ambati rayadu cancel his retirement
खेळ

निवृत्तीच्या निर्णयावरुन अंबाती रायुडूचा यू-टर्न

Advertisement

अंबाती रायडूचा निवृत्तीचा निर्णय मागे

विश्वचषक स्पर्धेसाठी अंबाती रायडूची भारतीय संघात निवड झाली नव्हती. निवड न झाल्याने नाराज रायडूने 3 जुलै रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण आता रायडुने अवघ्या काही महिन्यातच आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.

याआधी पण विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रायडू याने निवड न झाल्यामुळे “आपण वर्ल्ड कप स्पर्धा 3D गॉगल मधून बघणार आहोत” असे कमेंट केले होते. त्यावर देखील खूप वादंग झाले होते.

गेल्या 2 ते 3 दिवसान मध्ये रायडू ला मात्र आपली चूक उमगली असून त्याने आज निवृती चा निर्णय मागे घेत असल्याचे संगितले.त्याच्या या निर्णया मुळे त्याच्या चाहत्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आज काय म्हणाला रायडू? : मी त्यावेळी भावनेत वाहत गेलो आणि निर्णय घेतला,परंतु आता मी निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासही आपण तयार आहोत.

गेल्या आठवड्यात त्याने आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने यापूर्वी घेतलेल्या निवृत्ती च्या निर्णयामुळे आता रायडूची फारच फरफट होत आहे असे दिसते. आता बघूया आगामी काळात रायडू चे काय होते आणि त्याला संघात स्थान कधी मिळते.

ambati rayadu cancel retirement
ambati rayadu

अंबाती रायुडू आपलं पुनरागमन कधी करतोय याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Advertisement

त्याला आगामी आयपीएल स्पर्धा आणि भारतीय टीम मध्ये स्थान मिळो हीच सदईछ्या!

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *