अजित पवार एक शेतकरी>>आज अजित पवारांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला असा सुर सर्व प्रसार माध्यमातून आवळला जात आहे. आणि दिवस भर नाही नाही ते कयास लाऊन ही मंडळी मोकळी झाली होती असो आता तो राजीनाम्याचा विषय पूर्ण संपलेला आहे.
परंतु आज अजित पवार हे त्यांच्या पत्रकार परिषदे मध्ये भावुक झाले आणि ते जे काही बोलले ते त्यांच्या मूळ स्पष्ट वक्ते स्वभावाला साजेसेच बोलले.
अजित पवार एक शेतकरी
- शेतकरी देखील असाच असतो हळवा. आपले पीक येई पर्यंत शेतात मर मर कष्ट करतो, ते पीक रानात असताना शेतकरी फक्त ते पीक जगवण्याचा प्रयत्न करत असतो,मग त्या साठी त्याला काही करावे लागले तरी तो करतो कसला रोग पडला त्याचा वर उपाय करतो पण काहीही करून ते पीक जगवतो,ते जगवण्या साठी वाटेल तेवढा खर्च करत राहतो. मग त्यासाठी तो जमेल तेथून कर्ज घेतो.
- हे सगळे करत असताना शेतकरी हा विचार कधीच करत नाही की त्या पिकांतून आपल्याला आता उत्पन्न एवढे मिळेल का जेवढा आपण खर्च करत असतो. तो ते पीक पूर्ण पणे काढणी ला येई पर्यंत पोसतो. परंतु ज्या वेळेस ते पीक तो विक्री साठी घेऊन जातो त्याला तिथे गेल्यावर व्यापारी लोक ज्या प्रकारे त्या पिकाला नाव ठेवतात, भाव पाडून माघतात त्या वेळी तो मात्र निराश होतो,हतबल होतो आणि नैराशेत जातो. याच निराशेतून आत्महत्या करतो.
अजित पवार पत्रकार परिषद
- जशी शेतकर्यांची अवस्था होते अगदी तशीच अवस्था अजित पवारांनी त्यांची झाल्याचे आज सांगितले. पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी जे काही सांगितले त्याचा सारांश असा की सहकार क्षेत्रात काम करत असताना ज्या ज्या वेळी एखादा शेतकर्यांच्या मालकीचा कारखाना अडचणीत असतो.
- त्यावेळी तो कारखाना त्या अडचणी मधून बाहेर काढत असताना आपण त्याला त्या अडचणी मधून बाहेर काढण्याच्या द्रुष्टीने प्रथम विचार करून कर्ज वाटप केले आहे आणि ते कर्ज देखील बुडालेले नाही ते सर्व कर्ज वसूल झालेले आहे.
- आणि बँक आता नफ्या मध्ये आहे पण तरी देखील बँकेत असलेल्या ठेवीच्या रकमेच्या पेक्ष्या जास्त म्हणजे 25 हजार कोटीचा घोटाळा सांगितला जात आहे. ते देखील त्या शेतमालाला नाव ठेवणार्या व्यापार्या सारखे.

अजित पवार यांच्या बोलण्यातील ठळक मुद्दे
- त्यांच्या म्हणण्याचा उद्धेश एकच होता की जसा शेतकरी कधी दुष्काळ पडला की अडचणीत येतो तसेच त्या शेतकर्यां वर चालणारा त्यांचा कारखाना अडचणीत येतो मग त्या कारखान्यांना मदत करणे व अडचणी मधून बाहेर काढणे हेच काम बँके मार्फत केले गेले आहे.
- आणि ह्यात भ्रष्टाचार झालेलाच नाहीये आणि तो जरी झाला असा समज असेल तर त्यात मी एक संचालक होतो आणि माझ्या सोबत सर्व पक्षीय इतर 70 संचालक होते.
- प्रत्यक्षात राज्यातील 12कोटी जनते पैकी जवळ पास 1 कोटी जनतेलाच सहकार क्षेत्र काय व ते कसे चालते हे माहीत असेल, परंतु तरी देखील नुसता अजित पवारांनी हजारो कोटींचा घोटाळा केलाय एवढेच पसरवले जाते.
- त्यामुळे उरलेल्या 11 कोटी जनतेला असेच वाटणार की हा हजारो कोटी चा घोटाळा झाला आहे. प्रत्यक्षात हा घोटाळा नसून शेतकर्यांच्या कारखान्यांना केलेली मदत आहे.
- अजित पवार म्हणाले जर एवढ्या आत्मीयतेने आणि आपुलकीने सहकार क्षेत्रात काम करून देखील कायम असेच आरोप होत असतील तर त्रास हा होणारच,शेवटी मी देखील माणूस आहे.
- आणि मी तरी त्या बँकेत संचालक होतो पण पवार साहेब तर त्या बँकेचे सभासद देखील नाहीत आणि केवळ माझे नातलग म्हणून त्यांचे नाव त्यात गोवले गेलेलं आहे.
- त्यांनी तर त्यांच्या आयुष्याची 51 ते 52 वर्ष शेतकरी आणि कामगार वर्गा च्या भल्या साठी खर्ची केली आहेत तरी देखील त्यांच्या वर कल गुन्हा दाखल केला गेला. आणि मला याच गोष्टीचा त्रास झाल्यामुळे मी अज्ञात वासात गेलो होतो.
- अजित दादांचा हाच तळमळीने काम करण्याचा स्वभाव महाराष्ट्राला खास करून ग्रामीण भागाला जास्त आवडतो,आणि आज अजित दादांनी त्याच पद्धतीने ती पत्रकार परिषद ही हाताळली.
- या सर्व घडामोडीचा सारांश काय तर शरद पवारांची जी सहानुभूती ची लाट महाराष्ट्रात तयार होत आहे, त्यात आता अजित दादां सारख्या ग्रामीण जनतेच्या हिताचे निर्णय घेणार्या नेत्याच्या सततच्या होत असलेल्या अवहेलने प्रतीच्या सहानुभूतीची देखील भर पडली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)