8 अ उतारा म्हणजे काय / ग्रामपंचायत नमुना 8 उतारा – संपूर्ण माहिती

Reselling Wahtsapp marketing software and CRM

8 अ उतारा म्हणजे काय / ग्रामपंचायत / गाव नमुना 8 अ उतारा >> तुम्ही जर कोणत्याही ग्रामपंचायत हद्दीत राहत असाल तर तुम्ही 8 अ चा उतारा, सात बारा, फेरफार यांसारखे उतारे पहिलेच असतील. परंतु ही कागदपत्रे काढायची कशी, त्याचे फायदे काय आहेत तसेच त्यांचा वर लिहलेल्या गोष्टींचा अर्थ काय व यातील फरक काय हे सगळ्यांच माहीत असते असे नाहीये. अशा सर्वांसाठी या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत 8 अ उतार्‍या बाबतची सर्व माहिती.

8 अ उतारा / ग्रामपंचायत नमुना 8 (8 a utara in marathi) – संबंधित सर्व माहिती

सातबारा उतार्‍यावरून जमिनीचा मालक त्या जमीनीवरील कर्ज तसेच त्या जमिनी मध्ये कोण कोणती पिके घेतली जातात या बाबतची माहिती मिळते. परंतु अनेकांना 8 अ उतार्‍या बाबत माहिती नसते. चला तर मग जाणून घेऊयात 8 अ उतारा म्हणजे काय ? तो कसा मिळेल, त्याचे फायदे काय काय आहेत, त्यावरील माहिती कशी वाचायची आणि समजून घ्यायची आणि सातबारा उतारा व 8 अ उतारा यातील फरक काय आहे.

8 अ उतारा म्हणजे काय?

8 अ उतारा म्हणजे ज्या गावातील तो उतारा आहे त्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मालकीची किती एकूण किती जमीन आहे याची माहिती देणारा उतारा. एखाद्या व्यक्तीची गावामध्ये एका पेक्षा जास्त ठिकाणी जमीन असेल तर त्याची सर्व माहिती तुम्हाला एका कागदावर म्हणजेच 8 अ च्या उतार्‍यावर मिळू शकते.आणि याच 8 अ उतार्‍याच्या आधारे ग्रामपंचायत कर आकारणी करते.

ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा कुठे मिळेल

8 अ च उतारा मिळवायचे २ मार्ग आहेत,एक म्हणजे जमिनीचा ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा तुम्ही तलाठी कार्यालयातून / घराचा ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा ग्रामपंचायत मधून घेऊ शकता किंवा दूसरा मार्ग म्हणजे तो तुम्ही ऑनलाइन डाऊनलोड देखील करू शकता. तलाठी कार्यालयातून किंवा ग्रामपंचायत मधून नमुना 8 चा उतारा घेण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊन तो घ्यावा लागेल. ऑनलाइन पद्धतीने हा उतारा मिळवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमाने तुम्ही डाऊनलोड करू शकता.

  • https://bhulekh.mahabhumi.gov.in/  या वेबसाईट ल भेट द्या.
  • या वेबसाइट वर आल्यावर समोर दिसत असलेल्या स्क्रीन वर तुमचा विभाग निवडा.  
  • त्यानंतर 8 अ वर क्लिक करा.
  • खाली तुमचा जिल्हा,तालुका आणि गाव निवडा.
  • तुम्हाला तुमचा गट नंबर माहीत असल्यास खाते नंबर वर क्लिक करून समोर येणार्‍या बॉक्स मध्ये तुमचा गत नंबर टाका.
  • त्यानंतर सर्च बटन वर क्लिक करा.

वरील प्रमाणे कृती केल्यावर तुम्हाला तुमचा ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा बघायला मिळेल जो तुम्ही फक्त माहिती साठी वापरू शकता,इतर शासकीय कामकाजा साठी तुम्हाला 8 अ चा उतारा ऑनलाइन डाऊनलोड करायचा असल्यास https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या लिंक वरून तुम्ही खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे तुमची माहिती भरून लॉगिन करा आणि ऑनलाइन पेमेंट करून तुमच्या क्षेत्राचा सातबारा उतारा व 8 अ च उतारा डाऊनलोड करू शकता.

8 अ उतारा म्हणजे काय / ग्रामपंचायत नमुना 8
ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी रजिस्टर करा

ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा वाचायचा व समजून कसा घ्यायचा ते पाहूयात

उतार्‍याच्या वरच्या बाजूला तुम्हाला तुम्ही ज्या दिवशी उतारा घेत आहात त्या दिवशीची तारीख व वर्ष दिसेल,त्याचबरोबर गावाचे नाव,तालुका व जिल्हा यांची नावे असतील. या सर्व मूलभूत बाबींनंतर खाली रकाने असतात,जे पुढील प्रमाणे:-

१) पहिला रकाना : या रकान्यामध्ये गाव नमुना सहामधील नोंद असते,या मध्ये खातेदाराची जमीन ही वयक्तिक आहे की सामायिक याची देखील नोंद असते त्याच बरोबर खातेदाराचा नोंदणी क्रमांक देखील असतो. या रकाण्याच्या माध्यमातून आपल्याला जमीन ही वयक्तिक आहे का सामूहिक हे कळते जे की जमीन खरेदी करताना महत्वाचे आहे.

