12 वी चा अभ्यास कसा करायचा – science| commerce |arts (12 vi cha abhyas kasa karaycha) >> बारावी आहे आता अभ्यासाला लागायला हवे,असे सगळे जण कानी ओरडत असतात,पण अभ्यास नेमका कसा करायचा आणि कोणत्या प्रकारे करायचा हे आपल्या लक्षातच येत नाही.
एका शाळेत एक वाक्य मे वाचले होते,त्यात म्हंटलं होतं No good is too high if we climb with care and confidence. काळजीपुर्वक आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही.
मित्र व मैत्रिणींनो परीक्षेतील यश हे त्या मानाने फारच लहान आहे, तुम्ही नीट अभ्यास केला तर मार्क तुमच्याकडे आपोआप येतील.बऱ्याच विद्यार्थ्यांना असे वाटते की मी तासंतास अभ्यास करतो पण परीक्षेत मला काहीच आठवत नाही.बरेच असे टॉपर विद्यार्थी असतात जे बराच वेळ अभ्यास पण करत नाहीत पण ते टॉपर येतात त्याचे कारण आहे ते hardwork नाही करत तर ते स्मार्ट वर्क करतात.त्यांना माहीत असते की कशा पद्धतीने अभ्यास करायचा.व अभ्यास केल्यावर तो कसा लक्षात ठेवायचा.
उद्दिष्ट कसे असायला पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे,तुमच्या समोर जर 9 ससे असतील आणि तुम्हाला त्यातील एकच पकडायचा असेन तर तुम्ही फक्त एकवरच पूर्ण लक्ष केंद्रित करा.तुमच्या मर्यादा या फक्त तुमच्या कल्पना आहेत.
चला तर मग जाणून घेऊयात 12 वी चा अभ्यास कसा करावा.
12 वी चा अभ्यास कसा करायचा – ७ महत्वाच्या टिप्स (12 vi cha abhyas kasa karaycha – 7 main tips)
खाली ७ टिप्स दिलेल्या आहेत ज्या तुम्ही अंगी कारल्या तर तुम्हाला 12 वी मध्ये नक्कीच चांगले यश मिळेल.
अभ्यासाची वेळ (12 वी चा अभ्यास कसा करायचा)
तसे पाहायला गेले तर तुम्ही तुम्हाला जेंव्हा मॅन लागेल तेंव्हा अभ्यास करू शकता,पण जर तुमचे अभ्यासात लक्षच लागत नसेल तर सकाळची शांत वेळ ही अभ्यासासाठी योग्य आहे.सकाळी म्हणजे पहाटे सर्वत्र शांतता असते,तसेच रात्रभर झोप झाल्याने शरीर आणि मन दोन्हीही अतिशय प्रसन्न असतात.१२ वी च्या मुलांनी सकाळी लवकर उठून अभ्यास केला पाहिजे,सकाळी केलेला अभ्यास हा नेहमी लक्षात राहतो.आणि शक्यतो जो विषय आपल्याला अवघड वाटतो त्याचाच अभ्यास सकाळी केला पाहिजे जेणे करून त्या विषयातील तो अवघड वाटणारा टॉपिक देखील समजतो.
अभ्यासाला बसण्याची जागा व बसण्याचा कालावधी
१२ वी च्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसल्यावर कधीही एकाच जागी जास्त वेळ अभ्यासाला बसू नका.प्रत्येक तासाभराने साधारण दहा मिनिटांचा ब्रेक हा हवाच.तुम्ही जिथे अभ्यासाला बसता ती जागा स्वच्छ व नीटनेटकी असावी.ज्यामुळे मन सतत प्रसन्न राहते.त्याचबरोबर अभ्यासाला बसाल तिथे टीव्ही आणि मोबाईल चा अडथळा नसेल याची काळजी घ्या,जमल्यास टीव्ही आणि मोबाईल बंद करून ठेवा.
अभ्यासाचे वेळापत्रक (timetable) – (12 वी चा अभ्यास timetable)

