हणजेच पुणे – सोलापूर हायवे ला यावे लागेल. सिद्धटेक ला जाण्याचा मार्ग मोरगाव – चौफुला (पुणे सोलापूर हायवे) – पाटस – दौंड (शहर)-सिद्धटेक. हे एकूण अंतर ७० कि.मी. असून मंदीरा जवळ भीमा नदी आहे. आता मंदिरापर्यंत गाडी जाते, पूर्वी बोटीने नदी ओलांडावी लागत असे. अतिशय सुंदर असे हे मंदिर असून मंदिराची प्रदक्षिणा जवळ पास १ कि.मी. ची आहे.

या मंदिरा पासून जवळच विष्णूचे देखील सुंदर असे मंदिर आहे. अतिशय नयनरम्य असे हे ठिकाण असून सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्यावर मन प्रफुल्लित होते.

३) पाली चा बल्लाळेश्वर गणपती (सिद्धटेक ते पाली अंतर २४० कि.मी.) [एकूण प्रवास = ३१० कि.मी.]

पाली चा बल्लाळेश्वर गणपती
पाली चा बल्लाळेश्वर गणपती

सिद्धटेक वरून पालीच्या दिशेने निघल्यानंतर प्रवास लांब चा आहे, जवळ जवळ २५० कि.मी. चा हा प्रवास असून अंतर जारी जास्त असले तरी रस्ता चांगला आणि जवळ जवळ २०० कि.मी. अंतर हे हायवे ने आहे.मार्ग पुढील प्रमाणे सिद्धटेक – दौंड (शहर) – पाटस (पुणेसोलापूर हायवे) – पुणे – येरवडा – मुंबई हायवे – निगडी मार्गे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे – उरसे चा टोलनाका – खालापूर टोल नाक्याच्या अलीकडूनच डाव्या बाजूला पाली कडे रोड जातो – पाली.

हायवे सोडून पाली कडे जाण्यासाठी वळल्या नंतर वाटेत छान असा निसर्ग अनुभवायला मिळेल. उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही यात्रा करत असाल तर वाटेत करवंद खायला मिळतील. पाली मध्ये तुम्ही मुक्काम करु शकता इथे मंदिर ट्रस्ट तर्फे राहण्याची उत्तम सोय केलेली आहे. आणि कमी खर्चात रूम उपलब्ध होते.

४) महड चा वरदविनायक गणपती (पाली ते महड अंतर ४० कि.मी.) [एकूण प्रवास = ३५० कि.मी.] {दुसरा दिवस}

महड चा वरदविनायक गणपती - अष्टविनायक यात्रा कशी करावी
महड चा वरदविनायक गणपती

पाली मध्ये मुक्काम केल्यानंतर महड च्या वरदविनायक गणपतीच्या दिशेने जाताना अंतर अवघे १ तासाचे आहे. सकाळी सकाळी महड च्या गणपतीचे देखील दर्शन होईल, साधे आणि सुंदर असे हे मंदिर असून वरद विनायकाचे दर्शन घेतल्यावर सुखमय वाटते.

५) थेऊर चा चिंतामणी गणपती (महड ते थेऊर अंतर १२५ कि.मी.) [एकूण प्रवास = ४७५ कि.मी.]

थेऊर चा चिंतामणी गणपती
थेऊर चा चिंतामणी गणपती

महड वरून पुन्हा पुण्याच्या दिशेने निघाल्यावर परत त्याच रस्त्याने येताना वाटेत लोणावळा लागेल, तिथे तुम्ही खरेदी वगैरे करू शकता. त्यानंतर सरळ पुण्यातून हडपसर आणि मग पुणे सोलापूर हायवे ने सरळ आल्यावर थेऊर फाट्यावरून थेऊर गाठावे. हे अंतर १२५ कि.मी. इतके असून जवळ जवळ ३ तासांचा हा रूट आहे. चिंतामणी गणपती मंदिर हे वाड्यामध्ये स्थित आहे. मंदीरा मध्ये मोठी घंटा आहे. छान असे हे मंदिर असून चिंतामणीचे दर्शन घेतल्यावर तुमच्या सर्व चिंता मिटवण्यासाठी चिंतामणीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल.