२) दुसरा रकाना : या रकान्यात भूमापन क्रमांक आणि उपविभाग क्रमांक असतो. त्यात खातेदाराच नाव देखील असते. जर क्षेत्र सामायिक असेल तर सगळ्या खातेदारांची नावे या ठिकाणी असतात. या रकाण्या द्वारे एखाद्या व्यक्तीच्या नावावरील क्षेत्र कोणकोणत्या गटात विभागलेले आहे हे आपल्याला पाहायला मिळते.

३) तिसरा रकाना : या रकान्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या नावावर 8 अ उतारा ज्या गावचा आहे त्या गावात किती क्षेत्र आहे हे आपल्याला कळते.

४) चौथा रकाना : या रकानात आपल्याला प्रत्येक जमिनीवर किती कर आकारणी झाली आहे हे कळते. या रकाण्या द्वारे आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या गटातील क्षेत्रावर किती कर आकारणी झाली आहे ते कळते. कर आकारणी ही रुपये व पैश्यांमद्धे असते. जसे की १५.५० रुपये.

५) पाचवा रकाना : हा रकाना दुमला जमिनीवरील नुकसान दर्शवण्यासाठी राखीव असतो.

६) सहावा रकाना : या रकान्याचे दोन भागांमध्ये विभागणी केलेली आहे, एक उपभाग म्हणजे सहा (अ) ज्या मध्ये जिल्हा परिषदे मार्फत अकरण्यात आलेला कर दर्शवला जातो तर दुसर्‍या उपभागात म्हणजेच सहा ( ब ) मध्ये ग्रामपंचायत मार्फत आकारण्यात आलेला कर दिसतो.

७) सातवा रकाना : या रकाना मध्ये एकूण करांची बेरीज केलेली असते. यातून त्या व्यक्तीला किती कर भरावा लागतो हे कळते.

     आणि सगळ्यात शेवटी त्या व्यक्तीचे एकूण क्षेत्र व त्यावरील एकूण कर आकारणी किती आहे ते दिलेले असते.

8 अ चा उतारा असल्याचा फायदा:

१) 8 अ च्या उतार्‍या मार्फत एकाच व्यक्तीच्या मालकीची वेगवेळ्यात ठिकाणी म्हणजेच वेगवेगळ्या गटात असलेली एकूण जमीन कळते.

२) 8 अ चा उतारा प्रशासनाला म्हणजेच ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना कर गोळा करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

३) तुम्ही जर जमीन खरेदी करत असाल तर ग्रामपंचायत नमुना 8 च्या उतार्‍या मुळे तुम्हाला जमिनीची सर्व माहिती मिळते जसे की जमिनीचे मालकी हक्क वयक्तिक आहेत का सामूहिक तसेच जमीन नक्की कोणाच्या नावावर आहे हे देखील कळते. त्या मुळे जमीन खरेदी विक्री मध्ये या उतार्‍यामुळे फसवणुकीला आळा बसतो.

४) एखाद्या जागेवर किंवा घरावर तसेच नवीन घर बांधकामासाठी तुम्हाला काही कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत नमूना 8 हा उपयोगी पडतो.

सात बारा आणि 8 अ उतारा यामधील फरक

सातबारा उतारा हा केवळ एका गटा पुरता मर्यादित असतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर एका गटात कितीही ठिकाणी जमीन असेल तर ती सात बारा उतार्‍या वर दिसते. याउलट जर एखाद्या व्यक्तीची एका पेक्षा जास्त गटात पण त्याच गावात जमीन असेल तर ती सगळ्या गटांमधली जमीन ही ग्रामपंचायत नमुना 8 च्या उतार्‍यावर पाहायला मिळेल.

अशा प्रकारे 8 अ उतार्‍या चा महसूल गोळा करण्यासाठी ग्रामपंचायत व जिल्हापरिषद यांना चांगला उपयोग होतो कारण या मध्ये त्या व्यक्तीच्या नावावर त्या गावात असलेली सर्व जमीन अधोरेकीत केली जाते.

8 अ उतारा / ग्रामपंचायत नमुना 8 डाऊनलोड

ग्रामपंचायत मध्ये लोकांना देण्यासाठी वापरण्यात येणारा ग्रामपंचायत नमुना 8 डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या “Download ग्रामपंचायत नमुना 8” या बटन वर क्लिक करा.

सारांश – 8 अ उतारा

वरील माहिती वरुन तुमच्या लक्षात आलेच असेल की 8 अ उतारा कसा डाऊनलोड करायचा तसेच तो वाचायचा कसा. आणि त्याच बरोबर त्याचा उपयोग कुठे कुठे होतो या बाबतची माहिती या लेखात दिलेलीच आहे. जमीन खरेदी विक्री व्यवहारात या उतार्‍याला अनन्य साधारण महत्व आहे.

8 अ उतारा म्हणजे काय?

8 अ उतारा म्हणजे, ज्या गावातील तो उतारा आहे त्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मालकीची किती एकूण किती जमीन आहे याची माहिती देणारा उतारा. एखाद्या व्यक्तीची गावामध्ये एका पेक्षा जास्त ठिकाणी जमीन असेल तर त्याची सर्व माहिती तुम्हाला एका कागदावर म्हणजेच 8 अ च्या उतार्‍यावर मिळू शकते.आणि याच 8 अ उतार्‍याच्या आधारे ग्रामपंचायत कर आकारणी करते.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

2 thoughts on “8 अ उतारा म्हणजे काय / ग्रामपंचायत नमुना 8 उतारा – संपूर्ण माहिती”

Comments are closed.

Scroll to Top