१२ वी च्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसण्या पूर्वी अभ्यासाचे वेळापत्रक बनवले पाहिजे आणि त्याचे काटेकोर पणे पालन केले पाहिजे.
कोणतीही गोष्ट जर तुम्ही नियमित पणे करत असाल तर काही दिवसांनी शरीराला त्या गोष्टीची सवय होते,तसेच अभ्यासाचे देखील आहे.तुम्हाला जर सुरवातीला अभ्यास करताना मन लागत नसेल तर बळजबरीने अभ्यासाला बसा, काही दिवसातच तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल आणि तुम्हाला आपोआप अभ्यासाची आवड निर्माण होईल.पण त्यासाठी तुम्हाला सुरवात करावी लागेल.
अभ्यास लक्षात ठेवण्याची पद्धत (12 वी चा अभ्यास ट्रिक्स)
ज्या पण विषयाचा तुम्ही अभ्यास करत असाल,वाचलेला विषय तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर त्याला वारंवार वाचावे.मनातल्या मनात न वाचता मोठ्याने वाचून पुन्हा पुन्हा वाचावे जेणे करून त्या टॉपिक ची रिविजन होईल.
जर पुन्हा पुन्हा वाचून देखील लक्षात राहत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर,वाचलेले लिहून काढा.असे केल्याने तुम्हाला परीक्षेला देखील पेपर लिहताना तुम्ही जो अभ्यास केला आहे तो आठवतो.वाचन झाल्यावर शक्यतो पुस्तकात न बघता लिहण्याचा प्रयत्न करावा,अशा पद्धतीने अभ्यास केल्यावर तुम्हाला केलेला अभ्यास लक्षात ठेवायला नक्कीच मदत होईल आणि बारावीचा अभ्यास कसा करावा हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही.
महत्वाच्या टॉपिक वर भर द्या

अभ्यास करत असताना जर तुम्हाला वाटले की हा टॉपिक परीक्षेत विचारला जाऊ शकतो तर लगेच वेळ न दवडता त्या प्रश्नावर / टॉपिक वर अधिक भर द्या. तसेच आपल्या कॉलेज मधील शिक्षकांना त्या त्या विषयातील important प्रश्न विचारून त्यावर अधिक भर द्या. कारण त्या टॉपिक वर परीक्षेत प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते.
स्वतःची परीक्षा घेणे (12 वी चा अभ्यास ट्रिक्स)

सुट्टीच्या दिवशी किंवा अभ्यासातून वेळ काढून महिन्यातून एक दिवस झालेल्या अभ्यासावर स्वतःच स्वतःची एक परीक्षा द्या. आणि महत्वाचे प्रश्न काढून पेपर तयार करा व वेळ लावून त्याची उत्तरे लिहण्याचा प्रयत्न करा.सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून झाल्यावर तुम्ही लिहलेले बरोबर आहे का नाही किंवा त्यात काय काय लिहायचे राहिले आहे याची तपासणी करा.तसेच वेळ लावून उत्तरे लिहल्याने परीक्षेत तुम्हाला एवढ्या प्रश्नांची उत्तरे लिहण्यासाठी किती वेळ लागेल याचा देखील तुम्हाला अंदाज येईल.
केलेल्या अभ्यासाची उजळणी
परीक्षेच्या आधल्या दिवशी त्या विषयाची फक्त उजळणी करणे हेच काम तुमचे असले पाहिजे नवीन असा काही अभ्यास त्या वेळी केल्यास तो लक्षात राहण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे आधीच अभ्यास करताना त्या विषयाच्या शॉर्ट नोट्स काढून ठेवलेल्या असाव्यात.नोट्स काढताना तुम्ही हाय लायटर वापरा आणि महत्वाचे हाय लाइट करून ठेवा आणि परीक्षेच्या आधल्या दिवशी तेच वाचा.उजळणी करताना टॉपिक लक्षात ठेवताना प्रत्येक टॉपिक ची काही न काही आयडिया /कल्पना बनवा जेणे करून तो टॉपिक परीक्षेला विचारला तर व्यवस्थित लिहता येईल,घोकंपट्टी करण्याची आवश्यकता नाही.
सारांश – 12 वी चा अभ्यास कसा करायचा
१२ वी चा अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला या लेखामध्ये दिलेल्या ७ टिप्स वरून समजले असेलच. अशा पद्धतीने अभ्यास केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला तुमच्या यशस्वी वाटचालीस आमच्या टीम कडून हार्दिक शुभेच्छा.
12 वी चा अभ्यास कसा करायचा ?
12 वी चा अभ्यास करताना 7 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या पुढील प्रमाणे :- 1) अभ्यासाची वेळ 2)अभ्यासाला बसण्याची जागा व बसण्याचा कालावधी 3) अभ्यासाचे वेळापत्रक (timetable) 4)अभ्यास लक्षात ठेवण्याची पद्धत 5) महत्वाच्या टॉपिक वर भर द्या 6) स्वतःची परीक्षा घेणे 7) केलेल्या अभ्यासाची उजळणी
या 7 गोष्टी तुम्ही अंगिकारल्या तर तुम्हाला 12 वी च्या परीक्षेत नक्कीच यश मिळेल.
आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)
अभ्यासात मन नाही लागत
yes , So right