६) लेण्याद्री चा गिरिजात्मज गणपती (थेऊर ते लेण्याद्री अंतर १३० कि.मी.) [एकूण प्रवास = ६०५ कि.मी.]

लेण्याद्री चा गिरिजात्मज गणपती - अष्टविनायक यात्रा कशी करावी
लेण्याद्री चा गिरिजात्मज गणपती

थेऊर वरुण निघाल्या नंतर लेण्याद्री कडे जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब करा. थेऊर – हडपसर – येरवडा – मुंबई हायवे – कासारवाडी (नाशिक फाटा) – नारायणगाव – नारायण गावातून डाव्या बाजूला वळल्यावर थेट लेण्याद्री कडे जाणारा रोड आहे. वाटेत तुम्हाला ओझर लागेल परंतु तिथे न थांबता सरल आधी लेण्याद्री करावे. लेण्याद्री चे गिरिजात्मज गणपतीचे मंदिर हे उंच डोंगरावर लेणी स्वरुपात स्थित आहे.

इथे पायर्‍या चढून वरती मंदिरात जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या बॅगा किंवा पिशव्या गाडीतच ठेऊन जाव्यात कारण वरती माकडे आहेत. फार फार तर जाताना पाण्याची बाटली व माकडांसाठी फुटाणे घेऊन जा, ते फुटाणे आवडीने खातात.अतिशय नयनरम्य असे हे ठिकाण असून इथे तुम्हाला निसर्ग सौंदर्य अनुभवता येईल. प्रौढ लोकांना वरती घेऊन जाण्यासाठी इथे पालखी ची सुविधा आहे.

गणपतीचे दर्शन झाल्यावर तुम्ही इथे तुमचा दूसरा मुक्काम करू शकता इथे देखील राहण्याची उत्तम सोय आहे.तुम्हाला जर एसी रूम ची सुविधा हवी असेल तर तुम्ही ओझर ल जाऊन मुक्काम करावा. ओझर इथून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर आहे.आणि ओझर च्या मंदिर ट्रस्ट ची राहण्याची सोय सर्व अष्टविनायक मंदिरांपैकी सर्वात उत्कृष्ट आहे.

७) ओझर चा विघ्नहर गणपती (लेण्याद्री ते ओझर अंतर १५ कि.मी.) [एकूण प्रवास = ६२० कि.मी.] {तिसरा दिवस}

ओझर चा विघ्नहर गणपती
ओझर चा विघ्नहर गणपती

जर तुम्ही ३ दिवसांची अष्टविनायक यात्रा करत असाल तर तुमच्या अष्टविनायक यात्रेचा हा शेवटचा दिवस असेल, सकाळी लवकर उठून तुम्ही ओझर च्या विघ्नहर गणपतीचे दर्शन घ्यावे. जर तुम्ही ओझर मध्येच मुक्काम केला असेल टर उत्तम, कारण तुम्हाला सकाळची गणपतीची आरती सापडू शकते. छान असे वाड्या सारखे वाटणारे हे मंदिर असून अतिशय नयन रम्य असा हा परिसर आहे.

मंदिराच्या जवळच छान असा तलाव आहे सकाळी तिथे अगदी प्रसन्न वाटते. संपूर्ण मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आहे, इथे तुम्हाला नक्कीच विघ्नहर गणपतीचे दर्शन घेतल्यावर सुखमय वाटेल.

८) रांजणगाव चा महागणपती (ओझर ते रांजणगाव अंतर १०० कि.मी.) [एकूण प्रवास = ७२० कि.मी.]

रांजणगाव चा महागणपती अष्टविनायक गणपती
रांजणगाव चा महागणपती

ओझर वरुन निघाल्यावर तुम्हाला अष्टविनायक गणपती दर्शन यात्रेतील शेवटच्या म्हणजेच रांजणगाव च्या महागणपतीच्या दिशेने जायचे आहे. मार्ग पुढील प्रमाणे, ओझर – नारायणगाव – राजगुरूनगर – पाबळ – शिक्रापूर – रांजणगाव.

हे आंतर जवळ जवळ १०० किलोमीटर चे असून अडीच ते तीन तासांचा रूट आहे. महागणपतीचे मंदिर हे हायवे ला लागूनच आहे इथे तुम्ही दुपारचे जेवण देखील करू शकता. मंदिर परिसर छान आणि स्वच्छ आहे.

मोरगाव चा मयुरेश्वर (रांजणगाव ते मोरगाव अंतर ७० कि.मी.) [एकूण प्रवास = ७९० कि.मी.]

रांजणगाव वरुन आता तुम्हाला परत मोरगाव ला मयुरेश्वर गणपती च्या दर्शनाला जयचे आहे. इथून मोरगाव चे अंतर ७० किलोमीटर आहे. मार्ग पुढील प्रमाणे, रांजणगाव वरुन निघाल्यावर शिक्रापूर च्या दिशेने न जाता, शिरूर च्या दिशेने कारेगाव पर्यंत जावे. कारेगावातून उजव्या बाजूला वळून तुम्ही न्हावरे गावात चौफुला – शिरूर हायवे ला मिळताल. इथे आल्या नंतर चौफुल्याच्या दिशेने जावे. याच रोडवर तुम्हाला आधी चौफुला लागेल आणि नंतर पुढे मोरगाव.

तात्पर्य

अष्टविनायक गणपती दर्शन हे दिलेल्या क्रमाणे केल्यास तुमचे किलोमीटर वाढतील, आणि तुमचा वेळ देखील जास्त जाईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयी नुसार यात्रा केल्यास काहीच हरकत नाही. कारण तुमची श्रद्धा आणि देवाचे दर्शन महत्वाचे आहे. आता अष्टविनायक गणपतीच्या प्रत्येक मंदिरात महाप्रसादाची देखील उत्तम सोय असते त्यामुळे तुम्ही जर योग्य वेळी मंदिरात गेलात तर तुम्हाला त्याचा देखील लाभ घेता येईल.

टीप:- वरील माहिती मध्ये फक्त मोरगाव पासून सुरू झालेली अष्टविनायक यात्रा परत मोरगाव ला येई पर्यंत किती किलोमीटर चा प्रवास होतो ते दर्शवते, तुम्ही तुमच्या निघायच्या ठिकाणा पासून मोरगाव पर्यंतचे व यात्रा संपल्यानंतर परत मोरगाव पासून पोहचायच्या ठिकाणा पर्यंतचे अंतर त्यामध्ये जोडावे.

अष्टविनायक दर्शन क्रम

१) मयुरेश्वर (मोरगाव)
२) सिद्धीविनायक (सिद्धटेक)
३) बल्लाळेश्वर (पाली)
४) वरदविनायक (महाड)
५) चिंतामणी (थेऊर)
६) गिरिजात्मज (लेण्याद्री)
७) विघ्नहर (ओझर)
८) महागणपती (रांजणगाव)

अष्टविनायक नावे / अष्टविनायक गणपती नावे

१) मोरगाव चा मयुरेश्वर
२) सिद्धटेक चा सिद्धीविनायक
३) पाली चा बल्लाळेश्वर
४) महाड चा वरदविनायक
५) थेऊर चा चिंतामणी
६) लेण्याद्री चा गिरिजात्मज
७) ओझर चा विघ्नहर
८) रांजणगाव चा महागणपती

तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट नक्की करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “अष्टविनायक गणपती दर्शन कसे करावे |अष्टविनायक दर्शन यात्रा कशी करावी”

  1. I think this is one of the most significant pieces of information for me. And I’m glad to read your article. Thank you for sharing!

Comments are closed.

Scroll to Top